गुरुवारचे अभंग, पद व भजन

गुरुवारचे अभंग, पद व भजन


गुरुवारचें दत्ताचें पद

नरा दत्तगुरु हें परब्रह्म आहे । होई जागृत उगा फससि मोहें ॥ध्रु०॥

दत्तगुरु, मन्मनीं, दत्तगुरु लोचनीं । दत्तगुरु यद्वचनिं भरुनि कानीं ॥

दत्तगुरु बाहेरी, दत्तगुरु अंतरीं, दत्त सर्वांतरीं भरुनि राहे ॥१॥

ब्रह्म हा दत्तगुरु, विष्णु हा दत्तगुरु । रुद्र हा दत्तगुरु सत्य आहे ॥

दत्तगुरु तारक, दत्तगुरु कारक । शक्तिधर लोकसाक्षीच आहे ॥२॥

दत्तगुरु वांचुनी किमपि नाहीं जनीं । दत्तगुरु वांचुनी सुरहि नोहे ॥

दत्तगुरु वांचुनी काय फळ वांचुनी । जाय फळ सोडुनी भोगिता हे ॥३॥

माय फळ पाजिते, काय फळ होय तें । जाय फळ पुण्य तें भोग नासे ॥

मोह फळ दे त्यजुनि, नाहिं फळ पाहुनी । म्हणुनि तूं दत्तगुरुपाद पाहें ॥४॥

भोग खोटा नको, यागताठा नको । योगताठा नको धरुं विमोहें ॥

दत्तगुरु वांचुनी चित्त न धरीं जनीं । दत्तगुरु घे मनीं भरुनि स्नेहें ॥५॥

या युगीं साधनें वाउगीं गुरुविणें । ना उगीं तूं शिणें शास्त्रमोहें ॥

दत्तगुरु देव हा, दत्तगुरु तारि हा । स्वातुभवें वासुदेवचि वदे हें ॥६॥

गुरुवारचा श्रीदत्ताचा अभंग

गणेश गकार हुताश रकार रकार । लक्ष्मीश उकार गुरुदत्ता ॥१॥

अविद्या गुकार तन्नाशक रुकार । गुरुदत्त परपारदाता ॥२॥

गुरुदत्त माता, गुरुदत्त पिता । तोचि भयहर्ता त्राता माझा ॥३॥

गुरुपादपाथ तेंचि माझें तीर्थ । गुरुदेव समर्थ स्वार्थ दाता ॥४॥

गुरुदत्तनाम तेंचि पुण्यधाम । जें घेतां कुकर्म होम करी ॥५॥

गुरुदत्तसेवा परिहरी भवा । संसाराब्धिनावा भावार्थिया ॥६॥

वासुदेव म्हणें येणें कोण शिणे । गुरुविणें जिणें भेणें तेंचि ॥७॥

भजन

दत्त गुरो जय दत्त गुरो । दत्त गुरो जय दत्त गुरो ॥

N/A

N/A
Last Updated : January 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP