द्वादशाक्षरी मंत्र-गीती

श्रीकल्हळिवेंकटेश


ॐ - इत्येकाक्षर जें तें ब्रह्मचि तूं अनादि अविकार ॥
परि भक्तांस्तव धरिसी रुपें विधि हरिहरादि साकार ॥१॥
न - मितों तुम्हां त्रिवर्गां एकचि जाणुनि सदैव चरणाला ॥
नाहीं उपाय यासम भद्रक, - भीषण-भवाब्धितरणाला ॥२॥
मो - दें यास्तव सुरवर ऋषिमुनि नर दितिसुतादि पदकमला ॥
स्तविती त्यातें शोभे अंकीं ज्याच्या पयाब्धिजा कमला ॥३॥
भ - द्रचि भद्रापतिच्या नमितां चरणांबुजा सदारा हो ॥
त्यावरि मम मन मधुकर मधुरस चाखावया सदा राहो ॥४॥
ग - रुडध्वज प्रभुवर प्राप्तीस्तव जन अदभ्र धडपडतो ॥
परि तो सुभक्तिवांचुनि अन्य उपायें कशास सांपडतो ॥५॥
व - रिवस्या या प्रभुची भावें साहोन सर्व दु:खास ॥
करितां प्रेमें होतो भक्तांचा तो खरा सखा खास ॥६॥
ते - जें शौर्यें वीर्यें वदान्यहि तसा कुठेंच नच दुसरा ॥
यास्तव दयार्द्र विभुतें भजा न विसरा दुजा नसे असरा ॥७॥
वा - णी कर्णीं शिरतां दीन गजाची स्वपात्र जो सारी ॥
धांवे उध्दरि भक्ता करुणाघन तोचि कृष्ण कंसारी ॥८॥
सु - तुपा तपोनि सुसती वरिती झाली जगन्निवासास ॥
देवी भार्गवि राहे चरणीं प्रभुच्या सुखें निवासास ॥९॥
दे - वा अनन्यभावें जो भजतो तो भवाब्धि खचित तरे ॥
होतो विमुख तया तो जगतीं या जित असोन मृतवत् रे ॥१०॥
वा - ला नामें तरला झाला वाल्मिकि जगांत आदयकवि ॥
रचिलें रामायण जें भावी होणार तेंच आयकवि ॥११॥
य - दुकुलभूषण भावें नमितों श्रीवेंकटेश तव चरण ॥
दे हे दासा हरिला हृदयीं राहो सदा प्रभुस्मरण ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP