मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ७ वा| अध्याय १ ला स्कंध ७ वा सप्तम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा स्कंध ७ वा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ७ वा - अध्याय १ ला Translation - भाषांतर १जगद्गुरु कृष्णद्वैपायन व्यास । मुनीश्वर शुक वंदूं भावें ॥१॥सप्तम स्कंध हा प्रारंभूं भक्तीनें । गातां जो प्रेमानें पुष्ट भक्ति ॥२॥परीक्षिति म्हणे शुक महामुने । शंकानिरसनें कृपा करा ॥३॥सर्वत्र जो सम सर्व हितकर्ता । पालक विश्वाचा निर्विकार ॥४॥देवांचा त्या पक्ष दैत्यांचा वा द्वेष । अथवा त्यांचें भय काय तया ॥५॥असूनियां ऐसें इन्द्राचा कैंवार । घेऊनि दितिपुत्र वधिले तेणें ॥६॥केंवी भेददृष्टि स्वीकारिली ऐसी । शंका अंतरींची दूर करा ॥७॥२विषम बुद्धीचें कारण या राया । कथा रम्य गाया सौख्य वाटे ॥१॥भक्त प्रल्हादाचेंख चरित्रवर्णन । श्रोत्यां-वक्त्यां धन्य करील तें ॥२॥नारदादि मुनि गाती तें प्रेमानें । भक्तिधुंद मनें साविर्भाव ॥३॥व्यास भगवानां वंदूनि, ते आतां । गातों हरिकथा भक्तिभावें ॥४॥वासुदेव म्हणे भक्तशिरोमणि । भक्तकथागानीं धुंद होती ॥५॥३परीक्षिते, मायातीत तो निर्गुण । अजन्माही जन्म पावतसे ॥१॥मायागुणें वध्य वधकर्ता होई । त्रिगुण ते पाहीं प्रकृतीचे ॥२॥गुणवृद्धिकाल येतांचि तो ईश । धरी पक्षपात देवादींचा ॥३॥सत्वोत्कर्षकालीं देव-ऋषिपक्ष । रक्षी तो दैत्यांस रजोत्कर्षे ॥४॥तमाचा उत्कर्ष जाणूनियां यक्ष - । राक्षसांचा, पक्ष घेई प्रभु ॥५॥काष्ठपात्रादिक उपाधींसमान । अग्नि जळ जाण तेंवी ईश ॥६॥सर्वांतर्यामी तो नि:पक्षपातचि । उत्कर्षापकर्षही गुणांमाजी ॥७॥वासुदेव म्हणे धर्म - नारदांचा । संवाद पूर्वीचा कथिती मुनि ॥८॥४सृष्टयत्पत्तिइच्छा होतां ईश्वरासी । पावतसे वृद्धि रजोगुण ॥१॥विहारेच्छा होतां होई सत्त्ववृद्धि । तमोगुणवृद्धि शयनेच्छेनें ॥२॥प्रकृति पुरुष निमित्तें सृष्टीचीं । आश्रय कालासी उभयांचा त्यां ॥३॥सत्त्वादि वृद्धीसी कालचि कारण । भासे गुणांसम ईशकार्य ॥४॥वासुदेव म्हणे धर्म-नारदांचा । संवाद पूर्वीचा कथिती मुनि ॥५॥५राजसूययज्ञीं नारदासी धर्म । बोलला वचन आश्चर्यानें ॥१॥शिशुपाल लीन जाहला स्वरुपीं । पाहूनि धर्मासी नवल वाटे ॥२॥भक्तांहूनि श्रेष्ठ पद हें द्वेष्टयासी । लाभावा जयासी नरक कर्मे ॥३॥वेनासमचि हा होता महाद्वेष्टा । स्मरतां तद्वचा चीड येई ॥४॥वचनें ज्या जिव्हा झडावीचि ऐसी । असतां दुरुक्ति सायुज्य त्या ॥५॥सर्वांच्या समक्ष लाभलें हें काय । फेडावा संशय मुने, माझा ॥६॥वासुदेव म्हणे धर्मांसी नारद । कथी गूढतत्त्व परिसा आतां ॥७॥६धर्मा, निंदा - स्तुति ईश्वरासी सम । देहाचा अभिमान तया नसे ॥१॥अहं ममचि ते कारण दु:खासी । काय सर्वात्म्यासी हर्ष शोक ॥२॥कैसीही भक्षितां शर्करा मधुर । तैसाचि ईश्वर मोक्षदाता ॥३॥काम द्वेष भय स्नेह वा भक्तीनें । ईश्वरचि जेणें धरिला मनीं ॥४॥कोणत्याही भावें चिंतितां तयासी । हृदयीं वसती त्याची घडे ॥५॥विरोधभक्ति हा सुलभ उपाय । शत्रु दिसे नित्य ध्यानीं मनीं ॥६॥शत्रुत्व ईशाचें घडतां तोचि ध्यास । स्वरुपतालाभ तेणें घडे ॥७॥पेशस्कृत ध्यानें घडतां तोचि ध्यास । स्वरुपतालाभ तेणें घडे ॥८॥वासुदेव म्हणे जळीं-स्थळीं कृष्ण । चिंतूनि दुर्जन मुक्त झाले ॥९॥७कामासक्त गोपी, चैद्यादिक द्वेषें । ध्यास यादवांते आप्तभावें ॥१॥धर्मा, तुम्हां प्रेमें, भक्तीनें आम्हांसी । ध्यानीं मनीं तोचि सर्वकाळ ॥२॥वेनाप्रति ऐसें नव्हतें चिंतन । यास्तवचि जाण नरक तया ॥३॥वासुदेव म्हणे शिशुपालवृत्त । निवेदी नारद परिसा धर्मा ॥४॥८वैकुंठासी जातां एकदां कुमार । अडविलें द्वार पार्षदांनीं ॥१॥क्रुद्ध मुनि तदा बोलले तयांसी । लाभेल तुम्हांसी दैत्ययोनी ॥२॥तीन जन्म ऐसें घेऊनि पुढती । पुनरपि स्थिति पावाल हे ॥३॥हिरण्यकशिपु हिरण्याक्ष वधिला । वराहें मारिला हिरण्याक्ष ॥५॥दशकंठ कुंभकर्ण ते पुढती । तेचि यज्ञामाजी वधिले कृष्णें ॥६॥शापमुक्त आतां होऊनि ते गेले । वैरें साधियेलें कार्य त्यांनीं ॥७॥धर्म म्हणे वृत्त कथा प्रल्हादाचें । निवेदी वृत्त तें वासुदेव ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP