मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|कर्मतत्व| यत्न तत्व कर्मतत्व फळ तत्व यत्न तत्व भोग तत्त्व प्रारब्ध तत्व आत्म तत्व वेद तत्व जीव तत्व चैतन्य तत्व कर्मतत्व - यत्न तत्व 'कर्मतत्व' काव्यात वामनपंडितांनी कर्माचे महत्व भावपूर्णतेने सांगितले आहे. Tags : karmatatvavaman panditकर्मतत्ववामन पंडित यत्न तत्व Translation - भाषांतर यत्नाविणें म्हणति होइल सौख्य कैसें यत्नाविणेंचि सुख बोलति एक कैसें हें तत्त्वता नकळतां परमार्थ कैंचा एकांत निश्वय घडेल कसा मनाचा ॥१॥ यत्नेंविणें फळ कदापिहि सांपडेना यत्नेंकरुनिहि अहो फळ हें घडेना गूढार्थ हा त्हदयिं तोंवरि ऊघडेना हें कर्म - तत्त्व निज - दृष्टिस जों पडेना ॥२॥ बीजेंविणें फळ कदापि नये द्रुमाला तें बीज पूर्विल जयास्तव वृक्ष झाला बीजें नवीं नव्हति साधन या फळासी तैसा अलीकडिल यत्न वृथा प्रयासीं ॥३॥ हा देह - वृक्ष निज - पूर्विल - कर्म - बीजें त्यावीण साधन सुखादि - फळा न दूजें बीजें नवीं तरु फळा न निमित्त जैसीं कर्मे नवीं नव्हति कारण या फळांसी ॥४॥ बीजें नवीं नव तरु सृजितील जेव्हां येती फळें मग तरुसि तयासि तेव्हां बीजांतुनींन उपजे तरु तो तथाला येती फळें तरिच सार्थक यत्न बोला ॥५॥ हे यत्न तों सकळही क्रियमाण होती होऊनि संचित शरीर तरु करीती दुःखें सुखें तरुसित्या फळरुप येती हे यत्न या तनु - तरुस फळें नदेती ॥६॥ पूर्वील यत्न फळ - दायक या शरीरीं हे यत्न होतिल पुढें सुख - दुःख - कारी याकारणें सकल टांकुनि लोक - धंदा चित्तीं धरा दृढ मुकुंद - पदाऽरविंदा ॥७॥ कोटी अनेकविध यत्न नृथाचि गेले यत्नाविणेंचि कितिएक कृतार्थ झाले दुःखें सुखें द्विविध हो फल पूर्वकर्मे यत्नांसि यत्न म्हणती नकळोनि वर्मे ॥८॥यत्नें श्रमें करुनि दुःख - समूह होती ते पूर्व - पातक - मुळेंचि फळासि येती यत्नेंकरुनि अथवा सहजेंचि झालीं तें तें सुखें स्वकृत तींचि फळासि आलीं ॥९॥ पापें प्रयत्न घडतां सुकृतें सुखातें पावे प्रयत्न सुख - रुप गमे तयातें जो पुण्यहीन करि यत्न सुखा न भेटे त्याला प्रयत्न अवधा अति दुःख वाटे ॥१०॥ दैवीप्रयत्न जन एक करुनि कांहीं विद्या कळा सुत धनादिक याचि देहीं पावोनियां सफळ मानिति त्या श्रमातें तेंहि स्व - पूर्व - फळ हें न कळे तयातें ॥११॥ कोणी तपें जप पुरश्वरणें विचित्रें घेऊनि वेचिति धनें अति अल्पमात्रें त्यांचें तयांसि नफळोनि फळे परांला आतां प्रयत्न फळ - दायक केविं बोला ॥१२॥ तें कर्म सांग नव्हतां नफळे म्हणावें तेव्हां फळप्रद कसें दुसर्यासि व्हावें ज्याचें तयासि फळ तें जरि देत नाहीं झालें परासि फळ पूर्विल कर्म तेंही ॥१३॥ निष्काम तो फळ न इच्छितसे म्हणावें वेचूनि पुण्य परवित्त किमर्थ घ्यावें निष्काम जो करुण तो पर - घान - कर्मे कां मारणादिक करील अहो अधर्मे ॥१४॥ कांहीं परार्थ जपतां धन - लाभ झाला मंत्रादि - सिद्धि तितुकीच गमे तयाला राज्यादि लाभ इतरासि तयाचि कर्मे कां यासि अल्प फळ हें नकळेचि वर्मे ॥१५॥ या कारणें सकळ लौकिक यत्न जैसें दैवी - प्रयत्नहि सकाम समस्त तैसे निष्काम मात्र फळ - दायक या शरीरीं जेणें प्रसन्न हरि कर्मज - बंध - हारी ॥१६॥जे काम्य यत्न तितुके क्रियमाण होती होऊनि संचित पुढें फळ यासि देती त्यामाजि लौकिक अमंगळ दैव यत्नें प्रारब्धरुप भव - सागर - सौख्य - रत्नें ॥१७॥ यालागिं काम्य निगमाऽगम याचि देहीं जे बोलती सकळ चालवणेंचि तेही मानोनि सद्य - फळ पुण्य जनीं करावें तेणें पुढें सुख अशा करुणार्द्र - भावें ॥१८॥ जें ज्यासि काम्य फळलें म्हणती पुराणीं तेंही जनासि मुनि दाखविती शिराणीं काम्यें जयासि फळ सद्य तया शरीरीं तें पूर्व - पुण्य नव - यत्न - निमित्त - धारी ॥१९॥पुत्रेष्टि काम्य मरवही करितां प्रयत्नें वंध्या वधू प्रसवती न सुतादि रत्नें वंध्याच त्या नव्हति ज्यांस घडे प्रसूती वंध्याच ज्या सुत तयां सहसा न होती ॥२०॥ ज्यां कां उपासक - जनां कवितादि - शक्ती त्यां सर्व पूर्व सुकृतेंचि सदुक्त उक्ती घोकोनि यत्न करितां फळ पूर्वकर्मे दैवी प्रयत्नहि तसा इतुकींच वर्मे ॥२१॥ घोकोनिही जन निरक्षर एक झाले तैसेच दैविकहि यत्न नृथाचि गेले जो यत्न ज्यास फळला म्हणवूनि वाटे तें पूर्व - पुण्य - फळ काळ - बळेंचि भेटे ॥२२॥ दोन्हीं प्रयत्न करितां श्रम दुःखरुपें देवोनि भोग सरती निज - पूर्व - पापें त्यामाजि लौकिक पुढें करि पाप - वृद्धी शास्त्रोक्त काम्य करितां करि पुण्य - सिद्धी ॥२३॥ तस्मात् प्रयत्न सुख दोनिहि पूर्व - कर्मे पापेंचि दुःख सुख तें सुकृतें स्व - धर्मे जैसेंचि पाप फळ दुःख उगेंचि येतें तैसेंचि पुण्यफळही उगलेंचि होतें ॥२४॥ यत्नें करोनि निज दुःख जरी निवारी होणार दुःख नचुकेचि तरी शरीरीं सेऊनियां वन सुखें त्यजिलीं विरक्तीं त्यांलागिंही न सुटती सुखरुप - भक्तीं ॥२५॥ जे ज्ञान - निष्ठ नर ते करिती न कांहीं प्रारब्ध - भोगचि तयां क्रियमाण नाहीं यत्नादिरुप - निज - पाप - फळासि तेही होऊनियां अवश भोगिति दुःख देही ॥२६॥ ब्रम्हज्ञ अज्ञ सम भोगिति पुण्य - पापें अज्ञासि जोडति नवीं क्रियमाण - रुपें अज्ञ प्रयत्न करिती क्रियमाण - धर्मे तें ज्ञानियासि नघडे इतुकेंचि वर्मे ॥२७॥ अज्ञानिया द्विविध यत्न घडोनि येती पूर्वार्जितें स्व - दुरितें कितिएक होती त्यावेगळा करि सदां सुख - लाभ - धंदा तो ज्ञानियासि नघडे भजतां मुकुंदा ॥२८॥ होणार होइल अशा दृढ - निश्वयातें घेतां प्रयत्न नघडे सुख - निस्पृहातें देहादि - रक्षण - निमित्तचि यत्न कांहीं लागे तयासि तरि पूर्विल पाप तेंहीं ॥२९॥ कर्मानुरुप सकळासहि बुद्धि होते ज्ञात्यासही तदनुरुपचि वर्तवीते तीचा प्रवर्तक जगद्गुरु तीस चाळी ते देह वर्तवि सुखाऽसुख - भोग - काळीं ॥३०॥ यत्नादि - रुप निज पूर्वील पाप भोगी त्यावेगळे नकरि यत्न कदापि योगी प्रारब्ध दुःख सुखही इतरांसि जैसें देहाऽभिमान गळतां नघडेचि तैसें ॥३१॥ दुःखें सुखें द्विविध दैहिक दुर्निवारें देहाऽभिमान - रचितें चुकती विचारें जो अज्ञ तो द्विविधही सुख दुःख भोगी जें दुर्निवार तितुक्याचि फळासि योगी ॥३२॥ मानाऽपमान सुख दुःख सुतादि देहीं द्रव्यादिलाभ अथवा धन - हानि कांहीं देहात्मते करुनि हें सुख दुःख वाटे देहाऽभिमान गळतां न कदापि भेटे ॥३३॥ देहीं क्षुधा - ज्वर - तृषादिक दुःख येतें स्रग्गंधभोग सुरतादिक सौख्य होतें इत्यादि दुःख सुख जें बहुता प्रकारें देहाऽभिमान - रहितांसहि दुर्निवारें ॥३४॥ गेलें अर्हषण तथापिहि देह त्याचा ज्ञान्यासही करि मृषा फळ - भोग साचा बाधों सके न सुख - दुःख पणें ममत्वां ज्ञान्यास हें हरि पुढें निवडील तत्त्वा ॥३५॥ अध्याय हा रचियला दुसरा परेशें जे वाचिती नव्हति दुःखित यत्नलेशें वेदांत - वेद्य - पुरुषा भजती सुचितें हा यत्न - तत्त्व - अभिधान - कथा - निमित्तें ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP