मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
आरती श्रीगुरुपरंपरेची

चित्रापुरगुरुपरंपरा - आरती श्रीगुरुपरंपरेची

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ ॐतत्सत् श्रीसद्गुरुवे नम: ॥
आरती आदीनाथ । सर्व विश्र्वीं तुझी सत्ता ॥ महातेजा परात्परा । दावीं आत्मरूप आतां ॥ध्रु०॥
हर-हरी-ब्रह्मदेव । परंपरा अभिनव ॥ चालविती वसिष्ठ हे । तपोनिधी ज्ञानदाता ॥१॥
पराशरू, शक्ति, थोर । कृष्ण, शुक गुरुवर ॥ गौडपद, गोविंदही । योगीवर भक्त-त्राता ॥२॥
शंकरू गुरु थोर । तथा तोटक अवतार ॥ हस्तामलक, सुरेश्र्वर । जाणे वेदही वेदान्ता ॥३॥
पद्मपाद चालविती । परंपराश्रेष्ठ यती ॥ अच्युताश्रम ज्ञानी । बोधी शिष्यांसी सिद्धांता ॥४॥
आनंद, कैवल्य हे । पीठाश्रमीं शोभती हे ॥ नृसिंहाश्रम त्यांचे । शिष्य चालविती पंथा ॥५॥
केशव, वामन, कृष्ण । शोभताती आश्रम पूर्ण ॥ पांडुरंग शिष्य त्यांचा । शास्त्रीं ज्याची निपुणता ॥६॥
परिज्ञानाश्रम थोर । असे शिव - अवतार ॥ उमामहेश्र्वर - आज्ञें । गुरु तारी सारस्वतां ॥७॥
शंकराश्रम यती । परिज्ञानाश्रमां घेती ॥ चित्रापूर - परंपरा । पीठीं, थोर ज्यांची सत्ता ॥८॥
शंकर - आश्रम दूजे । येती ज्ञातीचिये काजें ॥ ज्ञान-बोध सर्वां देती । अवतारी गुरु ज्ञाता ॥९॥
केशव, वामन ही । थोर आश्रम हे पाहीं ॥ कृष्णाश्रम अधिकारी । बोधिताती मन - चित्ता ॥१०॥
दत्तदेव - अवतार । पांडुरंगाश्रम थोर ॥ कर्म-उपासना-ज्ञान । लावियेलें जन-हिता ॥११॥
पीठावरी आजि पूर्ण । विष्णु-अंश तोचि पूर्ण ॥ तप करी जनांसाठीं । आनंदाश्रम गुरु ज्ञाता ॥१२॥
हृदीं सर्व जन - मनीं । साक्षी वसे पूर्णपणीं ॥ निजानंद तोचि देई । भावें शरण त्यां जातां ॥१३॥
अहंकार सांडोनियां । सोऽहं - ज्योत पाजळूं या ॥ पूर्णानंद आनंदासी । प्रेमें ओवाळूं या आतां ॥१६॥
रामचंद्र गुरुवरां । दासा म्हणे कृपा परा ॥ ठेवीं नित्य स्वरूपांत । सत्य - भक्ति देईं ताता ॥१५॥
॥ ॐश्रीसद्गुरुनाथचरणार्पणमस्तु ॥
ॐतत् - सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP