मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य| अध्याय चवथा श्री कोकिळा माहात्म्य ॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥ अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठठाविसावा अध्याय ऐकोणतिसावा अध्याय तिसावा कोकीळामहात्म्य - अध्याय चवथा शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. Tags : kokilamarathipothiकोकिळापोथीमराठी कोकीळामहात्म्य - अध्याय चवथा Translation - भाषांतर ॥श्रीगणेशाय नम:॥ धर्म म्हणे दयानिधी ॥ पार्वती कोकिळा जालि कधीं ॥ काय निमित्य मजला आधी ॥ सांगावे जी दयाळा ॥१॥ऐकरे धर्मा भक्त राया ॥ कोकिळा झालि आदिमाया ॥ जीची किर्ती वदावया ॥ शेषा सामर्थ्य असेना ॥२॥कोणे एके समई जाण ॥ क्षीरसागरी नारायण ॥ निजले असतां जगज्जीवन ॥ लक्ष्मी चरण चुरीतसे ॥३॥नारायणाच्या नाभीकमळीं ॥ ब्रह्मा उत्पन्न ते काळीं ॥ आनंदें प्रतिपाळी ॥ भक्तालागीं आदिमाया ॥४॥ब्रह्मा आनंदें खेळतां ॥ तेथें विवसी उत्पन्न झाली तत्वतां ॥ नारायण निद्रिस्त असतां ॥ कौतुक झाले अपूर्व ॥५॥कानामध्यें मळ फार झाला ॥ त्यांतून एक दैत्य निघाला ॥ मधुनाम तयाला ॥ कैटभा नाम दुसरा ॥६॥मधुकैटभा दोघेजण ॥ निर्वाणी झाले दारुण ॥ ब्रह्मयासी पाहून ॥ युध्द त्यासी करुं ह्मणती ॥७॥ब्रह्मा तेथोनि पळाला ॥ आदि मायाजवळी आला ॥ भयाभीत ब्रह्मा देखिला ॥ मग आदिमाया बोलतसे ॥८॥निद्रिस्त असतां नारायण समर्थ ॥ त्याचें स्तवन करी यथार्थ ॥ मग ब्रह्मा आदे स्तवीत ॥ जयजय शब्द करोनी ॥९॥ह्मणे जयजय नारायणा ॥ मधुकैटभ घेऊं म्हणती प्राण ॥ धांव सत्वर दीनरक्षणा ॥ योगनिद्रा मोडोनी ॥१०॥लक्ष्मी ह्मणे प्राणनाथा ॥ ब्रह्मा संकटि पडतां ॥ आदिमायेचा शब्द ऐकतां ॥ जागे दयाळ जाहाले ॥११॥जागृत होवोनी कैवल्यदानी ॥ मधुकैटभ जवळी येऊनी ॥ युध्दासी प्रवर्तले तेचक्षणीं ॥ दारुण दैत्य महाथोर ॥१२॥नारायणासी युध्द करितां ॥ दिवस झाले फार पाहतां ॥ नारायणें उभयतां ॥ बहुपराक्रमी देखिले ॥१३॥प्रसन्न होऊनी जगदीश्वर ॥ ह्मणी माग इच्छीतवर ॥ ते म्हणे पराक्रम थोर ॥ आमुचा असे तुजहुनी ॥१४॥तुजला असेल इच्छा कांही ॥ मग ते देऊं आह्मी पाही ॥ ईश्वर ह्मणतसे भाक लवलाही ॥ दिली आह्मां पाहिजे ॥१५॥त्रिवाचा मग भाक देऊन ॥ प्रसन्न होवोनी दोघेजन ॥ म्हणती सत्यसत्य नारायण ॥ तुमचे इच्छीत तुम्ही मागा पै ॥१६॥नारायण म्हणे हो समर्था ॥ तुमचे प्राण मज द्यावे आतां ॥ ऐसें वदतां तत्वतां ॥ शरीरप्राण समर्पिले ॥१७॥देवें त्याचा प्राण घेऊनी ॥ ज्योती शरीरांत मेळऊनी ॥ मग म्हणे कैवल्यदाणी प्रेतें थोर बहु असुराचें ॥१८॥मग ते दोन शरीरें वोढून ॥ त्याची हे पृथ्वी निर्माण करुन ॥ मांस दैत्याचें मृत्तिका जाण ॥ हाडें पाषाण सर्वही ॥१९॥यास्तव पृथ्वी अपवित्र पूर्ण ॥ गाईच्या शेणें सारवून ॥ वरी पूजन करावें जाण ॥ नित्य नेम यथाविधी ॥२०॥पाषाणावरी बैसोन ॥ जप केला जरी जाण ॥ रोग होतसे दारुण ॥ कांही केल्या नव जाये ॥२१॥वस्त्राचे आसन करितां ॥ दरिद्र प्राप्त होय तत्वतां ॥ दर्भाचे आसन करितां ज्ञान उद्भव होतसे ॥२३॥मृगचर्मावरी बैसोन ॥ जपतां अगणीत प्राप्ती धन ॥ पुत्रपौत्रवाढे संतान ॥ अगाध महिमा तयाचा ॥२४॥व्याघ्रचर्म आसन केलिया ॥ मोक्ष प्राप्त होय तया ॥ कमलासन केलिया ॥ सिध्दी प्राप्त होतसे ॥२५॥ह्मणोनी मृत्तिका तुळसीमुळीची ॥ पवित्र द्वारका क्षेत्राची ॥ वरी पंढरीरंग शिळेची ॥ महापवित्र जाणिजे ॥२६॥रंग शिळेवरील मृत्तिका आणून ॥ कोणासी भूत लागेल पूर्ण ॥ त्यावरी टाकावी अणुप्रमाण ॥ दूर पळे भूत तयापासूनी ॥२७॥असो ब्रह्मा संकटापासुनी ॥ मुक्त झाला तत्क्षणीं ॥ ह्मणे जयजय कैवल्यदानी ॥ महासंकट वारिलें ॥२८॥महाराजा दिनदयाळा ॥ तुझी नकळे अगाध लीला ॥ मी दासानुदास आगळा ॥ प्रताप तुझा देखिला ॥२९॥मग म्हणे सारंगपाणी ॥ सृष्टि तुवां करावी येथुनी ॥ ब्रह्मा ह्मणे मोक्षदानी ॥ ज्ञान मज नाहीं करावया ॥३०॥मग तो सखा देवाधीदेव ॥ मंत्र उपदेशी दयार्णव ॥ त्या मंत्राचे अपार सत्व ॥ ब्रह्मा तप करिता जाहला ॥३१॥तपाचे अंती नारायण ॥ चारी वेद दिले आणून ॥ म्हणे ब्रह्मया हें पाहून ॥ सृष्टी करी मम आज्ञे ॥३२॥पृथ्वी शेष मस्तकावरुनी ॥ छपन्न कोटि योजने भरोनी ॥ लांबरुंद विस्तारुनी ॥ केली देवे अपूर्व ॥३३॥बुडे पृथ्वी जळांत ॥ ह्मणुनी शेषमस्तक धरीत ॥ बुडोन जाईल यथार्थ ॥ ह्मणुनी दिग्गज स्थापिले ॥३४॥अष्ट दिशे अष्टजण ॥ दिग्गज बैसले दडापून ॥ कुळाचार पर्वत आठजण ॥ अष्टदिशेस स्थापिलें ॥३५॥ऐसें नानारक्षक आहे ॥ तेणें पृथ्वी स्थिर राहे ॥ नाहीतरी उडोन पाहे ॥ बुडातां विलंब नसेची ॥३६॥ऐसें नारायणे जाण ॥ सृष्टी केली निर्माण ॥ मधुकैटभ दैत्य मर्दून ॥ त्यांच्या रक्तमासाची ॥३७॥वरी ब्रह्मया चारी खाणी ॥ निर्मिता झाला आदरेंकरुनी ॥ ज्यारज अंडज उद्भीवश्वेत जननी ॥खाणी चारी झाल्या पै ॥३८॥ब्रह्मयाच्या अंगुष्ठापासुनी दक्ष निर्माण झाला ज्ञानी ॥ परम पुरुषार्थी त्रिभुवनी ॥ ऐसा नद दिसे दुसरा ॥३९॥आदिमाया जगदोध्दारी ॥ ज्याच्या पोटी घेईल अवतारी ॥ त्याचें काय वर्णावें चरित्रीं ॥ शेषासही नसे सामर्थ्य ॥४०॥दक्ष रायाची कांता ॥ श्रीखादवी पतिव्रता ॥ जिचे उदरीं आदिमाता ॥ जन्म घेईल निर्धारें ॥४१॥श्रीयादवी म्हणे दक्षराया ॥ संतान नाहीं प्राणसखया ॥ कांही जप तप करोनिया ॥ यज्ञदिक करावें ॥४२॥पुत्रइष्टी यज्ञा उत्तम ॥ करावाअ जी भावें करोन ॥ अथवा कन्या झालीया जाण ॥ तरी तेही बरवें असे ॥४३॥दक्ष म्हणे वो महासती ॥ आराधिजे देवी पार्वती ॥ ह्माणोन श्रियादेवीप्रती ॥ मंत्र दिधला पार्वचा ॥४४॥जप करिता श्रिया देवी ॥ तेणीं तुष्टली श्रीसांभवी ॥ कैलासाहूनी लवलाही ॥ धांवली हो भक्त काजा ॥४५॥म्हणे झालें सुप्रसन्न ॥ श्रीयादेवि मागे वरदान ॥ म्हणे तूं होई माझी कन्यारत्न ॥ हेंचि अंबे मागणें तुजपाशी ॥४६॥अंबा तथास्तु म्हणत ॥ तुझा पूर्ण होईल मनोरथ ॥ देवीदेव आनंदात ॥ मनुष्येंही आनंदलीं ॥४७॥झाला परम उल्हास ॥ श्रियादेवी आणि दक्षास ॥ म्हणती भाग्य विशेष ॥ कळले वरदें देवीच्या ॥४८॥कांही दिवस लोटलियावरी ॥ पोटा आली त्रिपुरसुंदरी ॥ तेणें हर्ष झाला निर्धारीं ॥ तेज अंबरी न समाये ॥४९॥दिवसांची पूर्णता झाली जेव्हां ॥ श्रीया देवी प्रस्तुत झाली तेव्हां ॥ होताचि देवमेळा बरवा ॥स्तवनालागीं पातलें ॥५०॥देव करिती अपार स्तवन ॥ उभे बध्दांजुळी जोडून ॥ पुष्पें वर्षाती सुरगण ॥ आनंद ब्रह्मानंदी जाहला ॥५१॥ऐसें आख्यान पवित्र ॥ ऐकतां उध्दरें सप्तगोत्र ॥ वंसी कन्या आणि पुत्र ॥ होतील देवी प्रसादे ॥५२॥इति शी भविष्योत्तरपुराणें ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिला महात्म्य चतुर्थोऽध्याय गोडहा ॥५३॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥॥ अध्याय चवथा समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : October 28, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP