निरंजन माधव - प्रस्तावना

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


प्रस्तावना

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे. त्यांच्या भाषेत, विचारात आणि पद्धतीत नवीनपणा आहे. त्यांच्या ’ हनुमंतस्तोत्रां ’ची भाषा वीर्यवती असून छंदही वीरछंदाला अनुरूपच आहे. त्यांची काही कवीतारूपी स्तोत्रे मोरोपंत थाटाची असून त्यांनी पंतांकडून स्फूर्ति घेतली असावी. त्यांच्या रचना कवितारूपी असल्याने त्यांच्या स्तोत्रांना कवितेचा दर्जा दिला गेला, आणि तेच त्यांना अभिप्रेत होते.

निरंजन माधवांनी बहुतेक कविता शके १६५७ ते शके १६९० च्या दरम्यान लिहील्यात, यावरून असे समजते की, पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात त्यांचे पूर्ववय गेले असावे, परंतु मोरोपंतांच्या काळात हा कवी प्रौढ वयाचा होता. 

संबंधीत निरंजन माधवांचा अस्सल कविता संग्रह श्री. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांना नाशिक मुक्कामी सन १९०३ साली मिळाला. तो संग्रह जसाच्या तसा पुणे येथे ’ आर्यभूषण ’ छापखान्यात श्री. अनंत विनायक पटवर्धन यांनी छापला आणि श्री. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी घर नं. २४ बुधवार पेठ, पुणे येथून सन १९१९ साली प्रसिद्ध केला. सदर ग्रंथाची किंमत बारा आणे होती. 

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:10:29.8430000