Dictionaries | References

चा

   
Script: Devanagari

चा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the house: not inflecting the noun, it expresses a closer and more intimate connection--an inherence, appertainment, dependence &c.; as घरचा धनी Master of the family; घरचा पैका Family-stock or capital; घरचीं माणसें Inmates of the house, the household; अंगचें बळ Bodily strength. Inflecting the noun, चा is in government, and is the postposition marking the genitive case: not inflecting the noun, चा simply serves to form the assuming noun into an adjective.

चा     

१ षष्ठी विभक्तीचा प्रत्यय , याचे अर्थ - १ मिळकत किंवा ताबा . हें त्याचें घर . २ विनियोग ; विवक्षित उपयोग ; योजना . हा बसावयाचा धोंडा . ती स्नानाची धोंड . ३ एखाद्या क्रियेचा काल किंवा कालाचें समकालीनत्व . मी दुपारचा येईन . तो सांजचा गेला . तो केव्हांचा येऊन बसला आहे . ४ संबंध ; अन्वय . तो गांवाचा पाटील . मुलाचा बाप . झाडाचें पान . नित्य दानाचा ब्राह्मण . घरचा पैका . ५ पूर्ति ; पूर्तता ; साकल्य . पैक्याचा पैका = सर्व पैसा ; घरचें घर = सबंध घर ; महिन्याचा महिना . अशा रीतीनें विभक्तिप्रत्यय लागलेल्या नामाची द्विरुक्ति होते . उदा० बापाचा बाप गेला बोंबलतांना हात गेला . ६ अवस्थांतर ; फरक . दरिद्रयाचा श्रीमंत होतो श्रीमंताचा दरिद्री होतो . चा हा प्रत्यय लागल्यामुळें नामाचें रुपांतर विकल्पेंकरून होतें . नामरूपांतरांत प्रासंगिक संबंध किंवा अन्वय दृष्टीस पडतो . उदा० घरचा धनी = घराचा मालक घरचा पैका = घरापासून उत्पन्न झालेला पैसा , रूपांतर नसेल तेव्हां विशेष निकट , जवळचा संबंध , स्वाधीनता , अवलंब या सारखे अर्थ होतात . उदा० घरचाधनी = कुटुंबाचा मुख्य ; घरचा पैका = घरांतलें भांडवल ; घरचीं माणसें = घरांतील माणसें . अंगचें बळ = शरीरसामर्थ्य . सारांश नामाचें सामान्यरूप झालें असतां चा हा षष्ठी विभक्तिप्रत्यय असतो व तदभावीं चा हा त्या नामास विशेषणरूप देतो . [ सं . स्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP