संख्यानप्रत्यय
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
लगक्रियांकसंदोहे भवेत्संख्या विमिश्रिते ।
उद्दिष्टांकसमाहार : सेको वा जनयेदिमाम् ।
ज्या संख्येचा आपणास प्रस्तार काढावयाचा असेल त्या प्रस्तारांच्या प्रकारांची एकंदर संख्या किती हें जर काढावयाचें असेल तर पुढें सांगितलेल्या दोन पध्दतीनें ती काढतां येते. ‘ लगक्रिये ’ च्या ठिकाणीं जे आंकडे आले असतील त्यांची बेरीज करुन ती त्या प्रस्तारांतील प्रकारांची संख्या असें समजावें, हा एक प्रकार: किंवा उद्दिष्ट काढतांना जे लघु - गुरुंवर आकडे मांडले असतील, त्यांची बेरीज करुन त्यांत एक मिळवावा , म्हणजे जो आकडा येईल तो त्या प्रस्तारांतील प्रकाराच्या भेदाच्या संख्येचा आकडा समजावा. हा दुसरा प्रकार. उदाहरणार्थ तीन आंकडयांच्या प्रस्ताराच्या भेदांची संख्या काय हें पहावयाचें असेल तर तीन संख्यांच्या प्रस्तारांतील लगक्रिया काढते वेळीं जे - १- ३ -३ -१ हे आकडे आले आहेत यांची बेरीज करावी. ती आठ येते. हा त्या संख्येच्या प्रस्ताराच्या प्रकाराचा प्रकाराचा आकडा असें समजावें . किंवा याचें उद्दिष्ट काढतांना आपण लघु - गुरुंवर जे आंकडे टाकूं, अर्थात हें तीन अक्षरी वृत्त असल्यामुळें यावर १ -२ -४ असेच आकडॆ पडणार, त्यांची बेरीज करुन त्यांत एक मिळविला असतां आठ आकडा येतो. हा त्या प्रस्ताराच्यां भेदाच्या संख्येचे आकडे समजावा. याप्रमाणें वाटेल त्या संख्येच्या प्रस्ताराच्या भेदाच्या संख्येचे आकडे काढतां येतात.
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018
TOP