मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८५ वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ८५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ८५ वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर स्मरोद्गीथः परिष्वंगः पतंगः क्षुद्रभृद्घृणी । षडिमे मत्प्रसादेन पुनर्यास्यन्ति सद्गतिम् ॥५१॥स्मर उद्गीथ परिष्वंग । घृणी क्षुद्रभृत् आणि पतंग । साही मत्प्रसादें चांग । पुढती स्वर्ग अधिष्ठिती ॥३५०॥ज्येष्ठोपहासन आपण केलें । ये पापाचें फळें हें जालें । ऐसें स्मरण हृदयीं धरिलें । भगवत्प्राप्तीपर्यंत ॥५१॥पूर्वीं स्मरातें जाळिलें शिवें । मम जठरीं तो जन्मला दैवें । येथ विख्यात प्रद्युम्ननावें । स्मर जाणावें पूर्वील ॥५२॥तेंवि हे स्मरादि साही जण । पूर्वील मरीचिनंदन । कालनेमीचे सदनीं जाण । कीर्तिमंतादि नामाथिले ॥५३॥या कारणास्तव तीं पूर्वीं । कीर्तिमंतादिनामें बरवीं । कुरुवररत्ना तुजला आघवीं । निरूपिलीं तीं यथार्थ ॥५४॥पूर्वीं म्हणिजे द्वितीयाध्यायीं । कीर्तिमंतादि कथिलीं पाहीं । मुनिसदनींचिये ठायीं । पंचाशाव्यामाजि कथिलीं ॥३५५॥असोनि निर्विवाद आख्यान । जाणोनि श्रोतीं कीजे श्रवण । मग त्या षट्पुत्रांतें घेऊन । बळ भगवान निधाले ॥५६॥इत्युक्त्वा तान्समादाय इंद्रेसेनेन पूजितौ । पुनर्द्वारवतीमेत्य मातुः पुत्रानयच्छताम् ॥५२॥इत्यादि संवाद मधुरोक्ति । बोलूनियां बळीप्रति । सुनंदपाणि आणि श्रीपति । षट्सुतांतें घेऊनि ॥५७॥इंद्रसेन म्हणिजे बळी । तेणें पूजिले बळवनमाळी । तैसे सुपूजित विक्रमशाळी । निघते जाहले तेथूनी ॥५८॥पुढती येऊनि द्वारवतीये । षट्पुत्रांतें देवकीये । अर्पिते जाले परमाश्चर्यें । देखोनि मोहें विह्वळ ते ॥५९॥तान्दृष्ट्वा बालकान्देवी पुत्रस्नेहस्नुतस्तनी । परिष्वज्याङ्कमारोप्य मूर्ध्न्यजिघ्रदभीक्ष्णशः ॥५३॥मग त्या बाळकांतें देखून । देवकीचे उभय स्तन । पान्हाइले वोरसोन । स्रवती पूर्ण पयोधारा ॥३६०॥जातमात्र कंसें वधिले । तैसेच साही सुत देखिले । आळिंगूनी हृदयीं धरिले । मग घेतले उत्संगीं ॥६१॥अंकीं घेऊनि त्या कुमरांतें । वारंवार हुंगे माथें । अष्टपुत्रां भावी चित्तें । मानी निरुतें श्लाघ्यत्व ॥६२॥अपाययत्स्तनं प्रीता सुतस्पर्शपरिप्लुता । मोहित मायया विष्णोर्यया सृष्टिः प्रवर्तते ॥५४॥प्रीती करोनि पाजी स्तन । पुत्रस्पर्शें सस्नुतपूर्ण । न म्हणे रामकृष्णांहून । हे मम नंदन वयोधिक ॥६३॥मानी आतांचि प्रसवलें यांतें । विष्णुमायेनें मोहितचित्तें । आदिपश्चात् न स्मरे तीतें । पाहतां सुतांतें धणी न पुरे ॥६४॥विष्णुमायेची अद्भुतशक्ति । जिये करूनि सृजनस्थिति । सकळसृष्टीची प्रवृत्ति । व्यामोहभ्रांती माजिवडी ॥३६५॥पीत्वामृतं पयस्तस्याः पीतशेषं गदाभूतः । नारायणाङ्गसंस्पर्शप्रतिलब्धात्मदर्शनाः ॥५५॥देवकीचे स्तनींचें पय । पवित्र सुस्निग्ध अमृतप्राय । अमृतोपमा केंवि लाहे । हेतु काय यदर्थीं ॥६६॥जगत्पति जो गदाभृत । तत्पीतशेषस्तन्यामृत । लाजवी परमामृता निश्चित । तर्पिले स्वसुत तत्पानें ॥६७॥नारायणाचा अंगसंग । लाधले म्हणोनि एनसभंग । जाला आणि प्रत्यय चांग । आत्मस्मृतीच त्यां जाला ॥६८॥म्हणाल कैसें आत्मदर्शन । जे मरीचिपुत्र साही जण । श्रेष्ठोपहासें पावले पतन । हें प्राचीन त्यां स्मरलें ॥६९॥कृष्णें पूर्वीं प्राशिलें स्तन । तें त्या देवकीचें स्तनपान । घडलें तेणें निष्पाप पूर्ण । होऊनि स्वभुवन पावले ॥३७०॥नारायणाचा अंगसंग । तेणें जाला एनसभंग । पूर्वस्मृतीचा लाधला योग । पावले स्वर्ग तें ऐका ॥७१॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP