कौटिलतेपासून रहित, शुभ लक्षणानें युक्त रुप व सम्पतीनें युक्त मदापासून रहित, तेजानें युक्त, यशस्वी, कृपावंत, सर्व कळांना जाणणारा, शुद्ध राजवंशामध्यें उत्पन्न झालेला वृद्धाच्या सम्मतीनें चालणारा तीन शक्तींनी [ प्रभावशक्ति, मंत्रशक्ति आणि उत्साहशक्ति या तीन शक्ती ] युक्त. प्रजेवर पुत्रवत प्रेम ठेवणारा, प्रजास्वामी तीन पुरुषार्थ ( धर्म, काम, काम ) यांचे समर्थन करणारा, भरपूर खजिना असलेला , खरा प्रतिभावंत, हेरांच्या द्वारां सर्व वृत्तांताला जाणणारा, दूरदर्शी, चिकाटी असलेला, उद्योगी, शास्त्रविद्या, शस्त्र विद्यामध्यें अभ्यासी, दुष्टांचा शास्ता, चांगल्या लोकांना अनुग्रह करण्य़ांत तत्पर, लांच न घेणारा, प्रयत्नानें राजलक्ष्मीला प्राप्त करणारा म्हणजे [ लक्ष्मीची वृद्धि करणारा ] दानशील, विजयी, न्यायामध्यें प्रेम ठेवणारा ( न्यायाला जाणणारा ) व्यसनापासून अलिप्त, उत्तम पराक्रमानें युक्त, गंभीरता, उदारता आणि चातुर्य या योगें शोभणारा, क्षमा मागें पर्यंतही क्रोध करणारा. सत्वगुणानें युक्त, तथा तत्वविद्या ( पदार्थ नि:पक्षपाती न्यायाधीशाप्रमाणें वर्तन करणारा, विस्तवाप्रमाणें दुष्टांचें भस्म करणारा, चंद्राप्रमाणें श्रेष्ठाला आनंद देणारा, अशा पूर्वोक्त गुणांनी युक्त, असेल तोच राजा होण्यास योग्य आहे असें समजावें.