मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|कर्मतत्व| चैतन्य तत्व कर्मतत्व फळ तत्व यत्न तत्व भोग तत्त्व प्रारब्ध तत्व आत्म तत्व वेद तत्व जीव तत्व चैतन्य तत्व कर्मतत्व - चैतन्य तत्व 'कर्मतत्व' काव्यात वामनपंडितांनी कर्माचे महत्व भावपूर्णतेने सांगितले आहे. Tags : karmatatvavaman panditकर्मतत्ववामन पंडित चैतन्य तत्व Translation - भाषांतर चैतन्य - भेद अवधेचि उपाधि भेदें एकात्मता तरिच बोलिलि नित्य वेदें तो भेद केवळ दिसे सुख दुःख भोगीं एकत्व सुप्तिलय आणि समाधि - योगीं ॥१॥ जें हालते सकळ तें प्रतिबिंब हालेहे जों उपाधिकरितां बहु भेद झाले तेतों जळें गढूळ होत समस्त जेव्हां बिंबाविणें प्रतिमुखा गति काय तेव्हां ॥२॥ बिंबात्मताचि सकळासि समस्तकाळीं भोगीच हे प्रतिमुखात्मपणें निराळीं सर्वत्र बिंब मन त्यावरि धांवता हे दुःखें सुखें प्रतिमुखासि न पाहता हे ॥३॥ ईशानीश उपाधि दोनिहि अहो बिंबामध्ये वर्तती जो आकाश मठांत सर्वहि घटीं आकाश तों येरिती आकाश प्रतिबिंबले घटजळीं तें तों जळें हालतो ऐसे हालति भोगमात्र दिसती जीवा असे पाहतां ॥४॥ स्वप्न - प्रबोधांतचि भोग याला सुषुप्तिकाळीं निज - सौख्य त्याला ॥५॥ बिंबेंचि ते जड उपाधि - सुषुप्तिकाळीं तेव्हां न हीं प्रतिमुखें उरती निराळीं स्वप्न - प्रबोध - समयांतहि याच रीती बिबें करोनिच सचेतन सर्व होती ॥६॥ बिंवैक्य सुप्तिसमयांत घडे जयाला तो मुक्त त्यास भव केविं म्हणाल बोला बुद्धी करुनि निज बिंब कळेल जेव्हां अज्ञान - मूळ भवबंध तुटेल तेव्हां ॥७॥ विद्या अविद्या उभय प्रकाशी तें बिंब - चैतन्य न एकदेशी या कारणें तत्वमतीति वाक्यें बिंबावरी वर्तवितो चिदैक्यें ॥८॥ असिपदें म्हणऊनिच बोलती सहसदैक्य असेचि बहु श्रुती तरिच तत्वमसी असि वैखरी अनुभवी मनिं मानिति हे खरी ॥९॥ वीना अहंकार न भोग होती प्रत्यक्ष हेतों अवघे पहाती दुःखी सुखी मी सुख दुःख मातें या प्रत्ययावीण न भोग यातें ॥१०॥ नखशिखाग्रचि दीसति मीपणें तितुकियांत सुखाऽसुख भोगणें तितुकियांतचि चित्प्रतिबिंबता अवधियास्थळिं केवळ बिंबता ॥११॥ प्रतिबिंब - अहंकृती - बिणें नघडे हे सुख - दुःख - भोगणें परि बिंब तयांतही असे अवकाशें घट पूर्ण हे जसे ॥१२॥ आत्मा धणी सर्व जडें प्रकाशी तो मीपणा भीतरि एकदेशी त्या मीपणें भोक्तृपणप्रतीती यालागिं तत्वें तदधीन होती ॥१३॥ व्हावें मला सुखचि दुःख कधीं नव्हावें बुद्धींद्रियें वश अहंपणिं या स्वभावें त्यामाजि भोगित असे प्रतिबिंब ज्याचें तें बिंब सर्वगत नित्य अनंत साचें ॥१४॥ देहाहुनी मीपण बात्द्य नाहीं तैसेंचि हें चित्प्रतिबिंब देहीं बाहेर जाती मन चित्त बुद्धी बिंबामधें त्यास चिदात्म - सिद्धी ॥१५॥ चित्त बुद्धि मन हीं अचेतनें आत्मयाचकरितां सचेतनें जीव तो नखशिखेपुढें असे नत्प्रकाशक न बात्द्य तो दिसे ॥१६॥ ब्रम्हांड - सांडी मन बुद्धि धांवे हें जीव चैतन्य न तेथ पावे चिदात्मया वांचुनि या जडाला बिंबाविणें प्रत्यय केविं बोला ॥१७॥ जिये दृष्टिनें हा स्व देहासि पाहे तिणें बात्द्यरुपासिही पाहताहे स्वदेहीं असे जीव चैतन्य तेणें पहातां पुढें चैतन्य केणें ॥१८॥शरीतांतुनी त्यासवें धावताहे म्हणावें तरी र्हास वृद्धी न साहे मनें धांव घ्यावी तसें थोर व्हावें न धावे तई अल्परुपें असावें ॥१९॥ म्हणाल कीं नेत्र असे शरीरीं तथापि हे पाहति रुप दूरी हा जीव तैसा मन इंद्रियेंहीं दुरील जाणे परि याचिदेहीं ॥२०॥ डोळे यथास्थित असोनिहि अंध होती दृष्टी विणें किमपि रुप न ते पहाती यालागिं नेत्र - युग दोनि जळीं शरीरीं हे पूर्ण दोनिहि दृगिंद्रियदृष्टि नीरीं ॥२१॥ जों उंच भूमि जळ तोंवरि धांवताहे जों आड ये किमपि तोंवरि दृष्टिं पाहे उंचस्थळीं परततें जळ आदळोनी पाहोन दृष्टि नयनाप्रति ये फिरोनी ॥२२॥ श्रोत्रांत तों पडति येउनि शब्द जेव्हां जीवात्मया वरुनि ते कळताति तेव्हां घ्राणासि गंध रसनेसहि येचरीती जीवात्मया वरुनि भोग समस्त होती ॥२३॥ तैसें दृगिंद्रिय जरी अति दूर जातें तें दुःख आणि सुख याचि तनूस देतें ऐसें तथापिहि दृगिंद्रिय जों स्वरुपें पावे न दूरिवरि तों दिसती न रुपें ॥२४॥ हे नेत्र गोलकचि केवळ दृष्टि होती देही असोनिहि तरी दुरुनी पहाती संकोचतें पसरतें जल - रुप दृष्टी तैसे न हे नयन जेविं तडाग - सृष्टी ॥२५॥ दूरील आत्म्यविण बात्द्य सृष्टी दीसेल कैसी बहुरुप दृष्टी हें ऊफराटें घडलें तुम्हांला चैतन्य तें कोटिल तेथ बोला ॥२६॥ हा जीव तों सकळ - संमत याचिदेहीं दृष्टीस दूरिगत हा तरि तेथ नाहीं चैतन्य कोण तरि दृष्टिस या प्रकाशीं ऐसेंच चित्त - मन - बुद्धिस दूरदेशी ॥२७॥ आतां म्हणाल रविमंडळ एकदेशी एवं तर्ही त्रिभुवनांत जसें प्रकाशी तैसाचि जीव तरि भास्कर - तेज जैसें हें जीव - तेजहि म्हणा बिजगांत तैसें ॥२८॥ हीं बुद्धि - चित्त - मन धांउनि येति मागें जीवप्रकाशहि फिरे जरि त्याचमागें सूर्यप्रकाश उपमा नघडे तयाला हा व्यापुनी त्रिभुवनीं रवितुल्य बोला ॥२९॥ ब्रम्हांड - रवर्पर विभेटुनि चित जातें जीवप्रभेंकरुनि तेस्थळिं तें पहातें त्याहूनिही मन पुढें ढकलेल जेव्हां हें तेज तेथ पहिलेंचि असेल तेव्हां ॥३०॥ तेव्हां अनंतपर्ण सर्वगतत्व आलें जीवप्रभेस तुमच्या इतुक्याच बोलें ते जीव तों अमित आणिक एकदेशी व्यापूनि ईश्वरहि येचरिती प्रकाशी ॥३१॥ हें व्यापिलें सकळ विश्व जसें परेशें जीवें तसेंचि अवघें निज - चित्प्रकाशें ऐसी अनेकविध बाधक युक्ति जेथें इत्यादि हे मिरवती न कुतर्क तेथें ॥३२॥ स्वयंप्रकाशें मन बुद्धि चेष्टी चिदंश तेव्हां फिरतांचि सृष्टी असा जरी व्यापक जीव जेव्हां सर्वत्र त्या भोगहि होय तेव्हां ॥३३॥ स्वयें जडा चेतनता असेना प्रकाश यावीण तया दिसेना संकोच विस्तार घडे न त्याला बात्द्यप्रकाशें मन केविं बोला ॥३४॥ हा जीव तों केवळ एकदेशी चिद्विंव तें सर्व मन प्रकाशी चैतन्यतुल्य प्रतिबिंब बिंबीं सिद्धांत हा वेट् - मताऽवलंबी ॥३५॥ सर्वत्र नाहीं प्रतिबिंब जेव्हां अणुत्व - वार्ताहि घडेल तेव्हां अणुत्ववादी तितुके बुडाले सिद्धांत तेथें अवघे उडाले ॥३६॥ उडाले तसे एक - जीवत्व - वादी न जीवत्व बिंबात्मतेलागिं वेदीं चिदात्मा हरी हे चिदाभास भोक्ते असें जाणती तेचि वेदांतवक्ते ऐशासही श्रुति अगम्यचि हें रहस्य श्रीकांत ज्यास न अनन्यपणें उपात्य भिंतीवरी मतिसवें निजतेज तैसें तें बोलती प्रतिमुखांतील तेज जैसें ॥३८॥ सूर्य - प्रभा प्रतिफळे जरि कांस्यपात्रीं तेथूनि भिंतिवरि तेज दिसेचि नेत्रीं ऐसें मन त्रिभुवनांतहि जेथजेथें जीव प्रकाशक तयांसहि तेथतेथें ॥३९॥ दृष्टांत योग्य परि येविषयीं नपावे एकत्र तें चहुंकडे न कदापि धांवे भिंतीवरी प्रतिमुखांतिल एकदेशी सर्वत्र धावन करुनि न तें प्रकाशीं ॥४०॥ जसी एकदेशी तसी जीव - ज्योती जगीं तीवरी धांवते चित्त - वृत्ती असें मानितां वस्ति देहींच राहे तरी ते प्रभा काय विश्वांत राहे ॥४१॥ तें तेज तों नपुरतें प्रतिबिंब जेथें भिंती प्रकाशित असेल अखंड तेथें तेथूनि तें नपरते तर्हि एकदेशी होऊनि जीव भुवनत्रय हा प्रकाशी ॥४२॥ असे जीव हे सर्वही एकदेशी जगद्वाप्त तेव्हां तयाच्या प्रकाशीं स्वरुपीं जसें व्यापिलें हें मुकुंदें प्रकाशें तसीं व्यापिलीं जीव - वृंदें ॥४३॥ म्हणोनीच दृष्टांत हा स्थूळ देहीं घडे बोध हा येस्थळीं येत नाहीं चिदर्कप्रभा सूक्ष्म - देहीं तथापी पडे तेज तें सर्वदा स्थूळरुपीं ॥४४॥ दिसे स्वप्नकाळीं दुजें स्थूळ जेव्हां पडे आड या स्थूळ - देहासि तेव्हां न भिंतीवरी कांस्य - पात्रार्क ज्योती दिसे त्यावरी जे मधें आड येती न निद्रेंत हें आठवे स्थूल जेव्हां दिसे कल्पनेचेंच तें स्थूल तेव्हां घरी तें मनांतील चैतन्य त्याला नदेहासि यातें पडे आड याला ॥४६॥भिंतीवरी प्रतिमुखांतिल तेज जेथें दोहींमध्ये किमपि ये जरि आड तेथेम तें तेज त्याचिवरि तेसमयीं प्रकाशी भिंतीवरी मग तयास्तव एकदेशी ॥४७॥ हे दीप्ति तों प्रतिमुखांतिल एकदेशी त्यामाजि येति तितुक्यासहि ते प्रकाशी ज्यालागिं आवरण मीपण लिंगदेहीं स्थूळावरी तदभिमान पुढें न कांहीं ॥४८॥ दुःखी मी अथवा सुखी चतुर मी अज्ञान मी मी सुधी तो हा प्रत्यय मीपणाहुनि दुजा हा जीव नेणें कधीं चैतन्य - प्रतिबिंब यास्तव नसे स्थूळापुढें सर्वथा हें प्रत्यक्ष पुढें तयास नदिसे दुःखासुखाची कथा ॥४९॥ ते अंतःकरणीं अहंपण तया सूक्ष्माम धें राहणें किंवा हे प्रतिबिंब - ज्योति पडते स्थूळीं तया पाहणें या स्थूळाकरितां अहंपणिं जिवा दुःखें सुखें भोगणें दृष्टीला नदिसे मनें त्रिभुवनीं जेजे स्थळीं हिंडणें ॥५०॥ ध्रुव - पद शशि तारा दीसती याच दृष्टी मन तरि फिरता हे जोंवरी ब्रम्ह - सृष्टी अति जड मन दृष्टी चित्प्रकाशत्व त्याला प्रतिमुख तरि देहीं तेस्थळीं कोण बोला ॥५१॥मना बुद्धिदृष्टीसही बात्द्यदेशीं स्वयें बिंब विश्व - प्रकाशें प्रकाशी असी सूर्यतेजावरी दृष्टि धांवे असें तेज जेथें जरी हे नपावे ॥५२॥ असें बिंबचैतन्य हें सर्व आहे म्हणोनीच चंद्रादिकां दृष्टि पाहे मनोवृत्तिही त्यावरी दूरि धांवे प्रकाशी तिला तेंचि तें जेथ पावे ॥५३॥ स्व - देहासही तोचि आत्मा प्रकाशी असे भोगमात्रार्थ हा एकदेशी घटीं व्यापकाकाश तो तों न हाले जळीं दूसरा दीसतो तोचि डोले ॥५४॥ असीं सर्व चोवीसही जीवतत्वें तया व्यापकें वर्तती चेतनत्वें तयां जीव होऊनियां जीव भोगी पहाती प्रकाशत्व बिंबींच योगी ॥५५॥ विनारज्जु तो सर्पदृष्टीं दिसेना विनारज्जु तो सर्प कांहीं असेना दिसेना जसें ज्याविणें विश्व दृष्टीं असें सर्व मिथ्या तयावीण सृष्टी ॥५६॥ दिसे रज्जुनें सर्प ऐशा प्रकारें चिदात्म - प्रकाशेंचि दोन्ही शरीरें दिसे दोंप्रकारे चिदात्मत्व तेंही असे भोग एका दुज्या भोग नाहीं ॥५७॥ भोक्ता परिछिन्न न सर्वठायी देहींच जो व्यापक हातपायीं हा जीव आणीक जडे प्रकाशीं तें बिंब सर्वत्र चिदंबुराशी ॥५८॥ घेऊनि सूक्ष्मतनुतें प्रतिबिंब जातें हें स्थूल रज्जुवरि सर्प तसें रहातें बिंबें प्रकाशक असे शव जेविं दृष्टी बिंबेंच येचरिति सूक्ष्म - शरीर - सृष्टी ॥५९॥ बिंबैक्य चित्प्रतिमुखासि सुषुप्ति जेव्हां बिंबात्मतेंकरुनि दोनिहि देह तेव्हां बिंब प्रकाशकचि चित्प्रतिबिंब नाना ते जीव जीवपण त्याप्रति बोलवेना ॥६०॥ बिंबांत त्या प्रकृतिच्या अतिश्रुद्ध विद्या हे दूसरी प्रतिमुखात्मपणें अविद्या बिंब प्रकाशक उपाधियुगीं तथापी येना उपाधिगुण अन्य - उपाधि रुपीं ॥६१॥ विविध इंद्रिय एक चिदात्मता परि नघे रस नासिक तत्वता न रसनेसहि गंध कधी कळे प्रकृति शुद्ध तसी रसना कळे ॥६२॥ चक्षुः श्रवा सर्प म्हणाल कैसा हा आइका येथ विचार ऐसा दों इंद्रियां गोलक एक जैसें जिव्हेंत वागिंद्रिय - कार्य तैसें ॥६३॥ इंद्रियें दशहि लिंगशरीरीं गोलकें दिसति भोगविकारीं स्थूल जीव उभयेंद्रिय भोगी श्रोत्र - कर्म नयनेंद्रिय भोगी ॥६४॥ जसीं इंद्रियें वेगळीं लिंगदेही तथी शक्ति अन्वोन्यतों होत नाहीं तशा जीववृदी उपाधी अविद्या तथा ईश्वराची तथालागिं विद्या एवं प्रकाशक जडें अवधींच बिंबी हे जीव तों सकळ - दुःख - सुखाऽवलंबी बिंबात्मतेकरुनि वर्तति वृत्तिनाना जीवेश्वरात्मपण भिन्न जसें असेना ॥६६॥ म्हणुनि तत्वमसीति मुखें श्रुती जड - निषेध चिदैक्यचि बोलती असदुपाधि तथा सदुपाधितो परि निषेध अभेदचि साधतो ॥६७॥ जरि अभेदविलक्षणता कसी तरि उपाधिविलक्षणता असी वदति दोन सुपर्ण जया श्रुती जड उपाधिविलक्षण बोलती ॥६८॥ भोगार्थ जीव प्रतिबिंब झाला अद्वैतही द्वैतहि त्यासि बोला अभेद तो वास्तव भेद भोगी बिंबात्मता जाणति आत्मयोगी ॥६९॥ प्रकाशें जसी सूर्यतेजेंचि दृष्टी दिसे तीस त्याऊपरी सर्व सृष्टी ॥७०॥प्रकाशे जसी सूर्यतेजेंचि दृष्टी प्रकाशे तसी सूर्य - तेजेंचि सृष्टी तई सृष्टिचें ज्ञान दृष्टीस होतें असें चित्त चैतन्य योगें पहातें ॥७१॥ जई दृष्टि हे सूर्यमात्रासि पाहे न कांहीं तयामाजि हे सृष्टि आहे असें चित्त चैतन्यमात्रासि लक्षी तदाकार होऊनि वृत्तीस भक्षी ॥७२॥ तदाकारता होय चित्तास जेव्हां दिसेना चिदाभास त्यामाजि तेव्हां नदीचें जई पावते नीर तीरीं न तेव्हा दिसे दूसरेंतीर नीरीं ॥७३॥ दरडिचें प्रतिबिंब निरीं दिसे जळ चढे दरडीस तई नसे मन अनंतसुखांत मुरे जई अनुभवीं प्रतिबिंब नुरे तई ॥७४॥जों मीपण - स्फुरण तों प्रतिबिंब तेथें आपादमस्तक अहंकृतिवृत्ति जेथें वृत्तीस अंत नकळोनि मुरेल जेव्हां तेव्हां अहंपण न वा प्रतिबिंब तेव्हां ॥७५॥हा निर्विकल्पक - समाधि निवृत्ति जेथें दूजा समाधि सविकल्पक - वृत्ति तेथें नाना घटादि विकृती तरि एक माती मध्यें मृषा विकृति मातिच आदि अंतीं ॥७६॥समाधींत या वृत्तिही ब्रम्ह होती घटादिप्रपंची जसी एक माती दिसेना असे तीविणें कुंभ जैसा विना ब्रम्हचैतन्य हा भाव तैसा ॥७७॥ हरीनेंच जो चित्सुधाग्रंथ केला असे तेथ विस्तार हा वर्णियेला स्थिती या समाधीमधें योगियांसी दिसे केवळ ब्रम्ह हें विश्व त्यांसी ॥७८॥ घडे येथही ऐक्य जीवासि बिंबीं जई सत्व विश्वात्मकत्वावलंबीं चिदाभास भोगार्थ त्या सत्व - नीरीं अहंकारऊर्मीत हाले शरीरीं ॥७९॥ असे बोलिलें स्पष्ट हें भॊक्तृतत्वीं चिदाभास भोगी दिसे मिश्रसत्वीं घडे नित्य अभ्यास बिंबात्मयोगी गुणी भोग भोगूंनिही तो न भोगी ॥८०॥ ज्ञानाऽभिमान कितिएक धरोनि चित्तीं अभ्यास - वर्जित - मुखें वदती कुयुक्ती विप्रत्व - विस्मृति पडे तरि तो द्विजाती येणेंरितीच सधवा विधवा नहोती ॥८१॥ हे बोल फोल परि मानुनि खोल लोकीं अभ्यास टाकुनि दिल्हे चिदचिद्विवेकीं बुद्धीस हे स्मरण - विस्मरणादि धर्म ब्रम्ह प्रकाशक असें नकळेचि वर्म ॥८२॥ विप्रत्व विप्र विसरोनि न शूद्र होती तैशाचि नापितगृहा सधवा नजाती ब्रम्हत्व - भाव विसरेलचि बुद्धि जेव्हां देहात्म भाव सहजें तिस सिद्ध तेव्हां ॥८३॥ अभ्यास यास्तव सदा करिताति योगी ब्रम्हात्मभाव दृढ पावति वीतरागी अभ्यासती सगुण निर्गुण विश्वरुपी ब्रम्हात्मभाव निज - चित्सुख - सत्वरुपीं ॥८४॥ जो ग्रंथ वामन - मुखें जगदात्मदेवें केला असे निगमसार यथार्थ नावें अभ्यास तेथ कथिले हरि - भक्ति - भावें ते मानसीं धरुनि जीतचि मुक्त व्हावें ॥८५॥ अध्याय हे सकळ आठहि अष्ट सिद्धीं श्रोत्यांस येथ निजलाभ सुधा - समृद्धी कर्मे समर्पुनि हरीप्रति श्रुद्ध सत्वीं व्हावें विमुक्त इतुकें फळ कर्मतत्वीं ॥८६॥ हा कर्मतत्व हरिनें रचिला प्रबंध श्रुत्यर्थसार हरि जो जन - कर्म - बंध जो श्री त्रिविक्रम जगीं जगदात्मबंधू तो वामन प्रभु कृपाऽमृत - पूर्ण - सिंधू ॥८७॥स्फूर्ति त्रिविक्रमपणें श्रुतिसार तत्वीं संक्षेपतें दिसतसे स्मृति वामनत्वीं तोचि त्रिविक्रम असा पसरे त्रिलोकीं ग्रंथार्थ संत - त्दृदयीं स्व - मुखाऽवलोकीं ॥८८॥ज्याच्या स्मृतीकरुनी आणिक नाम घेतां दान क्रिया तप मखादिकही करीतां जें न्यून तें सकळही परिपूर्ण होतें ऐसें स्मृती वदति तो रचणार यातें ॥८९॥ ग्रंथासि या करुनि आपण आपणातें तो अर्पितो नवल केवळ येथ होतें ऐसी समुद्र - लहरी पडते समुद्रीं तैसीच वृत्तिलहरी असि चित्समुद्रीं ॥९०॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP