वणि मातेचा, माहुरचा, करविर तुळजापुरचा,
जोगवा मागेन, जोगवा, जोगवा मागेन,
महाकालीचा, लक्ष्मीचा, महासरस्वतीचा
जोगवा मागेन, जोगवा, जोगवा मागेन ॥धृ॥
क्रूर महीषा, मी पणा, महालक्ष्मी गे शमन,
काम क्रोधाचे, शुंभ निशुंभ, सरस्वती गे शमन ॥१॥
शुंभ निशुभ, मदमत्सर, नंदे नाशि सत्वर,
दानव दंभाचा, निर्दाळी, रक्तदंतिके ही आळी,
नाश करि लोभाचा, आणि तृष्णा शाकंभरि अन्नपूर्णा ॥२॥
हेवा दावाग, अचलग, भीमादेवि घालवि ग,
अरुणासुर जणूं भव संभ्रम, भ्रामरि ने दे प्रेम,
देइ श्रीविदया, सौंदर्या, श्रीकमले ऐश्वर्या ॥३॥
गे सावित्री, सौभाग्या पार्वती दे पातीव्रत्या,
दे शीलाला शचिवृध्दि, अनसूये आनंदी,
दे सत्संगा, सरस्वती, अध्यात्मा आदिती ॥४॥
दे गायत्री, वेदमंत्रा, सीते निर्मळ गात्रा,
ज्ञान निष्ठेते, अरुंधते, मातृके मा पितयाते,
चित्त शुध्दीते, चामुंडे; योगिनी याग अखंडे ॥५॥
कृष्ण पत्न्ये गे, स्मृति माधवा, अष्टनायिके अष्टाभावा,
गे नवदुर्गे, नवभक्ती, रुख्मिणी रमेश रमो मती,
औठ हात हा, शिशु अजाण, औठपिठी आठवण ॥६॥
जर ना शक्ति, ना भक्ति, भक्तीविण ना मुक्ती,
साध्य सावरिला ही युक्ती, दुर्गा मच्छिंद्रा प्रीती,
वामनदासाला, कविदासाला, कुरवाळी गे श्रीला ॥७॥
श्री. ना. कन्हेरीकर