स्कंध ७ वा - अध्याय १२ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
९६
गुरुगृहीं वास ब्रह्मचार्याप्रति। सर्वभावें त्यासी गुरुसेवा ॥१॥
गुरु, अग्नि, सूर्य, विष्णुउपासना । गायत्रीचा जाणा जप तया ॥२॥
मौनव्रतें संध्या त्रिकाल करावी । विद्या संपादावी नम्रभावें ॥३॥
पाचारिती यदा तदा पाठ घ्यावा । आदि अंतीं व्हावा नमस्कार ॥४॥
दंड कमंडलु कटिसूत्र जटा । बाणा आश्रमाचा सांभाळावा ॥५॥
भिक्षा मागूनियां अर्पावी गुरुतें । आज्ञेवीण नसे भोजन त्या ॥६॥
स्वस्वरुप साक्षात्कार न जोंवरी । स्वतंत्र तोंवरी नसे जीव ॥७॥
आभासनिश्चय होतां अंतरांत । स्त्री-पुरुषभेद निघूनि जाई ॥८॥
वासुदेव म्हणे गृहस्थ यतीही । हितार्थचि राही बंधनीं या ॥९॥
९८
यथाशक्य अध्ययनोत्तर अंतीं । दक्षिणा शक्य ती अर्पूनियां ॥१॥
गुर्वाज्ञेनें अन्य आश्रमस्वीकार । करुनि उद्धार निज साधावा ॥२॥
नैष्ठिकचि किंवा व्हावें ब्रह्मचारी । नित्य गुरुगृहीं करणें वास ॥३॥
अग्नि, गुरु तेंवी भूतमात्रीं देव । पाहूनि सद्भाव वाढवावा ॥४॥
कोणीही या धर्मे वर्ततां सद्भक्त । अंतीं मोक्षपद संपादील ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मचर्यधर्म । ऐकूनियां धर्म मोद पावे ॥६॥
९९
वानप्रस्थ धर्म ऐकें आतां राया । महर्लोक तया सुलभ तेणें ॥१॥
वनधान्यचि वा सूर्यतापें पक्व । कंद-मूळ फळ अन्न त्याचें ॥२॥
गुहा कुटीवास द्वंद्वसहिष्णुत्व । नख रोम केश छेदूं नये ॥३॥
देहशुद्धीस्तव कृत्रिम उपाय । योजूं नये देहसौंदर्यार्थ ॥४॥
स्त्रुक् स्त्रुवा दंडकमंडलु आदि । स्वीकारुनि बुद्धि करणें स्थिर ॥५॥
एक दोन वार्धक्यें वा मार्गी येतां विघ्न । करावें निरशन ऐशा वेळीं ॥७॥
तत्तदिंद्रियांचा लय त्या त्या भूतीं । करुनियां शांति संपादावी ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा शांतचित्त । होई शुद्धचित्त निजानंदें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 19, 2019
TOP