प्रस्तारप्रत्यय:
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
पादे सर्वगुरावाद्याल्लघुं न्यस्य गुरोरध: ।
यथोपरि तथा शेषं भूय: कुर्यादमुं विधिम् ॥
ऊने दद्याद् गुरनेव यावत्सर्वलघुर्भवेत् ।
प्रस्तारोयं समाख्यात: छंदोविचितिवेदिभि: ॥
प्रस्तार कसा मांडावा याचें हे विवेचन आहे. याचा अर्थ : - ज्या वर्णसंखेच ( इच्छित श्लोकांतील चरणाचा ) प्रस्तार करावयाचा असेल ते सर्व वर्ण प्रथम गुरु चिन्हांनी मांडावेत. नंतर या प्रथम ओळींतील जो पहिला गुरु त्याच्या खाली लघु मांडावा. आणि पुढें वरच्याप्रमाणें गुरु मांडावेत. याप्रमाणें दुसरी ओळ तयार करावी. पुढें फिरुन या दुसर्या ओळींत जो पहिला गुरु असेल त्याच्या खालों लघु मांडावा , आणि पुढें वरच्याप्रमाणें खालती गुरु मांडावेत. या तिसर्या ओळीत दुसर्या ओळींतील जो प्रथम गुरु त्याच्या खालीं लघु मांडून पुढें वरचे गुरुखाली मांडले आहेत; परंतु मागें जें एक स्थान मोकळें पडलें आहे त्या ठिकाणी काहीच मांडिलें नाही. तर त्या ठिकाणीं गुरु मांडावा. व याप्रमाणें जी जी मागची स्थानें मोकळीं पडतील त्या ठिकाणीं गुरु मांडीत जावें असें मांडीत गेलें असतां एकदां सर्व लघु ज्यंत आहेत असा एक प्रकार येईल. तो प्रकार आला की, पुढें मांडण्याचा प्रकार बंद ठेवावा. कारण आतां गुरु कोणीच राहिला नसअल्यामुळे लघु चिन्ह कोणत्या गुरुखाली द्यावयाचें ? तेव्हां सर्व गुरु ज्यांत आहेत अशा प्रकारापासून आरंभ करुन सर्व लघु ज्यांत येतील तेथपर्यंत वर सांगितलेल्या समजावें. उदाहरणार्थ या रितीप्रमाणें तीन अक्ष्राचा प्रस्तार आपण मांडून पाहूं. छंद: शास्त्रप्रणेते प्राचीन महषोनीं गुरुची उभी वक्र रेषा ( ऽ) व लघूची उभी सरळ रेषा ( ।) ही चिन्हें मानिली आहेत. अलिकडील विव्दान् गुरुचें चिन्ह आडवी सरळ रेषा ( - ) व लघूचें आडवीं अर्धचंद्राकृति ( ँ) चिन्ह मांडतात. तेव्हां आपण अर्वाचीन चिन्हानें लघु - गुरु मांडून पाहूं
तीन अक्षरांचा प्रस्तार
गुरू गुरू गुरू
लघु गुरू गुरू
गुरू लघु गुरू
लघु लघु गुरू
गुरू गुरू लघु
लघु गुरू गुरू
गुरू गुरू लघु
लघु लघु लघु
यांत पहिल्या ओळींत सरळ रेषेनें सर्व गुरु दाखविले आहेत. दुसर्या ओळींत पहिल्या ओळींतील प्रथम गुरुच्या खाली लघु मांडून पुढें वरच्या प्रमाणें गुरु मांडले आहेत. तिसर्या ओळींत, दुसर्या ओळींतील पहिल्या गुरुचें जे स्थान त्याचे खाली लघु चिन्ह करुन पुढें वरच्याप्रमाणें गुरु मांडिले आहेत. या ओळींत पहिलें लघु चिन्ह करुन पुढें वरच्याप्रमाणें गुरु मांडिले आहेत. या ओळींत पहिलें स्थान मोकळे पडलें, त्या ठिकाणीं ‘ जें स्थान मोकळें पडेल तेथें गुरु मांडावा ’ असा नियम असल्यामुळें गुरु मांडिला आहे. चवथ्या ओळींत, वरील तिसर्या ओळींत प्रथम गुरु आला आहे म्हणून त्या खालीं प्रथम लघु मांडून पुढें वरच्या प्रमाणेंच लघु, गुरु मांडिले आहेत. पांचव्या ओळींत चवथ्या ओळींत, वरील तिसर्या ओळींत नियम असल्यामुळें गुरु मांडिला आहे. चवथ्या ओळीत, वरील तिसर्या ओळींत प्रथम गुरु आला आहेत म्हणून त्या खाली प्रथम लघु मांडून पुढें वरच्या प्रमाणेंच लघु. गुरु मांडिले आहेत. पांचव्या ओळींत चवथ्या ओळींतील शेवटचे जें गुरुचिन्ह त्या खाली लघुचिन्ह केलें व मागची जीं दोन स्थाने मोकळी पडलीं तेथें गुरु मांडिले आहेत. साहाव्या ओळींत पांचव्या ओळींतील प्रथम गुरुचे खाली लघु मांडून नंतर वरच्या प्रमाणें मांडले आहेत. सातव्या ओळींत सहाव्या ओळींतील प्रथम गुरुचें जें व्दितीय स्थान त्या खाली लघु मांडून पुढें वरच्या प्रमाणें लघु मांडिला आहे. व आद्यस्थान जें मोकळें पडलें त्या ठिकाणीं गुरु घातला. आठव्या ओळींत सातव्या ओळींतील प्रथम गुरुचे खालीं लघु चिन्ह मांडिलें आणि नंतर वरचे दोन लघु मांडले आहेत. याप्रमाणें ही ओळ सर्व लघुंची झाली, म्हणून येथें तीन अक्षरांचा प्रस्तार संपला. तीन अक्षरें लघु - गुरु या दोन प्रकारच्या भेदानें यापेक्षां निराळया प्रकारानें मांडतां येत नाहींत. कशीही मांडिली तरी तो प्रकार यांत यावयाचाच. याप्रमाणें वाटेल तितक्या अक्षरांचे प्रस्तार काढतां येतात. अक्षरगण तीन अक्षरांचा असतो. तीन अक्षरांच्या प्रस्तारांत वर दाखविल्याप्रमाणें आठ प्रकार होतात. म्हणून गण आठ मानिले आहेत. व ते प्रस्ताराच्या रचनाक्रमांत येणार्या लघुगुरुंच्या योजनेप्रमाणें क्रमानें घेऊन त्यांस स, य, र, स, त, ज, भ, न अशीं नावें दिलीं आहेत. तेव्हा आठ गण कां झाले, व त्यांचा पिंगलांनी आपल्या सूत्रांत वर सांगितल्याप्रमाणें क्रम कां ठेविला, याचा उलगदा यावरुन होतो.
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018
TOP