मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग ३१ ते ४० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ३१ ते ४० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ३१ ते ४० Translation - भाषांतर ३१घ्यावो सुखाचे फुकाचे ।नाम माझ्या विठोबाचे ॥१॥घेता बहुत आहे सोपे ।भरा आपुलाली मापे ॥२॥येथे दुजा नाही कोणी ।घेता बहुत आहे धनी ॥३॥न लगे हे जकाती ।छाया आपुलाले हाती ॥४॥बोधला म्हणे वर्णन केली ।जनी ठेवी धरा आली ॥५॥३२चरणी घागऱ्या घुळ घुळर ।त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥कैश्या गोपिका शोभति दोहि भागि रे ।आपण कृष्ण खेळता कैसा रंगि रे ॥२॥कैसा गोपाळास देतो शोभा रे।बोधला म्हणे हा उभा भीमातिरी ।कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी रे ॥३॥३३चलो रे प्राणि मन राम सुलावू ।राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥१॥किनका बेटा किनकी बेटी ।ऐक राम बिन फजिती झुटी ॥२॥किनका बित किनका गात ।ऐक राम बिना कछु पाना गत ॥३॥किनक्या गाया किनक्या म्हैसी ।एक राम बिना हे महिर सोपरदिसे ॥४॥किनकी छेत्री किनकी घोर ।ऐक राम बिना सब झुटा पसार ॥५॥कहे बोधला ये राम है सखा ।राम बिना सब जग परिखा ॥६॥३४चालता पंढरीची वाट ।पाप पळती हातोहात ॥१॥मिळाला वैष्णवाचा भार ।आनंदे करिती जयजयकार ॥२॥लोळणि घालुनिया पायावरि ।फुका मोक्ष देतो हरि ॥३॥बोधला म्हणे सत्य जाणा ।बाप पंढरीचा राणा ॥४॥३५चालता पंढरीची वाट ।पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥मग पावलिया पंढरीसी ।अनंत कोटे पुण्यरासी ॥२॥देता हरिनामाची हाक ।महा पातके घेती धाक ॥३॥हाती वाजलिया टाळी ।रंगी नाचतो वनमाळी ॥४॥बोधला म्हणे आनंद जाला ।विठोबा आपोआप आला ॥५॥३६चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा ।तैसा देव आमचा पांडुरंग ॥१॥माऊली बालका घडिघडी पाहे देखा ।तैसा आमचा सखा पांडुरंग ॥२॥सकळ आमचा भार चालवितो दातार ।काये उपकार सांगो आता ॥३॥बोधला म्हणे देवा तुज मग नायक आहे ।जन्मोजन्मी पाय दावी मज ॥४॥३७जगा सुख भोगणे आहे ।सेवा विठोबाचे पाय ॥१॥शुध्द करा तुमचे मन ।लावा विठोबासी ध्यान ॥२॥दुष्टबुध्दी दुर करा ।तोडा अविद्येचा थारा ॥३॥निवळ करा अंतःकरण ।तुम्हा जवळी नारायण ॥४॥बोधला म्हणे भाव धरा ।तारु निर्वाणीचा खरा ॥५॥३८जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा ।पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥सदाचा अवगुणी नावडे जनासी ।तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥२॥अनंतकोटी आमच्या पातकांसी रासी ।त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥३॥माता पितियाची उपमा तुझे देता ।लाज माझीया चित्ता वाटताहे ॥४॥पीतीयाचा पुत्र अपराध करिता ।गणती नको दाऊ आमुख आम्हा ॥५॥ऐसीयाची उपमा तुजलागी न सहे ।तुजवाचुनी कोण आहे थोर देवा ॥६॥बोधला म्हणे देवा तुवा जगी उध्दारीले ।पतीत पावन जैसे केले नाम साचे ॥७॥३९जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी ।त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव ।ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥२॥भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो ।करितसे उपाव नाना परि ॥३॥बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता ।येन्हवी सर्वथा नावडे काही ॥४॥४०जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ ।करितसे सांभाळ रात्री दिवस ॥१॥तरि तू आमचा मातापिता ।सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥२॥फेडियेले रिण तोडियेले हिण ।कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥३॥अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि ।त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥४॥नाही विचारिले दोष आमचे काही ।बांधलेस पायी बोधला म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP