शनिवारचें अभंग, पद व भजन

शनिवारचें अभंग, पद व भजन


शनिवारचें मारुतीचें भजन

नमो वज्रमूर्तें, नमो रुद्रमूर्ते । तेऽस्तु कीशाऽऽकृते नष्टजूर्ते ॥ध्रु०॥

अंजनीगर्भजो योऽभवद्वायुजो, योहि रुद्रांश जो दुष्टहंता ।

जानकीशोकहृत् राकचंद्राकहृत् सत्वमस्मानवाधोरमूर्ते ॥१॥

पिप्पलादस्मृतेरिव तदा यत्स्मृते । सार्धसप्‍ताब्धपूर्वाकिंभीते ॥

भवति नाशो यथा नारसिंहस्तथा दुष्टविध्वंसकोऽस्युग्रमूर्ते ॥२॥नमो०

शनिवारचा मारुतीचा अभंग १ ला

अंजनीच्या सुता, ये बा हनुमंता । स्वरें वातजाता जाताह्लादा ॥१॥

नादा परिसुनी ज्याच्या धाकें मनीं । राक्षस भिऊनी वनीं जाती ॥२॥

जाती बुभुःकारें त्वरें भूत सारें । तें रुप गोजिरें बरें दावीं ॥३॥

दावी क्रूरां भय, तें रुप अभय । चित्तीं असो ध्येय तें यशस्वी ॥४॥

यशस्वी जो रामदूत बलधाम । मुखीं वदे राम राम नित्य ॥५॥

नित्य सीताशोक हारक विवेक-युत वाततोक दुःख वारो ॥६॥

शनिवारचा मारुतीचा अभंग २ रा

भवाटवीमध्यें स्वानुभूति सीता । घेउनी आटतां आत्माराम ॥१॥

विषय मृगतृष्णा भूल घाली जेव्हां । वाव मिळे तेव्हां कपटिया ॥२॥

राजसाहंकारें स्वानुभूति सीता । नेली हनुमंता, आतां धांवें ॥३॥

भवाब्धि लंघोनी लिंगदेह लंका । जाळीं तूं विवेका एक्या हांकें ॥४॥

साधनशिळेनें तूं सेतू बांधून । आत्माराम घेऊन युद्ध करी ॥५॥

कामादि असुर मारुनी दे आता । स्वानुभूति सीता वासुदेवा ॥६॥

भजन :- अंजनिसुता जय हनुमंता । दर्शन दे तव राघवदूता ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP