मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक ६६ ते ७१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६६ ते ७१ Translation - भाषांतर ऐसा वसुदेवें प्रार्थिला । समस्त यादवीं सम्मानिला । सख्याचें प्रिय करावयाला । राहता जाला दिन कांहीं ॥३८॥मित्र प्रार्थिती परमप्रीती । भोजनानंतरे जावें म्हणती । अपराह्णपर्यंत करा वसती । ऐसे वोगिती स्नेहपाशें ॥३९॥रामकृष्णांच्या मुखीवीक्षणें । नंद वेधला अंतःकरणें । मान देऊनि तत्प्रार्थने । अपराह्णपर्यंत राहिला ॥४४०॥भोजनानंतर अपराह्णकाळीं । व्रजपतीतें प्रार्थिती सकळी । रात्री क्रमोनि सुहृदमेळीं । प्रयाण कीजे प्रभातीं ॥४१॥अपरदिवशीं तयाचि परी । म्हणती मध्याह्ना उपरी । प्रयाण कीजे सहपरिवारीं । इतुकीं वैखरी मानावी ॥४२॥रामकृष्णांच्या प्रेमरसा । भुलोनि नंद गुंतला कैसा । आजि उद्यां परवां ऐसा । तेथ त्रिमासां अतिक्रमिलें ॥४३॥त्या नंतरें बहु प्रार्थना । करूनि नंदें घेतां आज्ञा । प्रयाणकाळीं वस्त्राभरणा । देते जाले ते ऐका ॥४४॥ततः कामेः पूर्यमाणः सव्रजः सहबान्धवः । परार्ध्याभरणक्षौमनानानर्ध्यपरिछदैः ॥६७॥वसुदेवोग्रसेनाभ्योआं कृष्णोद्धवबलादिभिः । दत्तमादाय पारिबर्ह यापितो यदुभिर्ययौ ॥६८॥तदुपरि राजा उग्रसेन । वसुदेव उद्धव रामकृष्ण । इत्यादिकीं भिन्नभिन्न । वस्त्राभरणें समर्पिलीं ॥४४५॥परार्ध्य म्हणिजे अमूल्यतरें । निर्जरलोकींचीं दिव्याम्बरें । अनर्ध्यरत्नें कार्तस्वरें । त्वाष्ट्रनिर्मितें आभरणें ॥४६॥अनर्घ्य नानाविधोपकरणें । गोपोपयोग्य दिव्य भाजनें । क्षौमकौशयें रोमजें तार्णें । व्रजपा कारणें समर्पिलीं ॥४७॥अग्निधौतें हेमदुकूलें । अमरेन्द्रभोग्यें इये पट्टकुळं । कुबेरलोकींचीं मुक्ताफळें । मंडित वसनें महार्हें ॥४८॥वरुणलोकींच्या पदार्थश्रेणी । नंदादिबल्लवां समर्पूनी । सर्व मनोरथ तिहीं करूनी । पूर्ण केले वज्रपाचे ॥४९॥वज्रनिवासी जे बल्लव । आप्त स्वजन बंधु सर्व । तिहीं सहित बल्लवराव । पारिबर्हें गौरविला ॥४५०॥देवकी रोहिणी मुख्य करूनी । अष्टादश वसुदेवपत्नी । यशोदे सहित व्रजकामिनी । वस्त्राभ्रणीं गौरविल्या ॥५१॥रेवतीरुक्मिणीप्रमुख प्रेमें । अनर्ध्य दुकूलें दिव्य ललामें । अर्पूनि पूजिती स्नेहकामें । यशोदादिकां गौळणींतें ॥५२॥ऐसें दिधलें जें जें उचित । नंदें घेऊनि तें समस्त । समस्तां पुसूनि स्वगणा सहित । जाता जाला व्रजभुवना ॥५३॥समस्त यादवीं गव्यूतिमात्र । नंद बोळविला प्राणमित्र । बृहत्सेनेचा परिवार । वेष्टित नृपवर आहुकादि ॥५४॥आज्ञा घेऊनि निघाला नंद । हृदयीं पावला परमानंद । बल्लवां सहित श्रीगोविन्द । हृदयीं धरिला तें ऐका ॥४५५॥नन्दो गोपाश्च गोप्यश्च गोविन्दचरणाम्बुजे । मनः क्षिप्तं पुनर्हर्तुमनीशा मथुरां ययुः ॥६९॥नंद गोपाळ गोपी सकळी । गोविंदाचे चरणकमळीं । चित्त गुंतलें त्यांतें समूळीं । पुढती आकळूं न शकती ॥५६॥मन गुंतलें गोविन्दचरणीं । पुढती असमर्थ तदाहरणीं । वाणी वेधल्या तद्गुणस्मरणीं । विवश प्रयाणं तनुयष्टि ॥५७॥ऐसे मथुरादेशाप्रती । व्रजभुवनातें बल्लव जाती । मार्गीं आप्त जे भेटती । त्यांतें कथिती महोत्सव ॥५८॥नंदप्रमुख मित्र सकळ । सोयरे कुरुमत्स्यपाञ्चाळ । स्नेहवादीं सर्व भूपाळ । बोळविले असतां पैं ॥५९॥बन्धुषु प्रतियातेषु वृष्णयः कृष्णदेवताः । वीक्ष्य प्रावृषमासन्नां ययुर्द्वारवतीं पुनः ॥७०॥समस्त बोळविल्या नंतर । यादवभोजान्धावृष्णिकुकुर । ज्यांचें दैवत श्रीकृष्ण श्रीधर । करिती विचार ते अवघे ॥४६०॥देखोनि समीप पर्जन्यकाळ । मार्गीं नद नद्या भरती वोहळ । म्हणोनि निघाले तत्काळ । पातले सकळ द्वारवती पैं ॥६१॥जे जे जनपद भेटती पंथीं । अथवा स्वजनां नागरां प्रती । कुरुक्षेत्रींचा उत्सव कथिती । तो तूं कुरुपती अवधारीं ॥६२॥जनेभ्यः कथयाञ्चक्रुर्यदुदेवमहोत्सवम् । यदासीत्तीर्थयात्रायां सुहृत्सन्दर्शनादिकम् ॥७१॥यदुदेव तो वसुदेव । त्याचा समग्र यज्ञोत्सव । आणि कुरुक्षेत्रयात्रा सर्व । स्वमुखें अपूर्व प्रशंसिती ॥६३॥यात्राप्रसंगें सहज गांठी । जाल्या सुहृदांचिया भेटी । परस्परें त्या संवादगोठी । कथिती वाक्पुटीं आह्लादें ॥६४॥चतुरशीतितमोऽध्याय । येथ संपल्यानंतर पाहें । पुढील कथा अपूर्व आहे । सादर तिये परिसा हो ॥४६५॥पंचायशीव्या अध्यायांत । रामकृष्णांतें प्रार्थितात । मग ते जनका माते सहित । प्रबोधितील ज्ञानातें ॥६६॥साही मृत पुत्र आणोनी । आनंदवितील पिता जननी । सावध तिये कथेच्या श्रवणीं । श्रोतीं सज्जनें बैसावें ॥६७॥प्रतिष्ठानीं एकनाथ । सज्जनवृंदीं सुरपूजित । तत्पादाब्जपरागनिरत । भ्रमर संतत दयार्नव ॥६८॥काळयुक्ताक्षी वत्सरीं । फाल्गुनसिनीवाली अंगारीं । तद्दिनीं प्रतिष्ठानक्षेत्रीं । भाषावैखरी क्रतु कथिला ॥६९॥याचिया श्रवणें करून । कुरुक्षेत्रींची यात्रा पूर्ण । सर्व यज्ञांचें अवभृथस्नान । श्रोत्यांलागून जोडतसे ॥७०॥यालागीं कोण्ही न मानूनि उबग । श्रवणीं आदर कीजे चांग । करुणावत्सल कमलारंग । सर्व प्रसंग संपादी ॥७१॥श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध चौर्यायशीवा ॥४७२॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां कुरुक्षेत्रयात्रायां वसुदेवमखवर्णनं नन्दवसुदेवसंवादो नाम चतुरशीतितमोऽध्यायः ॥८४॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥७१॥ ओवी टीका ॥४७२॥ एवं संख्या ॥५४३॥ ( चौर्याऐंशीवा अध्याय मिळून ओवी संख्या ३७७०३ ) चौर्याऐंशीवा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP