मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८५ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ८५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ८५ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर शाध्यस्मानीशितव्येश निष्पापान्कुरु नः प्रभो । पुमान्यच्छ्रद्धया तिष्ठंश्चोदनाया विमुच्यते ॥४६॥शासनार्ह जे सकळजीव । त्यांचा शिक्षक तूं वासुदेव । मानूं शासन तव ज्यास्तव । तें तूं स्वयमेव संपादीं ॥२१॥आवडी करूनि तव शासनीं । सदैव रंगों सप्रेम भजनीं । विधिनिषेधादि कर्म बंधनें । न पडों येथूनि तें करीं ॥२२॥जें कां म्हणिजे कर्मप्रेरणा । केवळ विधिनिषेधलक्षणा । आम्हां दासांतें जनार्दना । तेथूनि पुन्हा मुक्त करीं ॥२३॥निश्चयेंसिं तुझा भक्त । नोहे विधिनिषेधा अंकित । ऐसा तव भजनासक्त । करीं निवांत म्हणे बळि ॥२४॥ऐसी ऐकूनि बळीची वाणी । सर्व तदुक्ति मान्य करूनी । निजगमनार्थ सूचवूनी । चक्रपाणी बोलतसे ॥३२५॥श्रीभगवानुवाच - आसन्मरीचेः ष्ट्पुत्रा ऊर्णायांप्रथमेऽन्तरे । देवाः कं जहसुर्वीक्ष्य सुतां यभितुमुद्यतम् ॥४७॥बळीनें जे जे याचिले वर । मान्य करूनि ते जगदीश्वर । निजगमनाचा विचार । कथी साचार संक्षेपें ॥२६॥बळीतें म्हणे कमलामित्र । मरीचिनामा विरिंचिपुत्र । ऊर्णा तयाचें कलत्र । ते षट्पुत्रां प्रसवली ॥२७॥स्वायंभुव मन्वंतरीं । पुत्रषट्क ऊर्णाजठरीं । असतें जाहलें देवतानिकरीं । मान्य महत्त्वें विराजित ॥२८॥तंव कोण्हे एके अपूर्व समयीं । वाग्देवी जे स्वसुता पाहीं । तियेशीं रमतां देखोनि तिहीं । प्रजापतीतें हासिन्नले ॥२९॥क म्हणिजे जो प्रजापती । तेणें वाग्देवी धरूनि हातीं । मैथुनें रमावयार्थ निगुती । मरीचि षट्सुतीं हास्य केलें ॥२३०॥तेनासुरीमगन्योनिमधुनाऽवद्यकर्मणा । हिरण्यकशिपोर्जाता नीतास्ते योगमायया ॥४८॥तया बापास्तव पाहीं । तत्काळ मरीचि पुत्र साही । जन्मले दैत्ययोनीच्या ठायीं । गेहीं हिरण्यकशिपूचिये ॥३१॥झणें म्हनसी पाप तें कोण । तरी श्रेष्ठाचें उपहासन । कनिष्ठीं केलें यास्तव जाण । अधःपतन त्यां झालें ॥३२॥प्रह्लादाचा सापत्न ज्येष्ठ । हिरण्यकशिपूचा पुत्र वरिष्ठ । कालनेमिनामा दुष्ट । त्याचे जठरीं जन्मले ते ॥३३॥कीर्तिमंतादिनामाथिले । महाप्रतापी दैत्य भले । देवकीजठरा कैसे आले । तेंही कथिलें जातसे ॥३४॥तारकामये समरांगणीं । कालनेमीतें चक्रपाणी । वधिता जाला तये क्षणीं । निर्जरश्रेणी आनंदल्या ॥३३५॥महामायावी काळनेमे । द्वेष धरूनि पुरुषोत्तमीं । भोजकुळीं जन्मला भूमी । कंसनामा प्रतापी ॥३६॥तयाच्या वधाकारणें पुढती । पृथ्वी विधि हर निर्जरपंक्ती । जाऊनि क्षीरसमुद्राप्रती । स्तवनीं श्रीपती प्रार्थियेला ॥३७॥तयासि देऊनि वरदान । कंसा सूचिलें आसन्नमरण । देवकीअष्टमगर्भ जाण । वधील म्हणे नभो वाणी ॥३८॥कंस वधील गर्भषट्क । भावी जाणोनि हें निष्टंक । साही कालनेमीचे तोक । देवकीगर्भीं योजविले ॥३९॥ते पूर्वींचे मरीचिकुमर । श्रेष्ठोपहासें जाले असुर । मायेसि आज्ञापूनि श्रीधर । देवकीजठरीं त्यां घाली ॥३४०॥नारदवचनें कंसासुरें । पूर्वजन्मींचीं निज लेंकुरें । जातमात्र वधिलीं निकरें । देवकीजठरीं जन्मलिया ॥४१॥मग सातवा देवकीपोटीं । जन्मला संकर्षण जगजेठी । विष्णु आठवा त्याचिये पोटीं । मी कृष्ण भूतटीं अवतरलों ॥४२॥कंस वधूनि निर्जरां तोष । दमिले दुष्ट कपटी अशेष । द्वारके माजि करूनि वास । भरिलें यश ब्रह्माण्डीं ॥४३॥प्रस्तुत येथें इये काळीं । स्वयें पातलों मी वनमाळी । तें तूं ऐकें राया बळि । जे आज्ञा केली जननीनें ॥४४॥देवक्या उदरे जाता राजन्कंसविहिंसिताः । सा ताञ्शोचत्यात्मजान्स्वांस्त इमेऽध्यासतेऽन्तिके ॥४९॥देवकीउदरीं जन्मले दैत्य । कंसें केला त्यांचा घात । त्यांतें मानूनि आत्मसुत । शोकाभिभूत देवकी ॥३४५॥देवकीनें याचिलें मज । कंसहिंसित निजात्मज । मग म्यां ज्ञानीं पाहूनि सहज । आलों वोजें तुजपासीं ॥४६॥इत एतान्प्रणेष्यामो मातृशोकापनुत्तये । ततः शापाद्विनिर्मुक्ता लोकं यास्यन्ति विज्वराः ॥५०॥ते हे आहेत तुजसंन्निध । आतां यांतें नेऊनि विशद । निजमातेचा निरसीन खेद । मग हे शुद्ध होतील ॥४७॥शापविमुक्त जालिया वरी । न तपती तापत्रया माझारी । पुन्हा मिरवती मुनिनिर्जरीं । इतुकें श्रीहरी स्वयें वदला ॥४८॥पुढती बळीतें जगन्नाथ । साही जणांचा नामसंकेत । आणि उर्ध्वगतीचा हेत । कथी निवांत तो ऐका ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP