नका तोडू हो झाडी
झाडी तोडून कधी कुणाचे, झाले का हो बरे ?
नका घालवू छाया वाया, उजाड होतिल वने !
निसर्ग-साधनसंपत्तीला, होऊ मग वंचित
प्रदूषणाचे पाप कशाला, उगाच करता बरे !
नका तोडू हो झाडी
दूषित पाणी, हवा विषारी, जमीन होते मुरमाड
पशुपक्षी मग कसे राहतील, वनात असल्या ओसाड !
बोला तर मग पुढील पिढीला, असा वारसा घ्यावा का ?
होईल काहो प्रगती सांगा, देशाची मग कधी ?
नक तोडू हो झाडी
असो शेतकरी, कुणी कामकरी, गरीब अथवा श्रीमंत
प्रेमाची बरसात करा हो, निसर्गावरी खरोखरी
जलसंधारण, मृद्संधारण, वनीकरण करणे
मनी आपुल्या सदैव रुजवा, वृक्षांना जगविणे
नका तोडू हो झाडी
पाणी अडवा, पाणी जिरवा, थेंब थेंब जिरवा
’झाडे लावुनि झाडे जगवू’ हाच मूलमंत्र हवा
बरसतील मग पाऊसधारा, भिजतील चिंब वने
यास्तव पर्यावरण काळजी, घ्या हो एकमुखाने
नका तोडू हो झाडी