मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तैजसे निद्रयाऽऽपन्ने, पिण्डस्थो नष्टचेतनः ।

मायां प्राप्नोति मृत्युं वा, तद्वन्नानार्थदृक् पुमान् ॥३॥

इंद्रियें जन्मलीं रजोगुणीं । तन्मात्रा विषयो तमोगुणीं ।

तीं इंद्रियें विषय सेवुनी । ठेलीं निद्रास्थानीं निश्चळ ॥६८॥

जागृतीं ’विश्व’ अभिमानी । दोनी जाती मावळोनी ।

तेव्हां मिथ्या प्रपंच स्वप्नीं । ’तैजस’ अभिमानी विस्तारी ॥६९॥

स्थूल देह असे निश्चळ । स्वप्नीं मनचि केवळ ।

विस्तारी गा भवजाळ । लोक सकळ त्रिलोकीं ॥७०॥

त्या स्वप्नामाजिले सृष्टीसी जाण । उत्पत्ति स्थिति आणि निदान ।

स्वयें देखतांही आपण । जन्ममरण तें मिथ्या ॥७१॥

तेवीं हे अविद्या दीर्घ स्वप्न । वृथा विस्तारी अभिमान ।

तेथील मिथ्या जन्ममरण । तूं ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥७२॥

तुझ्या निजस्वरुपाच्या ठायीं । भेदाची तंव वार्ताही नाहीं ।

तेथील शुभाशुभ कांहीं । तुज सर्वथा पाहीं स्पर्शेना ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP