Dictionaries | References त तारुं Script: Devanagari See also: तारु Meaning Related Words तारुं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. नौका ; तिनापासून पांचापर्यंत शिडें असलेलें गलबत ; जहाज . ( सामा .) तरण्याचें साधन . तैसे भूताकार एकाचे । हे दिठीं रिगे जैं साचें । तेंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारुं लागे । - ज्ञा १३ . १०८६ . कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदें उतटलीं । - दा १ . ८ . ३१ . [ सं तृ - तर् = तरणें ] म्ह ० भटास तारु व गाबत्यास गोरु = योग्य निवड नसणे या अर्थी . तारवार धाडप - सक्रि . ( गो . ) एखाद्या माणसाने बंडखोरीसारखा मोठा गुन्हा केला असतां त्याला पकडून आरमारी कैदेत ठेवणे . तारु कुव्यासकट गिळप - ( गो . ) ( डोलकाठीसह तारुं गिळणे ). ( ल . ) सर्वच्या सर्व गिळणे ; सर्वस्व स्वाहा करणे . पु. ( काव्य ) नावाडी ; वल्हवून नेणारा ; तरुन नेणारा . नामाचिया सहस्त्रवरी । नावा इया अवधारी । सजूनिया संसारी । तारु जाहलो । - ज्ञा १२ . ९० . - वि . तारक ; रक्षक ; तारुन नेणारा . आम्हा - तुम्हास भववारिधिमाजि तारूं । र ४९ . [ सं . तृ - तर ;= तर णें ; तारणें ]०तरांडे न. ( व्यापक ) जहाज ; गलबत ; लहानमोठे गलबत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP