॥ पंचमोऽध्याय:॥
श्री गणेशायनम: कैलिकाश्रमी भर्तरित, सूर्यांश त्यात वाढु लागत, गर्भिणी कुरंगिणी तोच येत, प्रसवली त्या समयी ॥१॥
बाळे दोन चाटु पाही, तो भर्तरित बाळ विदेही, हरिणी समजे हा अपुलाही, चाटु लागे पाजीतसे ॥२॥
शनै: शनै: वाटु लागतां, वनचर भाषा अवगता, जैसिंग भार दे अवचिता, उचलुनी ने संगोपिण्या ॥३॥
संगोपिता सोळा वर्षे, लग्नविचार सुचे हर्षे, गांवी हिंडे, अर्थ इर्षे, चोर मारिती जैसिंगा ॥४॥
दु:खे पुढे भर्तरीनाथ व्यापारी लोकांसमवेत, उज्जनी समीप राहुटयांत्त वस्ती करी रात्री तो ॥५॥
कोल्हे कुई अर्थ सांगत, चित्रमा गंधर्व राक्षस शापित येत आहे रत्नासहित, मारिल त्यां रत्नलाभ ॥६॥
पहारा करित विक्रमदूत, तो ही होता सुरोचन सुत, गंधर्व होता इंद्र शापित, गंधर्व झाला कमठागृही ॥७॥
मिथुळापती कन्या युवती, दयावी मजला गर्दभ वदती, राजा परिक्षा ओपी तयाप्रती, तोचि झाला विक्रमपुत्र ॥८॥
त्या हस्ते चित्रमामरत उध्दरुनी जाई रत्ने अर्पत रक्तटिळा भाळी लावत, राज्य प्राप्ती संकेत तो ॥९॥
भरतरीनाथ कळे मात, विक्रम ठेवी त्याची संगत, त्या राज्यी राजा वृद्ध बहुत, विक्रम भरतरिस अर्ध राज्य देती, मित्रकर्तव्य साजेलसे ॥११॥
भर्तरी कुल खुलासा करोनी, प्रधान पिंगला कन्यागुणी, भर्तरिस देई आनंदे सगुणी भर्तरी पिंगला रमताती ॥१२॥
अर्कास वाटे चिंता फार, एक पुत्र अगस्ती थोर, भर्तरि गढला विषयी पार दत्ता विनवी रास्त तें ॥१३॥
मृगया निमित्त भर्तरि रानी, तृष्णेने जाई फार व्यापोनी, माईक सरोवरी जो जा धावोनी, भर्तरीस पुसे दत्तगुरु ॥१४॥
निगुरुत्वे जों हे कोणी सरोवराचे पिईल पाणीं, तो घेईल माझी शापवाणी, भर्तरि विनवी जीवन दया ॥१५॥
दत्तें त्याला वचनी बांधोनी, पाजले अमृत त्याला पाणी, भर्तरि पिंगलेस कांही दिनांनी, विनोदे विचारी सहजची ॥१६॥
मी आधी मरतां करशील काय, तुमचे मागुनी मी ही जाय, पिंगला वदता, परिक्षा राय, घेऊ इच्छि एके दिनी ॥१७॥
मृगया निमित्ते मृग मारता, रत्ते भिजवी स्व वस्त्रे त्वरीता पिंगले प्रती भृत्ये दु:खे अती, चिता पेटवी देहाप्रती, अर्पिती झाली सत्यवती ॥१९॥
भर्तरी भृत्त्य चुकामूक, भर्तरी पाही पिंगला हकनाक, मी मारीली अत्यंत शोक, करित बैसला स्मशानी ॥२०॥
विक्रमे सर्व लोकें समजाविला, भर्तरि परी तेथेच राहिला, पिंगला पिंगला म्हणू लागला, बारा वर्षे लोटली ॥२१॥
अर्क विनवी पुनरपी दत्ता, चतुर धोरणी गोरखा पाठविता, विदयार्णव केसरी जवळ त्वरीता, साधा उपाय ॐ फस ॥२२॥
कच्चे मडके रंगविले, नृपासमोर स्मशानी गेले, ठेंच निमित्ते मडके फुटलें, गोरख रडती त्याप्रत ॥२३॥
माझी भर्तरि किती चांगली, रडता भर्तरी म्हणे माऊली, मडकी देतो कितीक जवळी, पिंगला पुनरपि अशक्य ॥२४॥
पिंगला पुनरपि आणता आता, दत्त वचनाला, काय जागतां, लक्षावधी पिंगला त्वरीतां, दाविता पाय धरितसे ॥२५॥
दत्तानुग्रही तुम्ही मज वंदय, शाश्वत शोका, सोडा निंदय, भर्तरी सकळ मोह स्त्रीवृंद, सोडुनी पंथ स्वीकारीतसे ॥२६॥
कंथा झोळी कुबडी फावडी, घेई भर्तरी बहुत आवडी, निघे भिक्षेप्रती तातडी, आलख निरंजन पुकारतसे ॥२७॥
भर्तरी शुध्द आणला, पंथा, गोरख विनम्रे सांगे दत्ता, आनंद झाला अर्का अवधूता, भला-भला चतुर तूं ॥२८॥
गोरक्षा बारे बाळा आतां, भेटवी मजला मच्छिंद्रनाथा, भेटले नाहीत दिवस बहुता, सांगे माझा निरोप तूं ॥२९॥
लग्न होईल भाविकाचे स्मशान वैराग्य जाईल संसार सुख शांतीचे वामन कृपे वाचनात ॥३०॥
इति श्री नवनाथसार, गोरक्ष मुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार, पंचमोध्याय गोड हा ॥३१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥