एकदा बाहुलीचं ठरलं लग्न
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं
बाहुलीची सासू बसली रुसून
नणंद पडली पाय घसरुन
भटजींना नेसताच येईना सोवळं
बँण्डवाल्यांनी केलं काळं
नवरा बसला दडी मारुन
मुहूर्ताची वेळ गेली टळून
वर्हाडी म्हणतात, काय करावे
लग्न नसले तरी जेवण हवे
बोलाची कढी बोलाचा भात
आपला हात जगन्नाथ !