॥चतुर्थोऽध्याय:॥
श्री गणेशायनम:, गुरु ठिकाण कळता कानिफाकडून, स्त्री राज्याकडे निघे गोरक्ष प्रज्ञावान, अनायासे कलिंगनर्तकी जा संगतीने, जावे म्हणूनी पुसतसे ॥१॥
पाषाण हाती गायन करुनी मृदंग वाजवुनी घे मज कडूनी, एक वेळ अन्न उदरा वाचोनी, अभिलाषा गुरुविण अन्य ना ॥२॥
मारुतीस दाखविता चमत्कार करवी सूचना तिलोत्तलेस सत्वर, इकडे कलिंगा ठरवी कार्यक्रम सुंदर, बिदागीच्या निमित्ते ॥३॥
जैसे नक्षत्रामाजी उड्डगणपती, तैसे स्त्रीराज्या मच्छिंद्रजती थाटल्या समारंभामध्ये बसती, गायन-वादन ऐकावया ॥४॥
जटा वियुक्त करुनी भार, उत्तम शर्मी, कंचुकी चीर, भांग कुंकुम-भाळी सुंदर नेत्री काजळ अंजन ते ॥५॥
कबरीवरी चीर पदर, शाल खोचे नाभीवर, कर्णी कुडया, नथ नासिकेवरी, करी कंकण, हार कंठी ॥६॥
ऐसा हरी नाटकवीर, बैसला येऊन सभेत चतुर, गा कलिंगे तालावर, मृदंग वादन पहा माझें ॥७॥
होताच हरीस गुरुदर्शन, वाजवावयास हुरुप ये अतीव खुषीत, चलो मच्छिंदर-गोरख आया धुन, रेखीव स्पष्ट काढितसे ॥८॥
आधीच सुचित किलोत्तला जाणून गोरक्षास शपथ घालत, रणबिंदी रत्नमुद्रिका देत, हातक श्रृंगार मुक्त तुरे ॥९॥
भरजरिचा कनक कर्णी, मस्तकी मंदील रत्नि परिधानी, बाहुवर हस्ताग्री हेम कोंदणी, सर्व तेजवर हरिवदनी ॥१०॥
गोरखसंचार नाटयपूर्ण, पाहुनी मच्छिंद्रा ये गहिवरुन, माय लेकरांचे आलिंगन, तों किलोत्तला काय म्हणे ॥११॥
मीननाथ तो लहान पुत्र, बरा आला मोठा भ्रात्र, राज्य सांभाळण्यास पात्र आम्ही जाऊ तीर्थयात्रें ॥१२॥
बैराग्यास कशास वैभव वासना, शिशुसमा एक मातेस शिशु नाना, चांदण्या चंद्र एक, चंद्रा किती चांदण्या, शिष्य निर्मल परी गुरु एक ॥१३॥
अतीव कष्टे समजुतीला, गुरुशिष्य मीन-नाथ तीन निघती वर्ष प्रतिपदादिन, स्त्रीराज्यें, सुवर्ण वीटेसह ॥१४॥
त्रिवर्ग येती हळुहळुं, हेळा-पट्टणानगराजवळुं, तों जालंधरकथा ये कळुं, परि कळो न ये पुढील कथा ॥१५॥
मैनावतीस भेटती सार्थक्याबद्दल, आशीर्वाद देती, तुमच्या कृपेचा झळकु अती, आदेश माझा गुरुवर्या ॥१६॥
तेथून पुढे उतरले धर्मशाळेत, शौचास बसविला मीननाथ, धुवून आणी मी स्नानाप्रत, गुरु सांगती गोरक्षा ॥१७॥
नसता खटाटोप कासया, बरबटल्या मीननाथा धुवाया, घेवून जाती पाणवटया, आपटती धुवती प्रत्यक्ष ॥१८॥
मांस-रक्त हाडे जलचरांसे, वाळत घातले कातडे दोरीस, स्नानी परतता न दिसे मच्छिंद्रास, न दिसे मीननाथ बाळ असे ॥१९॥
अंतर्बाह्य मीननाथ धुतला, दोरीवर त्या सुकूं घातला घात तुवां कां रे केला, मारुती बुभूकार तूं झालास ॥२०॥
सिध्दी जयांच्या पायी लोळणी तो रडतसे शाश्वता मच्छिंद्रमुनी, गोरक्ष जपें संजीवनी, मीननाथ बाळ हसत ये ॥२१॥
गर्भागिरी समीप त्रिवर्ग आले, दात कर्कश अरण्य भले, मच्छिंद्र म्हणे वाते भय भले, गोरक्ष म्हणे डर कैचे ॥२२॥
प्रातर्विधिस्तव गुरुची झोळी, सुवर्ण वीट जड लागली, कशास लोभ भिरकावली, पुढे चढें गर्भगिरी ॥२३॥
जेव्हा कळले, वीट सांडली, मच्छिंद्रमूर्ती बोलु लागली, दगड उलथे, जड कारे झाली अनोळखीने बोलतसे ॥२४॥
गर्भागिरी सुवर्ण केला, कां वागविली वीट, वीट न तुम्हाला, खटाटोप हा कशास्तव केला, पुरविन मी चरणकृपें ॥२५॥
आदीनाथ आदी करुनी सर्व दैवते पाचारुनी, साधु बैरागी संत मुनी, मावंदे घालु वाटतसे ॥२६॥
सडा संमार्जन, चटण्या भरत, सिध्दी पक्वान्ने वाढत, कुबेर दक्षिणा वस्त्र पुरवित मच्छिंद्र घाली प्रदक्षिणा ॥२७॥
विजयानंतर वानर बैसले, श्रीराम लक्ष्मण खावया फळे, वाढे सीताई ‘त्यां’, सकले, सोहळा बघती सुखर ॥२८॥
पेंदया, सौंगडी, गोपी गोप, श्रीरंग रंगला त्या खुप, गोपाळ काला एकरुप, सोहळा बघती सुखर ॥२९॥
या प्रमाणे मावंदे झाले मच्छिंद्रे गोरक्षा थोपटिले, सुवर्ण गर्भागिरी झाकाळले, गहिनीनाथ उपदेशिला ॥३०॥
जाईल लागलेले वेड, लागेल वाटेल गोड गुरुचे वेड, लाभेल गहन ज्ञान गुढ वाचनी मननी वामन कृपे ॥३१॥
इतिश्री नवनाथसार, गोरख मुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार, चतुर्थोध्याय गोड हा ॥३२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥
सीतामाई