बालगीत - गोरी पान फुलासारखी छान...

बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children


बालगीत

गोरी पान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी
हरिणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बान
दादा मला एक वहिनी आण

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान
दादा मला एक वहिनी आण

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:24:23.0000000