बाभळीच्या झाडाखाली गाण्याची मैफल
बाजाची पेटी घेऊन बसले अस्वल
कोल्ह्याने तबल्यावर मस्त थाप दिली
’वा !’ म्हणून सशाने मान डोलाविली
दाढीला हात लावून वानर म्हणाला
’गाढवबुवा, गोड गाणे ऐकवा आम्हाला !’
गाढवबुवा रुबाबात ठाकठीक बसला
खाकरुन थोडे त्याने घसा साफ केला
गाढवबुवाने घेतली एक लांब तान
भसाडया त्या आवाजाने हादरले रान
घाबरलेला वाघोबा टुणकन् उडाला
मैफलीच्या मध्यभागी धपकन् पडला
भ्यालेल्या मैफलीचे वाजले हो बारा