मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत माणकोजी बोधले| अभंग ११ ते २० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ११ ते २० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ११ ते २० Translation - भाषांतर संत माणकोजी बोधले अभंग – ११आमच्या संसाराचा घेतला असे भार।स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी ।त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥२॥त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था ।निवरिली व्यथा संसाराची ॥३॥ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार ।तू आमचे माहेर पांडुरंगा ॥४॥तू आमचा माता पिता सोयरा इष्ट बंधू ।तुजसि समंधू आमचा देवा ॥५॥बोधला म्हणे तुज वाचुनी नेणे काही ।चित्त तुझे पायीही बैसलेसे ॥६॥संत माणकोजी बोधले अभंग – १२आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे ।तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥ऐसा करुणानिधी आणिक नाही कोण्ही ।तु जनक जननी मायेबाप ॥२॥कृपेचा कोवळा दीन दयानिधी ।मज येऊनिया आधी सांभाळावे ॥३॥रात्री दिवस आस लागली मनास ।भेटी सावकाश द्यावी मज ॥४॥तुझिया वचनास मज थोर आधार ।हा शब्द निर्धार सत्य माझा ॥५॥बोधला म्हणे मना लागलीसे आस ।पाउले सावकाश पाहिन नयनी ॥६॥संत माणकोजी बोधले अभंग – १३आमचा विठोबा विश्वाचा गोसावी ।कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा ।जातिल दाही दिशा सोडुनिया ॥२॥माता आणि पिता बंधु या बहिणी ।अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥३॥लटकिया मायेसी धरला जीवेसी ।जातील परदेशी टाकोनिया ॥४॥बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा ।निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥५॥संत माणकोजी बोधले अभंग – १४आलासि कोठोनि जासिल कोठे।होतात कवणे ठायी रे ॥१॥मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे ।ऐसिया प्रकारे भुलले जन । पावन करित काही रे ॥२॥सद्गुरुसारिखा मातापिता बंधू ।भावे शरण त्यासी जाई रे ॥३॥आशा मनसा तृष्णा कल्पना सर्वही ।घातल्या पाई रे ॥४॥ऐसा जाणि जे तो साधी भूत विश्वम्भरा।मनुषे देह तेथे नाही रे ॥५॥बोधला म्हणे ऐसा शरण जाई ।मग तरसिल संदेह नाही रे ॥६॥संत माणकोजी बोधले अभंग – १५आवडीचे निजमुख नाम मी गाईन ।अंतरी पाहिन निजरुप ॥१॥नोहेसी वेगळा या प्राणा सर्वथा ।नकळे पंढरीनाथ लीला तुझी ॥२॥काय उतराई तुझिया उपकारा ।माझ्या विश्वंभरा पांडुरंगा ॥३॥बोधला म्हणे देई प्रेमाची उकळी ।गाईन वनमाळी द्वारकेचा ॥४॥संत माणकोजी बोधले अभंग – १६अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी ।मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥कृपादृष्टी धरावे हाता । मज द्यावी ज्ञानमती ।तुमचे नाम महिमान वर्णावया ॥२॥लक्ष चौऱ्यांसी जीव जनी । भोगिता कष्ट जाले यौवनी ।काही पुण्याची सामुग्री घेऊनी । मनुष्ये देही आलो ॥३॥आता येवूनिया मनुष्य देहासी । शरण जावे भगवंताशी ।चुकवावया चौऱ्यांशी । काही प्रयत्न करावा ॥४॥आता येवूनिया नरदेहासी । शरण जावे सदगुरुसी ।सांगेल वचन जपा मानसी । सदा अहर्णिसी विसरु पडो ने देवा ॥५॥सदगुरु सांग जे जे वचन । ते दृढ धरा विश्वास जाणा ।मग तेचि पावाल खुण । परब्रह्माचि ॥६॥सदगुरुचरणी धरुनिया आवडी । पाप करावी देस धडी ।मग तेचि पावाल गोडी । परब्रम्हाचि ॥७॥इतके जाणावयालागुनी । आपणा जवळच आहे. जाण ।जव मळिन आहे मन । तव जवळी असता धन। न सापडे तयासी ॥८॥सदगुरु वचनाचे घालुनी अंजन । मग दृष्टी पडेल ते कांचन ।मग होईल समाधान कासयासी ॥९॥मी मी म्हणती सत्य काये । ज्ञानदृष्टी परतोनी पाहे ।हा तो मृत्तिकेचा देह । मुसी ओतिलास ॥१०॥सकळ मृत्तिका सोंगे घेतली आणिक। जैसे पाहे रे कनक ।नामे भिन्न अळंकाराचि ॥११॥तैसे पाहे ऐक जीवन सरिता । आणिक होय जाणा ।तैसे रामी रातली आहे मन । पाप केवी राहो सके ॥१२॥बोधला म्हणे हरि हे विवेकसिंधुची लहरी । परि कर्ता असे हरि तोचि देव ॥१३॥संत माणकोजी बोधले अभंग – १७उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा ।फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥१॥होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा ।करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥२॥द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात ।तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥३॥नारद तुंबर उभे हरिगुण गात ।छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥४॥बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात ।जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥५॥संत माणकोजी बोधले अभंग – १८उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर ।जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥१॥झडकरी उठोनिया कृपादृष्टी त्वा पाहावे ।आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥२॥तोडुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे ।कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥३॥प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान’ ।सावध होऊनी करी गा हरिभजन ॥४॥विश्वाचा त्रिकुट शिखरी राहे ।तयाचे दर्शने जन्म पुनित होये ॥५॥बोधला म्हणे देवा सकळ तीर्थी मी न्हालो ।स्वामीच्या दर्शने जन्म पुनित जाहलो ॥६॥संत माणकोजी बोधले अभंग – १९उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला ।सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥१॥दिन उगवला बाळे भुकेली जाहली ।दयाळू माऊली सकळा भोजन घाली ॥२॥सकळांसी सांभाळूनी घ्यावे त्वा अन्न ।दयाळू होऊनी लावी आपूले ध्यान ॥३॥बोधला म्हणे देवा मी तो बाळ अज्ञान अखंड ।मग देई तुझे नाम स्मरण ॥४॥संत माणकोजी बोधले अभंग – २०एक एक म्हणती अवघे लोक ।एकचित्ते टेक नेणवेची ॥१॥एक दावुनिया ठाकिती आणिका ।पदरासी ढका लागो नेदी ॥२॥बोधला म्हणे ऐशा केवी होये गती ।कुळासहित बुडती नर्कपाशा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP