मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ७ वा| अध्याय २ रा स्कंध ७ वा सप्तम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा स्कंध ७ वा - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ७ वा - अध्याय २ रा Translation - भाषांतर ९हिरण्यकशिपु कोपे भातृवधें । क्रोधधूर्मे झालें नभ व्याप्त ॥१॥कडाडूनि दंत ओष्ठ तो चावूनि । सूडभावें वाणी वदला क्रूर ॥२॥फोडूनि मस्तक शूलें या हरीचें । तर्पीन त्या रक्तें बांधवासी ॥३॥तदाचि पावेन समाधान मनीं । मिरवी हा जनीं सम ऐसें ॥४॥तोंडपूजे देव करितां स्तवन । पक्ष तो घेऊन नाचूं लागे ॥५॥प्राण देवांवरी तया कुटिलाचा । विनाश तयाचा करणें योग्य ॥६॥मूलच्छेदावीण वृक्षाचा न नाश । तैसेंचि हें कृत्य आवश्यक ॥७॥१०दैत्यहो, तुम्हांसी कथितों मी वर्म । सकल ब्रह्मकर्म नष्ट करा ॥१॥विप्र अपराधी प्रत्यक्ष न जरी । विष्णूचे ते परी सहाय्यक ॥२॥यज्ञ-दान-तपामाजी करा विघ्न । वेदविध्वंसन करा यत्नें ॥३॥अपराध काय न म्हणा विप्रांचा । विप्रचि विष्णूचा प्राण जाणा ॥४॥धर्मबळें त्यांच्या विष्णु बळिवंत । यास्तव प्रमुख वैरी विप्र ॥५॥यास्तव दैत्यहो, धेनु, विप्र, वेद । वर्णाश्रम जेथ तेथ जावें ॥६॥जाळूनि तीं स्थानें करा भस्मसात । निवेदी शुकोक्त वासुदेव ॥७॥११रुचे तेंचि आलेम प्रारब्धीं दैत्यांच्या । गगनीं न त्यांचा हर्ष मावे ॥१॥लक्षूनि नगरें ग्रामें ते निघाले । दिसे तें जाळिलें, मठादीहि ॥२॥धेनु-विप्रादींची जाहली दुर्दशा । मार्ग जीविकेचा नुरला तयां ॥३॥गुप्तपणें सर्व देव अवलोकिती । दैत्यांची ते कृति निरीक्षूनि ॥४॥हिरण्यकशिपु करी क्रियाकर्म । आप्तांचें सांत्वन करीतसे ॥५॥शकुनि, शंबर, धृष्ट, कालनाभ । वृक, महानाभ, हरिश्मश्रु ॥६॥भूतसंतापन, तैसाचि उत्कच । हिरण्याक्षपुत्र कांता, माता ॥७॥वासुदेव म्हणे सकलांसी बोध । करीतसे दैत्य ऐका काय ॥८॥१२वीरमरणें जे पडले रणांत । तयांस्तव शोक करुं नये ॥१॥प्रपेवरी येती पांथस्थ ज्यापरी । एकत्र त्यापरी वसती जीव ॥२॥संयोग-वियोग दैवयोगें त्यांचा । बुद्बुदचि साचा जाणा देह ॥३॥चैतन्य तेथींचे अमरचि असे । नश्वर देहातें जरी नाश ॥४॥नित्य निरंजन अव्यय तो आत्मा । सर्वसाक्षी जाणा सर्वव्यापी ॥५॥प्रतिबिंब जळीं हालतांचि वृक्ष । हाले ऐसा भास होई नरा ॥६॥तैसा स्थिर आत्मा, भास हे मायेचे । विपर्यासें ऐसें होती भ्रम ॥७॥जन्म, मृत्यु, शोक, भय, अविवेक । अवघा विपर्यास ध्यानीं असो ॥८॥वासुदेव म्हणे संवाद पूर्वीचा । कथीतसे आप्तां दैत्य ऐका ॥९॥१३पुरा उशीनर देशांत सुयज्ञ । रणांत मरुन पडला राव ॥१॥भग्नकवच तो विच्छिन्न शरीर । माला अलंकार अस्ताव्यस्त ॥२॥निखुरले केश फुटले नयन । ओष्ठ आंवळून धरिले होते ॥३॥छिन्नहस्त धूलिग्रस्त त्याचें मुख । परी तो जिवंत भासे क्रुद्ध ॥४॥पाहूनि तयासी आक्रंदती स्त्रिया । म्हणती हाय दैवा न सहे दु:ख ॥५॥प्रजेसवें आम्हां संरक्षिलें तूंचि । निघूनि गेलासी त्यजूनि केंवी ॥६॥जगूनियां आतां कर्तव्य न आम्हां । येऊं दयाघना, अससी तेथें ॥७॥वासुदेव म्हणे दु:ख ऐशापरी । करितां राहिली अग्निक्रिया ॥८॥१४इतुक्यांत एक पातला बालक । म्हणे तुम्ही श्रेष्ठ सकल मज ॥१॥प्रतिदिनीं जन्म-मृत्यु दिसे तुम्हां । अद्यापि हा मना मोह केंवी ॥२॥आला तेथें गेला प्राणि हा निघून । शोकाचें कारण न कळे मज ॥३॥रायासम तुम्ही सकळ जाणार । पाहूनि आश्चर्य वाटे, शोक ॥४॥त्यागितांही मज माता-पितरांनीं । चिंता लव मनीं नसे माझ्या ॥५॥अशक्ताही मज पशु न पीडिती । व्याघ्र ते वृकादि हिंसकही ॥६॥गर्भांत जयानें रक्षिलें तो नित्य । मज संरक्षक सर्वकाळ ॥७॥वासुदेव म्हणे बालकाचा बोध । ऐकावया चित्त शांत करा ॥८॥१५उत्पत्ति-स्थित्यादि करी सर्व ईश । स्वाधीन हें विश्व सकल त्याच्या ॥१॥असंरक्षितही मार्गी वस्तु राही । रक्षितांही जाई गृहांतूनि ॥२॥दुर्बलही वनीं राहो सुरक्षित । एखादा बलिष्ठ सदनीं मरे ॥३॥संरक्षक तेथें एक ईश्वरेच्छा । कारण या देहा सूक्ष्म देह ॥४॥प्राक्तनासमान प्राणी पावे जन्म । सर्वत्र नियम एकचि हा ॥५॥असूनिही देहीं अलिप्तचि आत्मा । देहचि हा अज्ञां आत्मा वाटे ॥६॥दृश्य जडदेह आत्मा मानूं नये । देहामाजी राहे यद्यपि तो ॥७॥वासुदेव म्हणे सदनस्थ प्राणी । सदन न कोणी म्हणे ज्ञाता ॥८॥१६घट, कुंडलें बुद्बुद । आकार जैं होतो नष्ट ॥१॥पंचभूतात्मक ऐसा । आकार हा नष्ट तैसा ॥२॥दाहप्रकाशकादिकांनीं । समजे काष्ठभिन्न अग्नि ॥३॥तैसा जड चेतनांचा । भेद ध्यानीं घ्यावा साचा ॥४॥तुमचा सुयज्ञ हा एथें । म्हणूं नका वदे ऐसें ॥५॥वदला तो न दिसे कोणा । स्वप्नचि हा भास जाणा ॥६॥गेला सुयज्ञ हा अद्य । सांगा कदा तुमचा अंत ॥७॥न कळे तुम्हांसी तें जरी । व्यर्थचि हा शोक तरी ॥८॥वासुदेव म्हणे ईश । सकल कर्ता म्हणे लोक ॥९॥१७कुलिंगपक्ष्यांची बाळ सांगे कथा । देऊनियां चित्ता परिसा म्हणे ॥१॥निर्मियेला एक पारधि प्रभूनें । पसरी लोभानें जाल वनीं ॥२॥आमिष दावूनि धरी पक्ष्यांप्रति । एकदां दंपती कुलिंगाची ॥३॥पाहूनि युक्तीनें धरिलें मादीतें । खेद अंतरातें कुलिंगासी ॥४॥मुक्त करावया नव्हतें सामर्थ्य । वृक्षावरी शोक बसूनि करी ॥५॥म्हणे निर्दय हा देव पहा किती । दीन स्वभावेंचि असती स्त्रिया ॥६॥त्यांतही आक्रोश करी मम कांता । लाभ त्या व्यापका काय येणें ॥७॥ऐशा स्थितीहूनि नेता जरी मज । पावतों आनंद तरी तेणें ॥८॥वासुदेव म्हणे आठवी पिलांस । व्याकुळ कुलिंग तयावेळीं ॥९॥१८अद्यापि पंखही फुटले न बाळां । सोडूनि तयांला गेली कांता ॥१॥पोषण तयांचें करुं केंवी आतां । मातेची अपेक्षा करितील तीं ॥२॥ऐसा आर्तस्वरें करी तो विलाप । तोंचि मर्मभेद होई त्याचा ॥३॥व्याधशर घुसे शरीरीं तयाच्या । ऐसीच अवस्था तुमची म्हणे ॥४॥शत वर्षे जरी आरंभिला शोक । तरी पतिभेट शक्य नसे ॥५॥वासुदेव म्हणे आप्तांप्रति ऐसा । बोध त्या दैत्याचा ध्यानीं घ्यावा ॥६॥१९दैत्य म्हणे बालरुपी यमराज । करी उपदेश स्त्रियांप्रति ॥१॥सांत्वन तयांचें करुनियां गुप्त । जाहला तेथेंच बाळ यम ॥२॥पाहूनि तें स्त्रिया होऊनियां शांत । उत्तरक्रियेस करिती सुखें ॥३॥यास्तवचि माते, वहिनी, बाळांनो । तुम्हांसी सांगतों ऐका प्रेमें ॥४॥कोणास्तव कदा करुं नका खंत । अभिमान व्यर्थ मानवाचा ॥५॥काय असे सांगा या स्थळीं आपुलें । अज्ञानें भासलें सकळ द्वैत ॥६॥कळतां हें नसे शोकासी कारण । पावा समाधान दैत्य म्हणे ॥७॥वासुदेव म्हणे कथिती नारद । त्यजिला तैं खेद सकलांनीं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP