मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
स्थापित देवता विसर्जनम्

स्थापित देवता विसर्जनम्

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - २७

आचार्यास दक्षिणा व गोदानम्

अनेन मयाकृतेन देशकालादि अनुसारतः कृत वास्तुशांति होमहवनाख्येन कर्मणा सांगता सिद्ध्यर्थं तत्संपूर्ण

फल प्राप्त्यर्थं हवन कर्तुकेभ्यः ब्राह्मणेभ्यः यथाशक्ति दक्षिणा प्रदानं करिष्ये । तेषां अक्षतैः पूजायिष्ये तथा च कर्म कर्त्रे आचार्याय निष्क्रय द्वारा गोप्रदानं करिष्ये ।

पुढील मंत्रानंतर दोन नाणी हातावर पाणी घेऊन पात्रात सोडावीत.

यज्ञसाधन भूताया विश्वस्या घौगनाशिनि । विश्वरूप धरोदेव प्रीयतां अनया गवां ।

इदं निश्र्कयी दानं गोप्रदानं सदक्षिणकं सतांबुलं कर्मकर्त्रे आचार्याय तुभ्यमहं संप्रददे ।

उदक सोडावे.

यजमानाने म्हणावे - प्रतिगृह्यताम् ।

(स्वीकार करा.)

आचार्याने म्हणावे - प्रतिगृण्हामि ।

(स्वीकार करतो.)

 

स्थापित देवता विसर्जनम्

यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् । इष्टकामं प्रसिद्धयर्थं पुनरागमनाय च ।

अक्षता टाकाव्यात.

 

पीठ दान

देवत विसर्जनानंतर पूजेवरील तांब्याचे तांबे वगैरे स्थापन केलेले देवतांचे पीठ आचार्यास दान द्यावे.

अनेन इदं आवाहित पीठानि आदेय विवर्जितानि कलशादितानि कर्मकर्त्रे आचार्याय तुभ्यमह संप्रददे ।

उदक सोडावे.

यजमानाने म्हणावे -

प्रतिगृह्यताम् ।

आचार्याने म्हणावे.

प्रतिगृण्हामि ।

अग्नीचे विसर्जन - गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थने परमेश्वर । यत्र ब्रह्मा दयोदेवस्तत्र गच्छ हुताशन । अग्निं विसर्जयामि ।

वायव्य कोनातील विड्यावर उदक सोडावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP