मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|

कोकीळामहात्म्य - अध्याय विसावा

शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.


॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीहरीस विनवी धर्म ॥ कथा कांही सांगा उत्तम ॥ केवळ आनंदाचे धाम ॥ ऐसी कथा सांगावी ॥१॥
कथा ऐकावया चित्त ॥ आमुचे असे उल्हासयुक्त ॥ कृपाकरुनी अद्भुत ॥ नवल कांही सांगावें ॥२॥
हरी बोले आनंदे करुनी ॥ किंचित अटकले माझे मनीं ॥ महाराज विश्वामित्रमुनी ॥ एकदां गेला ब्रह्मलोकीं ॥३॥
विश्वामित्र राजकुमार ॥ परी ऋषीच झाला निर्धार ॥ महातपस्वी दिनकर ॥ उग्रतेज जयाचें ॥४॥
क्रोथ ज्याचा अति प्रबळ ॥ ब्रह्मांड जाळी रची समय ॥ किर्तीचा केवळ भुगोल ॥ ऋषी अवघे भीति तया ॥५॥
तो महाराजमुनी श्रेष्ठ ॥ सदां आचरे तप कष्ट ॥ त्याचेम स्मरण करितां स्पष्ट ॥ सर्व कष्ट नासती ॥६॥
तो ऋषी ब्रह्मलोकांसी ॥ जाता झाला एके दिवशीं ॥ ब्रह्मयास न मानी तयासी ॥ राजऋषी म्हणोनियां ॥७॥
उभा राहे उठोन ॥ म्हणी यावें राजनंदन ॥ ऐसें वचन ऐकोन ॥ न बैसतां क्षोमला ॥८॥
ऋषी म्हणे माजलासी ॥ सृष्टी केली म्हणोन गर्वासी ॥ तरी तुझा गर्व छेदीन निश्चयेसीं ॥ जरी मी ऋषी असेन ॥९॥
सृष्टी नवीन रचीन आतां ॥ तूं गर्वे फुगलासी तत्वतां ॥ ऐसें ऐकोनी विधाता ॥ म्हणे सृष्टी करावी ॥१०॥
ऋषी परतला सत्वर ॥ कोपेंकरुन फुगलें उदर ॥ ब्रह्मयावरी रुसला फार ॥ ऋषीराव तेधवां ॥११॥
आला आपुले आश्रमास ॥ आरंभ करी सृष्टीस ॥ मनुष्यांची झाडें सुरस ॥ करिता झाला तात्काळ ॥१२॥
ब्रह्ययाचीं मनुष्यें थोडीं ॥ ऋषीनें पेरिलीं मनुष्याचीं झाडें ॥ कन्यापुत्र पाहिजे निवाडें ॥ तरी झाडाची तोडून आणावीं ॥१३॥
त्या मनुष्यास भक्षावयास ॥ ऋषीनें गहूं निर्मिले सुरस ॥ गव्हांत घालून अमृतास ॥ तेणे अमर मनुष्यें राहती ॥१४॥
जोंधळे सजगुरें निश्चितीं ॥ यास कोणी न खाती ॥ विश्वामित्राचे गहूं निश्चितीं ॥ गोडमध्यें अमृत ॥१५॥
ब्रह्मयाचे उडीद मूग ॥ यानें तुरी केल्या सुगम ॥ ब्रह्मयाची साळ ठोसर उत्तम ॥ ऋषी कमोद करी तेव्हां ॥१६॥
कमोदिस सुवास फार ॥ तांदुळ बारीक आणि मधुर ॥ ब्रह्मयाचे सावे पेररिक ॥ ऋषी राळे निर्मित ॥१७॥
ब्रह्माच्या गाई असति ॥ ऋषी म्हशी करी निश्चितीं ॥ गाई किंचित दुभत्या ॥ म्हशी दुभत्या बहु फार ॥१८॥
ब्रह्मयाचे कांच निश्चितीं ॥ ऋषी कांचन निर्माण करती ॥ ब्रह्मयाचे रुपें निश्चिती ॥ हा सोनें निर्माण करीतसे ॥१९॥
सोन्याचा केला सुकाळ ॥ घरोघरी सोनें पुष्कळ ॥ घरेम सोन्याची निर्मळ ॥ भिंती सोन्याच्या करीतसे ॥२०॥
ब्रह्मयाचे जांबुळ वृक्ष ॥ हा निर्मी आम्रवृक्ष ॥ जें प्राणीमात्राचें भक्ष ॥ अमृतातुल्य गोड जें ॥२१॥
ब्रह्याचे महु निश्चितीं ॥ हा साग निर्मी शीघ्रगती ॥ ब्रह्मयाचे खर असती ॥ ऋषी करी उंटासी ॥२२॥
ब्रह्मयाची भांग असे ॥ हा अफू निर्माण करीतसे ॥ ब्रह्मयाची धात्री असे ॥ हा तुळसी निर्माण करीतसे ॥२३॥
ब्रह्मयाच्या शेळ्या निश्चिती ॥ हा मेंढया निर्माण करीत ॥ ब्रह्मयाच्या कोकिळा निश्चित ॥ मयूर ऋषी करीतसे ॥२४॥
ब्रह्मयाचे रेशीम आहे ॥ हा कपाशी निर्मिता आहे ॥ ब्रह्मयाची शाल होय ॥ ऋषी बनाती करीतसे ॥२५॥
ब्रह्मा करीशिसें ॥ हा लोखंड करी विशेष ॥ हा तांबे करी निर्माण ॥२६॥
ब्रह्ययाची जाईजुई ॥ हा मोहारा चापा करी ते समयीं ॥ ब्रह्ययाहून सवाई ॥ सृष्टी करि मुनेश्वर ॥२७॥
आणिक केलें विशेष ॥ औषधें करी सावकाश ॥ ज्याज्या येती कामास ॥ त्यात्या विश्वामित्र करीतसे ॥२८॥
वृक्ष तेणें केले अनेक ॥ काशी फळादि शाखा देख ॥ पुष्पाची झाडें पार्यातक ॥ उत्तम तेणेम निर्मिले ॥२९॥
ब्रह्मयाची जायपत्री ॥ हा निर्मि तमालपत्री ॥ ब्रह्मा तेव्हां मिरें करी ॥ ऋषी मिरच्या करीतसे ॥३०॥
ब्रह्मयाचे मायफळ ॥ ऋषी निर्मिता जायफळ ॥ सुगंधवसु सुकळ ॥ विश्वामित्र करीतसे ॥३१॥
वांगी कोथिंबीर मेथीची भाजी ॥ गाजरें फाळोळी सेपुची भाजी ॥ राताळु गोराडु सहजी ॥ कंदमुळ समसत ऋषी करी
॥३२॥
बिल्ववृक्ष ब्रह्मा करीत ॥ मक्याचीं कणसे निश्चित ॥ वाळके कांकड्या बहुत ॥ ऋषी राज्य करीतसे ॥३३॥
अश्वरथ करी उत्तमोत्तम ॥ हिरे सुंदर करी परम ॥ सुखासने ज्याची नामे ॥ पालख्या त्यासी म्हणताती ॥३४॥
ऐसें नाना प्रकार ॥ करिता झाला मुनेश्वर ॥ ब्रम्हयाहुन शतगुणे थोर ॥ पदार्थ येणें निर्मिले ॥३५॥
स्त्रियापति व्रता पुरुष ज्ञानि ॥ ऐसें निर्मी महामुनी ॥ मृत्यु त्यासी स्वप्नि ॥ कल्पांत झाल्या न दिसे ॥३६॥
प्यावयालागी जीवन ॥ निर्मिल्या अखंड सरिता जाण ॥ गंगायमुनादिक पूर्ण ॥ निर्माण जेणें केल्या कीं ॥३७॥
आणिक काय करीत ॥ मंत्रयंत्राची शास्त्रे बहुत ॥ ज्याचा चमत्कार सध्या येत ॥ ऐसे तेणें निर्मिले ॥३८॥
ऐशा सामर्थे केली सृष्टी ॥ आनंद झाला सर्वांचे पोटीं ॥ ब्रह्मा तेव्हां झाला कष्टी ॥ हा वर्तमान कळला जेव्हां ॥३९॥
ब्रह्मा म्हणे सर्व बुडालों ॥ माझें महत्व वृथा गेलें ॥ काय करावें ये वेळे ॥ शरण जावें कोणासी ॥४०॥
मी चांडाळ परम ॥ ऋषी येतां न दिला मान ॥ तेणे केलें हें काम ॥ मज तुच्छ करोनियां ॥४१॥
नाना रीती शोक करुनी ॥ हरीसी शरण गेला ते क्षणीं ॥ हा वर्तमान सांगोनी ॥ सदन करी अपार ॥४२॥
देवा म्यां आतां काय करावें ॥ कोणतें कर्म आचरावें ॥ ऋषी रुसला तेणें अवघे ॥ कर्म केलें अद्भुत ॥४३॥
विष्णु म्हणे ब्रह्मदेवा ॥ तुम्ही शरण जावे शिवा ॥ ऋषी लागी उपाय करावा ॥ क्रोध जाय जेणें त्याचा ॥४४॥
मग ब्रह्म गेला शिवा जवळी ॥ साष्टांग नमस्कार घाली ॥ शिवास वर्तमान ते वेळी ॥ ऋषी सृष्टीचा निवेदिला ॥४५॥
शिव म्हणे ऋषी समर्था ॥ कोपल्यावरी फार अनर्थ ॥ त्याचा क्रोध यथार्थ ॥ ठाऊक आहे आम्हांसी ॥४६॥
तो ब्रह्मा बोले वचन । स्वामी आपण त्यास सांगोच ॥ त्याचा क्रोध शांत करुन ॥ माझे शिष्यत्व करुन घ्यावें ॥४७॥
मी त्यांस जाईन शरण ॥ परी मज देखतांच करील तांडण ॥ त्या पाशी चला घेऊन ॥ म्हणोनी चरणीं लागला ॥४८॥
शिव म्हणे कासया श्रमसी ॥ तों आमुचे न मानी निश्चियेसी ॥ ऐसें बोलतां शिवासी ॥ ब्रह्मा करी रुदन ॥४९॥
मग शिव उठले तात्काळ ॥ देखोनी ब्रह्मा याचा कल्लोळ ॥ सवें घेऊनी मेळ ॥ आला असे विष्णु जवळी ॥५०॥
विष्णुसी म्हणे तुम्ही चला ॥ ऋषी समजाऊ येवेळा ॥ ऐसें एकोनी विष्णु वहिला ॥ तेव्हांच उठले तात्काळ ॥५१॥
सर्व देवासी वर्तमान ॥ निवेदन करावा आपण । इंद्रही आला न लागतां क्षण ॥ जाते झाले ऋषी प्रती ॥५२॥
देखतांची महामुनी ॥ सर्व जयजयकार करुनी ॥ ब्रह्मदेव जाऊनी ॥ मिठी चरणा घालीत ॥५३॥
सर्व देव करीती स्तुती ॥ म्हणती धन्य धन्य त्रिजगरी ॥ दुसरी सृष्टी केली निश्चिती ॥ तपो बळे करुनियां ॥५४॥
शिव म्हणे ऋषीस ॥ ब्रह्मा तुमचा दासानुदास ॥ ताडन क्षिक्षा कराल यास ॥ तरी हा न बोले कांहीं ॥५५॥
तुम्हीं करावी दया ॥ यानें अभिमान केला वाया ॥ विशेषपणें नेणोनियां ॥ काय यासी भुल जाहली ॥५६॥
ऐसें शिव करितां स्तवन ॥ ऋषी आनंदला पूर्ण ॥ सप्रेमें दाटुन ॥ ब्रह्मयासी उठ म्हणे ॥५७॥
तुम्ही याचें शीर छेदून ॥ टाकाल तरी अन्य शरण ॥ तुमचा प्रताप परिपूर्ण ॥ कृपा केली तुजवरी ॥५८॥
काय अपेक्षा असेल ह्र्दयीं ॥ प्रसन्नवदन करुन पाहीं ॥ मागावर देतों लवलाही ॥ मना तुझ्या आवडे तो ॥५९॥
मग उठला ब्रह्मदेव ॥ कर जोडुनियां करी स्तवन ॥ वर मागता झाला अपूर्व ॥ आवडे तो तुजसी ॥६०॥
ऋषी बोले वचन ॥ मज वर द्यावा कृपा करोनी ॥ तीन वस्तु पृथ्वीमधून ॥ दूर कराव्या सर्वथा ॥६१॥
सुवर्ण केलें पुष्कळ ॥ ते आच्छादावे सकळ ॥ सुवर्णमय प्रबळ ॥ लोक कोणास न मानिती ॥६२॥
आणि गव्हांतील अमृत ॥ ते काढावें त्वरित ॥ जन अमर झालिया सत्य ॥ व्यापार माझा न चालेची ॥६३॥
मनुष्याचीं झाडें असतीं ॥ हे गुप्त करावी निश्चिती ॥ फार मनुष्यें नसावी क्षितीं ॥ भार होईल अपार ॥६४॥
ऐशा ह्या गोष्टी तीन ॥ स्वामी गुप्त कराव्या जाण ॥ अन्याय माझा क्षमा करुन ॥ वर मज इतुका द्यावा ॥६५॥
वरकड वस्तु याचा ॥ परी ह्या तीन वस्तु अनर्थाच्या ॥ लोप करुनियां याचा ॥ वरकड सामान्य असावें ॥६६॥
ह्या तिन्ही असल्या जाण ॥ कोणी कोणासी न भजती पूर्ण ॥ ठायींच्याठायीं मस्त होऊन ॥ बैसती अमर होऊनियां ॥६७॥
ऋषी म्हणे चिंता न करी ॥ आतां गुप्त करितों निर्धारी ॥ मग सर्व सुवर्ण गोळा करी ॥ पर्वत केला निर्धारे ॥६८॥
तो सुवर्णाचा पर्वत भिरकाविला ॥ हिमालया पलीकडे पडला ॥ सुवर्णाद्रि म्हणती तयाला ॥ तोहि विश्वामित्रें केला असे
॥६९॥
तें सुवर्ण घ्यावयालागुन ॥ जरी कोणी जाती जाण ॥ तो आडवा हिमालय देखोन ॥ हिवें करुन मरती प्राणी ॥७०॥
ऐसें सुवर्ण लपविलें ॥ मग गहुं तात्काळ आणिले ॥ तयाचें पोट चिरिलें ॥ मधून काढिलें अमृत ॥७१॥
अद्यापि साक्षी असे सत्य ॥ गहूं चिरला दिसत ॥ मनुष्य झाडे यथार्थ ॥ श्रीफळ वृक्ष आहेत ॥७२॥
तयासी लागती श्रीफळें ॥ नानापरी नाक डोळे ॥ मग तेहि आच्छादिले ॥ ब्रह्मा अती आनंदला ॥७३॥
पुढती नमस्कार घालीत ॥ वारंवार स्तुती करीत ॥ ब्रह्मा झाला गर्वहत ॥ प्रताप देखोन ऋषीचा ॥७४॥
सर्व देव आनंदले ॥ शिवही अती हर्षला ॥ मग ऋषीनें पूजिले ॥ सएर्व देव शिवविष्णु ॥७५॥
उभा राहिला कर जोडूनी ॥ म्हणी आश्रम केला पवित्र ॥ ब्रह्मयाचे कैवारें ॥ तुह्मां येथें येणें झालें ॥७६॥
विष्णु आणि शिव तेक्षणीं ॥ ऋषीची आज्ञा घेऊनी ॥ तेथून निघाले ते क्षणीं ॥ आश्रमा आले आपुलिया ॥७७॥
ब्रह्मा बैसला स्वस्थानीं ॥ गर्व गेला झडोनी ॥ लहानथोर येत कोणी ॥ साष्टांग नमस्कार करीतसे ॥७८॥
ऐसें कोकिळा महात्म्य ऐकतां ॥ सर्व हरे व्याधीव्यथा ॥ सौभाग्यदायक ही कथा ॥ मनकामना पुरतील ॥७९॥
कोकिळाव्रताचें महिमान ॥ कोण करील वर्णन ॥ श्रीकृष्ण स्वयें आपण ॥ धर्माप्रती सांगता ॥८०॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ विंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२०॥ ओंव्या ॥८०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २० वा समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 29, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP