विधी - २९
धरा पूजन
वास्तुशांती विधी पूर्ण झाल्यावर यजमान पत्नीला तिच्यासमोरील जमिनीस पाण्याने सारवावयास सांगावे. त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढण्यास सांगावे. त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढण्यास सांगावे. त्यावर एक सुपारी ठेवावी. त्यानंतर त्या स्वस्तिकावर धरादेवीची पूजा करावी.
संकल्प - अनेन मयाकृतेन देशकालादि अनुसारतः कृत वास्तुशांति होमहवनाख्येन कर्मणा सांगता सिद्ध्यर्थं तत्संपूर्ण फल प्राप्त्यर्थं धरा पूजनम करिष्ये ।
उदक सोडावे.
सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्धृता । अनंत सस्य दात्री या तां नमामि वसुंधराम् ।
श्री धरादेव्यैः नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमम् समर्पयामि । धूपं दीपं समर्पयामि ।
नैवेद्यार्थे फलाहार नैवेद्यं समर्पयामि । फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि । नमस्करोमि ।
धरादेवीस गंध, अक्षता, हळद-कुंकू, अक्षता, फुले वहावीत. धरादेवीस साडी, सवाष्ण वाण वगैरे अर्पण करावे. धूप-दीप दाखवावा. एक फळाचा नैवेद्य दाखवावा. या घरात सुख-शांति समृद्धी प्राप्त व्हावी या करिता भूमीची प्रार्थना करावी. नमस्कार करावा.
सर्व देवमयं वास्तु सर्व देवमयं परम् ।
असा मनामध्ये भाव करून आग्नेय कोनात खड्डा खणावा.