आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो ॥धृ॥
निळ्या आभाळी सांज सकाळी
जगताचा राजा रवी रंग फेकतो ॥१॥
पाऊस वेळी ढगांच्या ओळी
थुई थुई पक्षीराजा मोर नाचतो ॥२॥
आंब्याच्या वनी पानी लपुनी
उंच सुरांनी कोकिळ कुहूऽ बोलतो ॥३॥
पायी पैंजण हाती टिपरी
कुंजवनी बाळराजा कृष्ण खेळतो ॥४॥