मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य| अध्याय तेरावा श्री कोकिळा माहात्म्य ॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥ अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठठाविसावा अध्याय ऐकोणतिसावा अध्याय तिसावा कोकीळामहात्म्य - अध्याय तेरावा शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. Tags : kokilamarathipothiकोकिळापोथीमराठी कोकीळामहात्म्य - अध्याय तेरावा Translation - भाषांतर N/A॥ श्रीगणेशाय नम: ॥ धर्मराज म्हणी श्रीहरी ॥ सांग कथेची नवलपरी ॥ किमर्थ रुक्मिणी सुंदरी ॥ व्रत करी कोकिळेचें ॥१॥हें सांगावें आम्हांलागुन ॥ कोकिळाव्रताचें महिमान ॥ रुक्मिणी आदिमाय आपण ॥ काय निमित्य हें व्रत करी ॥२॥आतां हें आह्मांलागुन ॥ निवेदन करा कृपा करुनी ॥ म्हणोनी हरीचरणीं ॥ मस्तक ठेविते जाहले ॥३॥हरी म्हणे समस्तांप्रती ॥ कायरे ऐकतां काकुळती ॥ माझ्या आणि तुमच्या चित्ती ॥ द्वैतभाव असेना ॥४॥तुम्ही मीन मी क्जळ ॥ तुम्ही कीरणें मी सूर्य निर्मळ ॥ ओंकार मी तुम्ही सुवर्ण सोज्वळ ॥ अभेदपण नसे कांही ॥५॥तरी शंका मनी न धरितां ॥ पुसावें मज भावें करुनी ॥ मी सांगेन तुम्हालागुनी ॥ सत्यवचन हें माझें ॥६॥तुम्ही माझे केवळ प्राण ॥ मज न गमे तुम्हांवीण ॥ तुमचें माझें अतं:करण ॥ एक असे सर्वथा ॥७॥तुम्ही अनमान न करावा ॥ संशय येईल तो पुसावा ॥ धन्य प्राक्तन माझें पांडवा ॥ संग जोडिला निर्धारें ॥८॥आतां व्हावें सावधान ॥ ऐका कथेचें अनुसंधान ॥ रुक्मिणीनें कोकिळाव्रत केलें जाण ॥ तें सांगतों तुह्मांप्रती ॥९॥पूर्वी अत्री मुनेश्वर ॥ अनुसुया त्याची कांता निर्धार ॥ तिचे पोटीं दुर्वास मुनेश्वर ॥ जन्मला ऋषेश्वर ॥१०॥अत्री ऋषीचा पराक्रम ॥ वर्णावा जरी अनुक्रमेंकरुन ॥ तरी त्याचे पोटीं दुर्वासरत्न ॥ जन्मला त्यातें काय वर्णू ॥११॥तिने हे तिघेजण निश्चित ॥ लहान बाळे केली ॥ सत्य ऐसी ते पतिव्रता मूर्तिमंत ॥ तिचें महात्म्य कोण वर्णीले ॥१२॥पतिव्रतेचा महिमा कोण वर्णी ॥ ऐसा पृथ्वींत आहे कोण ॥ तिचे पोटीं दुर्वासरत्न ॥ जन्मला महाराज साधु तो ॥१३॥तो दुर्वास कैसा समर्थ ॥ कोपे तेव्हां करी अनर्थ ॥ अन्याय देखोनी यथार्थ ॥ श्राप देत ब्रह्मादिका ॥१४॥केवळ शिवाचा अवतार ॥ तप त्याचें बहुत थोर ॥ चळचळा कांपती देव असुर ॥ ऋषेश्वर देखतांची ॥१५॥तों एकदां दुर्वासमुनी ॥ आला असे द्वारके लागुनी ॥ उतरला येऊन उपवनी ॥ द्वारकेजवळीके ॥१६॥हें वर्तमान यदुपास ॥ कळलें उपवनी आला दुर्वास ॥ रुक्मिणी म्हणे श्रीहरीस ॥ भोजनासी त्यास पाचारावें ॥१७॥हरी म्हणे ऐक भीमकी ॥ तो ऋषी असे शीघ्र कोपी ॥ किंचित अपराध देखतां श्रापी ॥ सत्यवचन माझे हें ॥१८॥तरी आतां मौन्यची रहावें ॥ ऋषीलागी न पाचारावें ॥ तेथेंच त्यास अन्न द्यावें ॥ भक्षावयालागुनी ॥१९॥मग रुक्मिणी बोलली वचन ॥ ऐसा तपोनिधी परिपूर्ण ॥ आला त्याचे चरण ॥ पहावे हेत मनीचा ॥२०॥तरी स्वामी ह्रषीकेषी ॥ मान्य करावे या गोष्टीसी ॥ घरी आणावें ऋषीसी ॥ पूजा करुं शोडशोपचारें ॥२१॥तयासी जावें आणावया ॥ सत्वर जावें यादवराया ॥ म्हणुनी रुक्मिणी हरीच्या पाया ॥ लागतसे सप्रेमें ॥२२॥आणिक काय बोले हरिप्रती ॥ ऐशा मूर्ती अलिप्त जगतीं ॥ अनायासें आली गृहाप्रती ॥ अव्हेर त्याचा न करावा ॥२३॥यति आणि ब्रह्मचारी ॥ विद्यार्थी गुरु सेवक निर्धारीं ॥ मार्गस्त आणि क्षीणवृत्ती जरी श्रेष्ठ जाण हे भिक्षुक ॥२४॥तरी ऐका नारायण ॥ हा पांथिक आला जाणा ॥ यासी आणोनियां सदना ॥ षोडशोपचारें अर्पावा ॥२५॥हरी म्हणे रुक्मिणीसी ॥ काय निमित्त सांगावें त्यासी ॥ तो पुसेल आपणासी ॥ आजि काय पर्वणी असे ॥२६॥तंव तेथें बोलावें यथार्थ वचन ॥ असत्य बोलतां श्रापील दारुण ॥ तरी एकचित्तेकरुन ॥ विचार करावा सर्वथा ॥२७॥काय सांगावा तिथी सन ॥ किंवा सांगावा पितृदिन ॥ तरीच तो येईल जाण ॥ निमित्य पाहून सर्वथा ॥२८॥मग केला विचार ॥ तो बुध्दी आठवली साचार ॥ म्हणती भीमक राजा नृपवर ॥ त्याचीया तिथी सांगावी ॥२९॥म्हणती बोलावें एकचित्तेकरुन ॥ असत्य न पडे सर्वथा जाण ॥ त्यास बोलावें हेंचि वचन ॥ घेऊन यावें घरासी ॥३०॥तों जेथें होता दुर्वास ॥ तेथेंच ते आले विशेष ॥ रथाखालीं उतरला पुराणपुरुष ॥ रुक्मिणी सवेंच उतरली ॥३१॥दोघे चालती बरोबरी ॥ गेला दुर्वासाचे शेजारी ॥ दुर्वास देखतां निर्धारीं ॥ साष्टांग नमस्कार घातला ॥३२॥उभे राहिले जोडून कर ॥ स्तुती करती जाणून थोर ॥ म्हणती धन्य आमचें भाग्य अपार ॥ पूर्व सुकृत आमचें ॥३३॥धन्य झाले आमचे नयन ॥ देखिलें दुर्वासरत्न ॥ धन्य मस्तक झालें जाण ॥ चरणीं ठेविलें दुर्वासाच्या ॥३४॥आजिचा धन्य दिवस ॥ देखिला मुनी दुर्वास ॥ जो रुद्र साक्षांत भूमीस ॥ अवतरला असे हें सत्य पैं ॥३५॥धन्य झाली द्वारकानगरी । धन्य भीमकी आणि मी हरी ॥ दुर्वासा तुझे चरण धनी भरी ॥ देखिले आजी धन्य दिवस ॥३६॥ऐसी करुनियां स्तुती ॥ मस्तक ठेविला चरणावरी ॥ जयजयकारें दोघे गर्जती ॥ सप्रेम चित्तें सर्वदा ॥३७॥दुर्वास म्हणे अगा अच्युता ॥ किमर्थ येणीं केलें उभयतां ॥ काय मनाचा हेत तत्वता ॥ तो निवेदन करावा ॥३८॥उभा ठाकला नारायण ॥ भीमकीचा हेत आपण ॥ की आमुचे घरीं भोजन ॥ करावें आजी स्वामिया ॥३९॥भीमकराज पावला स्वर्ग ॥ परि तो आजी लक्षील मार्ग ॥ त्या निमित्त पिंडदान करावें ॥ प्रत्तिपदा आजी असें ॥४०॥आश्विन शुध्द पाडवा ॥ जन यास म्हणती आजी पाडवा ॥ ज्यामातगृहीं सासरा पाहावा ॥ भोजनास येतो निर्धारें ॥४१॥तरी स्वामी चलावें आपण ॥ पावन करावेंजी सदन ॥ मदन करील पिंडदान ॥ मंदिरासी चलावं ॥४२॥मग बोले दुर्वास ऋषी ॥ कृष्णा मज तुझ्या रथीं बैसविसी ॥ तुम्ही दोघे ओढोन निश्चयेसी ॥ तरीच मी येईन ॥४३॥अवश्य म्हणती दोघे जण ॥ रथीं बैसला दुर्वास आपण ॥ ओढिते झाले दोघेजण ॥ आपुलें बळ वेंचुनियां ॥४४॥सव्यभागीं श्रीहईरी जाण ॥ वामभागी रुक्मिणी आपण ॥ ऐसें दोघे रथ ओढोन ॥ नेते झाले स्वगृहा ॥४५॥अश्वाचेपरी ओढिती ॥ अधोवदन दोघे निश्चिती ॥ तो तृषाक्रांत झाली भीमकी ॥ रथ ओढिता ऋषीचा ॥४६॥कृष्णाचे स्कंधी निश्चिती ॥ दुसर असे जाण सत्य ॥ रुक्मिणीनें दुसर अकस्मात ॥ ठेविले तेव्हां भूमीवरी ॥४७॥कृष्णाचा अंग उंच होता ॥ रुक्मिणीने खालीं ठेवितां ॥ एक अंग झाला खालता ॥ रथ गडबडीला भूमीवरी ॥४८॥ऋषी पडिला रथावरुन ॥ पुढती बैसला सांवरुन ॥ तों रुक्मिणीनें केलें हास्य जाण ॥ ऋषी देखोन कोपला ॥४९॥कांगे मजला पाहुनी ॥ हास्य केलें त्वां मनीहुनी ॥ तरी श्रापितों तुज लागूनी ॥ मज देखोन कां हांसलीस ॥५०॥तूं गेलील पाणी प्यावया लागून ॥ दुसर खालीं ठेउनी जाण ॥ तरीच रथ कलंडला प्रमांण ॥ तूं सोडिला म्हणोनी ॥५१॥तूं परमचक्र चालक ॥ हास्य केलें मज पाहून देख ॥ तरी श्राप घे देतों नि:शंक ॥ वदता झाला मुनी तेव्हां ॥५२॥कृष्णाचा तुझा वियोग द्वापारीं ॥ तूं कलियुगीं जन्म घेसी निर्धारीं ॥ अवतरावें विराटरायाचे घरीं ॥ ऐसें ऐकतां दचकली जगन्माता ॥५३॥म्हणे दुस्तर कर्माचीगति ॥ आतां काय करावें निश्चिती ॥ थरथरां कापली सती ॥ आंग टाकिलें धरणीवरी ॥५४॥स्फुंदस्फुंदोन करी रुदन ॥ नेत्रीं वाहती अश्रुजीवन ॥ मुखचंद्र गेला उतरोन ॥ हरीकडे विलोकी ॥५५॥निचेष्टित पडिलें शरीर ॥ हरी धांवोन गेला सत्वर ॥ ह्रदयीं धरिली ते कुमार ॥ अश्रु पुशिले नेत्रीचें ॥५६॥श्रीकृष्ण म्हणे योगेश्वरा ॥ कां श्रापिलें ईस उदारा ॥ स्त्रियांची जाति ज्ञानसमुद्रा ॥ तुम्हास ठाउक आहे कीं ॥५७॥उगेंच करावें हास्यवदन ॥ असत्य बोलावें अनुदिन ॥ स्त्रियांचा विश्वास न धरावा पूर्ण ॥ परम अज्ञान स्त्रीजाती ॥५८॥नेणतां केले हास्यवदन ॥ तुम्ही श्रापिले इजलागून ॥ तरी महाराज या मज कारण ॥ शिक्षा करावी स्वहस्तें ॥५९॥हें परम अमंगळ तत्वता ॥ ऋषीचा प्रताप नेणता ॥ हास्य केलें तरी ताता ॥ मजकडे तुम्हीं पहावें ॥६०॥श्राप न भोगणे पडे ईस ॥ ऐसा उपाय सांगावा विशेष ॥ म्हनोनि चरण ऋषीकेश ॥ धरिता झाला ऋषीचे ॥६१॥ऋषी म्हणे कृष्णा अवधारी ॥ कोकिळाव्रत हे करी ॥ तरी जन्ममरणाच्या व्यथा दुरी ॥ होतील हें सत्य जाण ॥६२॥मग कोकिळाचें व्रत ॥ करवी रुक्मिणी हाती अनंत ॥ तेणें जन्ममरण निश्चित ॥ दूर झाले रुक्मिणीचे ॥६३॥मग ऋषी नेऊन सदनी ॥ पुजा षोडषोपचार करुनी ॥ यथासांग भोजन घालुनी ॥ बोळविला श्रीहरीनें ॥६४॥ऐसें कोकिळाव्रताचें महिमान ॥ करी आदिमाया रुक्मिणी ॥ तरी धर्मा तुम्हीं करावें आपण ॥ राज्य तेणें पावला ॥६५॥आतं व्हावें सावधान ॥ पुढें कथा ऐका श्रोतेजन ॥ कोकिळाव्रताचें महिमान ॥ शिव सांगे उमेप्रती ॥६६॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ त्रयोदशोऽध्याय: ॥६७॥ अध्याय ॥१३॥ ओवी ॥६७॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतू ॥ श्रीराधाकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ ॥ अध्याय १३ वा समाप्त: ॥ N/A References : N/A Last Updated : October 29, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP