मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ७ वा| अध्याय ७ वा स्कंध ७ वा सप्तम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा स्कंध ७ वा - अध्याय ७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ७ वा - अध्याय ७ वा Translation - भाषांतर ४६प्रल्हाद निवेदी तपालागीं पिता । गेला यदा माझा गिरीवरी ॥१॥सर्पासी भक्षिती जेंवी पिपीलिका । म्हणती करुं याचा तेंवी नाश ॥२॥बोलूनियां ऐसें आनंदें विबुध । आरंभिती युद्ध दैत्यांसवें ॥३॥दशदिशांप्रति पळाल तैं दैत्य । लुटिती तैं देव प्रासादादि ॥४॥माता कयाधूसी नेऊं लागे इंद्र । नारद प्रतिकार करी तदा ॥५॥इंद्र म्हणे गर्भवती दैत्यपत्नी । कैसी हे सोडूनि देऊं मुने ॥६॥प्रसूति पावतां वधीन पुत्रांतें । स्वस्थानीं ते सुखें जावो मग ॥७॥वासुदेव म्हणे वैर तें कठीण । परस्पर प्राण घेऊं पाहे ॥८॥४७गडेहो, इंद्रातें बोलले नारद । उदरीं हिच्या गर्भ ईशभक्त ॥१॥पापरहित तो सामर्थ्यसंपन्न । अवघ्य तो जाण देवश्रेष्ठा ॥२॥प्रदक्षिणा तदा घालूनि मातेसी । सोडितां तियेसी नेती मुनि ॥३॥तपश्चर्याकाल केलें बहु तप । सेवूनि मुनींस कयाधूनें ॥५॥भक्तिरुप धर्म तदा नारदांनीं । मजसाठीं वनीं कथिला तिज ॥६॥स्त्रीस्वभावें तो विसरली माता । कृपेनें मुनींच्या स्मरण मज ॥७॥मुलांनो, विश्वास ठेवितां तो बोध । होईल तारक तुम्हांतेंही ॥८॥वासुदेव म्हणे नारदोक्त तोचि । प्रल्हाद निवेदी बोध बाळां ॥९॥४८उत्पत्त्यादि भाव फलासी, न वृक्षा । देहफल आत्मा निर्विकार ॥१॥नित्य, शुद्ध, एक, अव्यय, क्षेत्रज्ञ । अविक्रिय जाण सर्वाधार ॥२॥स्वयंप्रभ, सर्वव्यापी तो अलिप्त । तेंवी अनावृत्त जगद्धेतु ॥३॥द्वादश हीं चिन्हें जाणूनि आत्म्याचीं । देहाभिमानासी धरुं नये ॥४॥हेमकार क्षेत्रीं जाणूनि सुवर्ण । उपाय करुन संपादी जैं ॥५॥तैसा देहक्षेत्रीं घडे आत्मबोध । प्रयत्नें आत्म्यास उपायांनीं ॥६॥अष्टधा प्रकृति त्रिगुण तैं भूतें । आत्मा सकलांतें व्यापीतसे ॥७॥विकारसंघात देह तो द्विविध । जंगम स्थावर ऐशारुपें ॥८॥वासुदेव म्हणे वेदां नेति नेति । अन्वयी व्यतिरेकी जाणती तो ॥९॥मण्यांमाजी सूत्र तैसा हा व्यापक । अन्वय विबुध म्हणती हाचि ॥१॥सर्वत्र असूनि अलिप्त तो असे । व्यतिरेक ऐसें म्हणती तया ॥२॥चिंतूनियां ऐसें चित्त होई शुद्ध । होऊनि एकाग्र पुढती शोधा ॥३॥जागृत्स्वप्नादिक अवस्थांचा साक्षी । शोध घेतां चित्तीं तोचि आत्मा ॥४॥गुणकर्मयोगें बुद्धीचे हे खेळ । घालिती गोंधळ संसाराचा ॥५॥ज्ञानेंचि बुद्धीचे प्रवाह हे नष्ट । उपाय ज्ञानास एक भक्ति ॥६॥वासुदेव म्हणे सर्वसमर्पण । सेवावे सज्जन सर्वभावें ॥७॥५०ईशपदीं जडे प्रेम । तोचि जाणावा सद्धर्म ॥१॥सर्वांभूतीं भगवद्भाव । व्हावें निर्मळस्वभाव ॥२॥ऐसा भक्त ईश्वराचा । करी सप्रेम हरिकथा ॥३॥कथागानें देहभान । जाई तयाचें हरपून ॥४॥कंठ सद्गदित होई । स्वयें तन्मयता येई ॥५॥नाचे बागडे ओरडे । वेडा म्हणती तया वेडे ॥६॥एक ईश्वर त्या दिसे । नावलोकी जनाकडे ॥७॥होईअ सर्वबंधछेद । सकळ अज्ञाननिरास ॥८॥चुके जन्म-मरणचक्र । स्वस्वरुपीं होई स्थिर ॥९॥वासुदेव म्हणे ऐसा । भक्त जाणावा भाग्याचा ॥१०॥५१यास्तव गड्यानों, हृदयस्थ देवा । चिंतावें सर्वदा सर्वभावें ॥१॥उपासना त्याची अत्यंत सुलभ । चित्त मात्र एक अर्पा तया ॥२॥तेणें सर्व विश्वासमर्पण पुण्य । द्रव्य दारा धन नाशिवंत ॥३॥क्षणभंगुर या आयुष्यांत भोग । भोगाल कितीक ध्यानीं आणा ॥४॥स्वर्गसौख्य तेंही नश्वरचि असे । यास्तव मोक्षाचे यत्न व्हावे ॥५॥सुखार्थ प्रयत्नें लाभे जनीं दु:ख । ऐसाचि अनुभव सकलां येई ॥६॥निरिच्छेंत सौख्य ऐसा अनुभव । देह चिरंजीव नसेचि हा ॥७॥यास्तव लाभही घडतां सौख्याचा । काय येई हाता किती काळ ॥८॥वासुदेव म्हणे देहचि नश्वर । ऐश्वर्य स्त्री-पुत्र काय तेथें ॥९॥५२उत्कर्षापकर्ष एकाचि जन्मांत । होती जाती नित्य अनुभव हा ॥१॥मित्रहो, चिंतावें काय लाभ एथ । रमूनि विषयांत काय सौख्य ॥२॥तेणें पुनर्जन्म, पुनरपि कर्म । ऐसें हें भ्रमण न टळे कदा ॥३॥निष्काम भजन एकचि या मार्ग । होईल निर्बीज कर्म तेणें ॥४॥देव दैत्यादिक ईश्वरा न भेद । उद्धरी भक्तांस भक्तप्रिय ॥५॥आजवरी बहु तरले यापरी । चिंतूनि अंतरीं हित साधा ॥६॥जन्मासी येऊनि एकचि साधावें । सर्वत्र पहावें हरिरुप ॥३॥नि:सीम करावी भक्ति ईश्वराची । प्रल्हादोक्ति कथी वासुदेव ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP