मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


किं भद्रं किमभद्रं वा, द्वैतस्यावस्तुनः कियत् ।

वाचोदितं तदनृतं, मनसा ध्यातमेव च ॥४॥

जें जन्मलेंचि नाहीं । तें काळें गोरें सांगूं कायी ।

ग्रहणेवीण कांहीं । खग्रास पाहीं दिसेना ॥७४॥

उखरीं भासलें मृगजळ । तें खोल किंवा उथळ ।

मधुर कीं क्षार केवळ । सांगतां विकळ विवेक ॥७५॥

तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । तेथील दोष आणि गुण ।

निवडिती जे सज्ञान । ते जाण निमग्न अज्ञानामाजीं ॥७६॥

जेवीं आंवसेचिये रातीं । अंधारा जोखूं आंधळे येती ।

त्यांसी जोखितां दोंही हातीं । एकही रती तुकेना ॥७७॥

तेवीं प्रपंच मिथ्यापणें । तेथ कानीं जें ऐकणें ।

कां डोळां जें देखणें । रसना जें चाखणें, स्पर्शणें अंगें ॥७८॥

हाताचें घेणेंदेणें । पायांचें जें चालणें ।

वाचेचें जें बोलणें । कल्पणें मनें तें मिथ्या ॥७९॥

अहंकाराचा बडिवार । चित्ताचा चिंतनप्रकार ।

बुद्धीचा विवेकविचार । हा समूळ व्यवहार मिथ्या तेथ ॥८०॥

चित्रीं जळ आणि हुताशन । अत्यंज आणि ब्राह्मण ।

व्याघ्र आणि हरिण । भासतांही जाण भिंतीचि भासे ॥८१॥

तेवीं हा प्रपंच द्वैतयुक्त । भासतां भासे वस्तु अद्वैत ।

शुभाशुभ कैंचें तेथ । ब्रह्म सदोदित परिपूर्ण ॥८२॥

केळीचा दिंड उकलितां । जो जो पदर तो तो रिता ।

तेवीं देहादि प्रपंच विवंचितां । मिथ्या तत्त्वतां मायिक ॥८३॥

मिथ्या प्रपंचाच्या ठायीं । शुभाशुभ तें लटिकें पाहीं ।

सत्य वस्तु ठायींच्या ठायीं । शुभाशुभ नाहीं अणुमात्र ॥८४॥

जो शुभाशुभ म्हणे आहे । त्याची कल्पना त्यासंमुख होये ।

निजकल्पनामहाभयें । जन्ममरण वाहे लटिकेंचि ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP