Dictionaries | References

धोंड

   
Script: Devanagari

धोंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : धोल

धोंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; or to extort from him compliance with some demand.

धोंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A large mass of stone or rock. A heavy loss (as in trade). A heavy affliction. A grievous slander.
धोंड डोकीवर-देणें-चढविणें-वळविणें   To force upon a person (some business).

धोंड

  स्त्री. 
  1. मोठा जड धोंडा ; दगड ; खूप मोठी शिळा ; खडक . हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । - ज्ञा ३ . २४२ .
  2. ( ल . ) व्यापारांत आलेली बूड .
  3. सरकारने लादलेला फार मोठा कर .
  4. मोठे संकट ; दुःख .
  5. दडपणारी काळजी ; चिंता . उरावर धोंड - गळ्यावर धोंड - डोईवर अथवा माथ्यावर धोंड .
  6. मोठा आळ , आरोप .
  7. ओझे ; भार . हिंदुस्थान दिवसेंदिवस अधिकाधिक दरिद्री होत असून हिंदुस्थान इंग्लंडच्या गळ्यांत एक बोजड धोंड झाली आहे . - टिव्या ( वाप्र . )

०डोकीवर - देणे - वळविणे , धोंड पडणे , येणे, चढविणे   
  1. अतिशय द्रव्यनाश होई असे दरवडा इ० संकट प्राप्त होणे . या व्यापरांत पांच हजारांची मजवर धोंड पडली .
  2. एखाद्या मनुष्यावर बळेने लादणे ( काम ).
  3. कांही मागणीविषयी एखाद्याकडून जुलमाने कबुली घेणे ; रुकार मिळविणे .

०गळ वि.  दगडमय . जीत धोंडे पुष्कळ आहेत अशी ( जमीन ).
०दिवस  पु. धर्मकृत्यास योग्य अशा दोन तिथीवृद्धीमुळे येणारा दिवस . भाकड दिवस .
०फूल  न. दगडफूल ; पावसाळ्यांतील दगडा - लाकडावरची फुलासारखी उगवण .
०फोड्या वि.  
  1. पाथरवट .
  2. ( ल . ) दगडफोड्या पहा .

०भट्टी  स्त्री. स्नान केले नसून स्नान केल्यासारखे दिसण्यासाठी गंध , भस्म इ० कांनी आपले शरीर सजविणे ; स्नानाशिवाय गंध लावणे . ( क्रि० करणे ). येतो हा धोंडभट्टी द्विज करुनि सदा तीर्थ द्याया पदांचे । - मसाप ४ . ३ . १६४ . - आगर ३ . १० . [ धोंडा + भट्टी किंवाधोंडभट ब्राह्मण ]
०महिना, मास  पु.  पुरुषोत्तममास ; अधिकमास ; मलमास ( या महिन्यांत धर्मकृत्ये होत नाहीत म्हणून ).
०मार  पु. धोंड्याची मारामारी ; धोंड्यांनी मारणे , खाल्लेला मार ; दगडमार .
०वणी  न. ( चव , लज्जत येण्यासाठी ) ज्यांत ठिकरी विझविली आहे असे ताक ; ठिकरी तापवून चटका दिलेले ताक . ( निंदार्थी ) ठिकरीचा वास लाविलेले ताक ; ताकतव . [ धोंडा + पाणी ]
०वाण, वायण वण  न. 
  1. अधिकमासांत ब्राह्मणांस दिलेली वायने .
  2. दिंड ; आंत पुरण घालून उकडलेला कणकेचा गोळा ; धोंडा पहा . अधिक महिन्यांत याचे वाण देतात .
  3. अधिक महिन्यांतील ब्राह्मण भोजन .

०शीर  स्त्री. मोठी शीर .
  1. पायाच्या टाचेवरची शीर .
  2. हाताची शीर .
  3. कानजवळची शीर . [ धोंड + शीर ] 

धोंडा   पु. 
  1. दगड . आप्तांसि न या तोंडा दावावे नृपपदावरि पडो धोंडा । - मोकृष्ण ५० . २३ .
  2. अधिक महिन्यांत वायनासाठी , ब्राह्मणभोजनासाठी केलेला कणकेचा पुरण घालून उकडलेला गोळा ; एक पक्वान्न .
  3. ( ल . ) मूर्ख ; दगड ; अक्कलशून्य माणूस .
  4. कठिण हृदयाचा मनुष्य ; निर्दय , पाषाणहृदयी माणूस . 
म्ह ०
  1. देखला धोंडा घेतला कपाळी = अतिशय चिडखोर आणि आततायी माणसास लावतात .
  2. पावला तर देव नाही तर धोंडा .
  3. धोंडा टाकून पहाव पडला तर आंबा नाही तर धोंडा .

धोंडा लोटणे घालणे    एखाद्यावर मोठे तुफान आणणे ; कचाटे घालणे .
धोंडे खणून काढणे    पाया खणून काढणे ; निर्मूलन करणे ; पाळेमुळे खणून काढणे ; उखडणे ; काढून देणे ; एखाद्याने अजीबात निघून जावे म्हणून हात धुवून त्याच्या पाठीस लागणे .
धोंडे मारुं लागणे    
  1. एखाद्यावर चालून जाणे ; मारावयास धांवणे .
  2. ( उप . ) वेडा होणे ; वेड लागणे . 

धोंड्याखाली हात सांपडणे    पेचांत अडचणीत येणे . 
धोंड्याचे दोर काढणे    
  1. कृपणापासून पैसे , पाषाणहृदयी मनुष्यापासून दया मिळावयास झटणे ; अशक्य गोष्ट करावयाचा प्रयत्न करणे .
  2. अनुरुप साधनाचे सहाय्य नसतां मोठ्या खुबीने आणि निश्चयाने मोठे उद्देश सिद्धीस नेणे . 

धोंड्यावर धोंडे घालून करणे    द्रव्यादि सहाय्य नसतां नाना प्रकारचे प्रयत्न करुन एखादे कार्य करणे ; नाना प्रकारच्या युक्त्या योजणे .
धोंड्यावर धोंडे घालणे    निष्फळ प्रयत्न करणे ; उपयोग नाही अशा गोष्टी करणे . 
धोंड्याशी कपाळ घासणे    स्वतःस व्यर्थ शिणविणे ( मूर्खास शिकविण्यांत इ० ). 
हाती धोंडे घेणे   अतिशय चिडणे ; मारावयास उठणे . 
पायावर धोंडा ओढून घेणे    एखादे लचांड पाठीशी लावून घेणे .
पायांवर धोंडा पाडून घेणे    आपल्या अन्नांत माती पाडून घेणे , स्वतःवर संकट आपत्ति ओढवून घेणे . 
चार ठिकाणी धोंडे टाकून पाहणे   स्वकार्य साधानार्थ अनेक स्थळी अनेक प्रयत्न करुन पाहणे .
वाटोळा धोंडा  पु.  दुसर्‍याच्या पेचांत कधी न सांपडणारा असा धूर्त माणूस . दगड शब्द पहा . 
धोंडाळ वि.  
  1. दगडाळ ; खडकाळ .
  2. एकप्रकारची काळी जमीन ; हीत धोंडे फार असल्याने आंत पाणी राहू शकते, म्हणून पिकास फार चांगली समजतात .

धोंडी  स्त्री. मोठा दगड ; धोंडा ; धोंड .

Related Words

धोंड   धोंड दिवस   डोकीवर धोंड पडणें   डोकीवर धोंड येणें   धोंड महिना   धोंड मास   गळ्यांत धोंड बांधणें   डोकीवर धोंड चढविणें   डोकीवर धोंड देणें   डोकीवर धोंड वळविणें   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   paunch   belly   फत्तरपूजा   boulder clay   कोरम   धोंडभट्टी   भाकड   चा   निबर   ऊर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP