मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
अग्नीची प्रार्थना

अग्नीची प्रार्थना

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - २४

आचार्य-विभूति धारणम्

१. जमदग्ने नमः । ललाटे कपाळास

२. कश्यपाय नमः । कंठे गळ्याला

३. अगस्तये नमः । नाभौ बेंबीला

४. देवेभ्यो नमः । दक्षिण स्कंधे उजव्या खांद्यास

५. इंद्राय नमः । वाम स्कंधे डाव्या खांद्यास

६. पर्जन्याय नमः । शिरसि मस्तकास

 

अग्नीची प्रार्थना

यानंतर अग्नीची प्रार्थना करावी ती अशी-

ॐ च मे स्वरश्च मे यज्ञोपचते नमश्च । यत्ते न्यूनं तस्मैत उपयत्तेति रिक्तं तस्मैते नमः । अग्नये नमः ।

ॐ स्वस्तिं श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां बुद्धिं श्रिय बलं । आयुष्यं तेजं आरोग्यं देहि मे हव्यवाहन । देहि मे हव्यवाहन ।

देहि मे हव्यवाहन । प्रमादात्कुर्वतां कर्म प्रच्यतेवाध्वरेषु यत् । स्मरणादेव तद्‌विष्णोः संपूर्णस्या दिति श्रुतिः ।

प्रायश्चित्तान्यशेषाणि तपः कर्मात्मकानि वै । यानि तेषामशेषाणां कृष्नानुस्मरणं परम् । कृष्ण । कृष्ण । कृष्ण ।

गोपालकृष्ण । अनेन मयाकृतेन देशकालादि अनुसारतः कृत वास्तुशांति होमहवनाख्येन कर्मणा भगवान अग्नि नारायण स्वरुपी परमेश्वरः प्रीयताम् न मम ।

उदक सोडावे.

आचार्य पवित्रं त्यागः । द्विराचम्य ।

आचार्यांनी बोटातील पवित्र काढावे व आचमन करावे.

 

स्थापित देवता उत्तर पूजनम्

स्थापन केलेल्या शिख्यादि देवता व नवग्रह यांची उत्तर पूजा करून घ्यावी.

संकल्प - अस्मिन् कृत सनवग्रहमख वास्तुशांत्याख्यस्य कर्मणः स्थापित देवतां उत्तराराधनम् करिष्ये ।

उदक सोडावे.

शिख्यादि वास्तुपीठ देवताभ्यो नमः । तथा च आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।

धूपं दीपं समर्पयामि । नैवेद्यार्थे यथा संपादित नैवेद्यं समर्पयामि ।

अशा रीतीने स्थापन केलेल्या नवग्रह व शिख्यादि देवतांची उत्तर पूजा करावी. पेढ्यांचा किंवा अन्य पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

त्यानंतर त्या ठिकाणी स्थापन केलेल्या सर्व कलशातील पाणी ताम्हणात काढावे व त्या पाण्याचा यजमान कुटुंबियांवर अभिषेक करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP