उद्दिष्टं व्दिगुणानाद्यादुपर्यकान् समालिखेत् ।
लघुस्था ये च तत्रांकास्तै : सेकैर्मिंश्रितैर्भवेत् ।
आपणांस लघु - गुरुंचा क्रम सांगितला, अथवा एकाद्या वृत्ताचा चरण दिला, आणि तो लघु - गुरुंचा क्रम अथवां तो चरण हा त्या लघु - ग्रुरुंच्या क्रमाची जी संख्या झाली असेल, अथवा चरणाक्षरांची जी संख्या असेल, त्या संख्येच्या प्रस्तारांतील कितवा प्रकार असे कोणीं विचारिलें, तर तो अचुक संख्यांक प्रकार, अशी त्याची संख्या ज्यावरुन नेमको सांगतां येते, त्यास उद्दिष्ट म्हणतात. उदाहरणार्थ कोणीं विचारलें कीं ‘ वंशस्थ वृत्त ’ हा बारा अक्षरांच्या प्रस्तारांतील कितवा प्रकार आहे, तर ती संख्या कशी काढावयाची हें यांत सांगितलें आहे. तें असे. जो प्रकार कितवा म्हणून संख्या विचारली असेल त्यांतील लघुगुरु चिन्हांवर प्रथमापासून एक, दोन, चार असे क्रमानें व्दिगुणित आकडे मांडीत जावें. नंतर लघु चिन्हांवर जे आकडे पडले असतील त्यांची बेरीज करुन त्यांत एक मिळवावा. व मग जी संख्या येईल ती त्या प्रकारांची संख्या म्हणून सांगावें . उदाहरणार्थ हा तीन अक्षरांतील कितवा प्रकार म्हणून विचारलें तर त्या चिन्हांवर ओळीनें व्दिगुणित आकडे मांडावें . म्हणजे १ २ ४ असे आकडे आले. पुढें यांतील लघु चिन्हांवरील आंकडयांची बेरीज करावयाची. ती सहा आली. तींत एक मिळविला म्हणजे सात आले. तेव्हां सात हें याचें उत्तर . तीन अक्षरी प्रस्तारांतील हा सातवा प्रकार आहे असें सांगावें. आतां बारा अक्षरांच्या प्रस्तारांत वंशस्थ वृत्त कितवा प्रकार होतो तें पाहूं प्रथम वंशस्थ वृत्ताच्या
लघु - गुरु चिन्हांवर १ ( गुरू ), २ ( लघु ), ४ ( गुरू ), ८( लघु ), १६( लघु ), ३२ ( गुरू ), ६४ ( गुरू ), १२८( लघु ),२५६ ( गुरू ),
५१२( लघु ), १०२४ ( गुरू ), २०४८( लघु )
याप्रमाणें आकडे मांडून झाल्यावर यांतील लघूंवरील आंकडे निराळे काढून त्यांची बेरीज करू.
१+४+३२+६४+२५६+१०२४= १३८१
यांची बेरीज तेराशें एक्याशी आली.
तींत एक मिळविला म्हणजे १३८२ ( तेराशें ब्यायशी ) आंकडा आला. तेव्हां वंशस्थ वृत्त हें बारा अक्षरांच्या प्रस्तारांतील तेरशें ब्यायशीवा प्रकार आहे, हें उत्तर. याप्रमाणें वाटेल त्या वृत्ताचा त्या त्या विशिष्ट संख्यांक अक्षरांच्या प्रस्तारांतील प्रकाराचा आंकडा काढतां येईल.