मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक ५६ ते ६० अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक ५६ ते ६० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ६० Translation - भाषांतर सदस्यर्त्विक्सुरगणान्नृभूतपितृचारणान् । श्रीनिकेतमनुज्ञाप्य शंसन्तः प्रययुः क्रतुम् ॥५६॥रामकृष्णांच्या प्रतापतेजें । वशवर्ती सुरगण सहजें । आवाहिले जे यज्ञकाजें । बरवे वोजे तें यजिले ॥३७५॥सदस्यप्रमुखऋत्विज अवघे । वस्त्राभरणीं पूजिले वेगें । चारणपितृगण तत्प्रसंगें । भूतमात्र मनुजादि ॥७६॥यथोचित अहेर त्यां अर्पून । सभास्थानीं सम्मानून । परिमळद्रव्यें स्रक्चंदन । ताम्बूल दिधलें सर्वत्र ॥७७॥श्रीवत्स ज्याचे वक्षस्थलीं । तो श्रीकृष्ण कौशल्यशाली । आणि बलराम महाबळी । जनकाजवळी वोळगती ॥७८॥तया श्रीनिकेता श्रीहरिची । सर्वीं आज्ञा घेऊनि साची । प्रशंसा करित अध्वराची । शीघ्र जाती स्वस्थाना ॥७९॥विदर्भप्रमुख सुहृदनृपती । गौरविले सप्रेमभक्ती । आज्ञा घेऊनि स्वदेशाप्रती । जातां शंसिती क्रतु अवघे ॥३८०॥सदस्य आणि ऋत्विजगण । देवमनुष्यपितृचारण । त्यांचें यथोक्त करूनि पूजन । भूतमात्रां तोषविलें ॥८१॥आज्ञा घेऊनि गेलिया त्यांतें । तदुपरि श्रेष्ठकौरवांतें । बोळविलें तें ही निरुतें । सांगे नृपातें योगींद्र ॥८२॥धृतराष्ट्रोऽनुजः पार्था भीष्मो द्रोणः पृथा यमौ । नारदो भगवान्व्यासः सुहृत्सम्बन्धिबान्धवाः ॥५७॥बन्धूत्परिष्वज्य यदून् सौहृय्दाक्लिन्नचेतसः । ययुर्विरहकृच्छेण स्वदेशांश्चापरे जनाः ॥५८॥प्राज्ञाचक्षु धृतराष्ट्रनृपति । विदुर त्याचा अनुज सुमति । पृथानंदन प्रतापमूर्ति । धर्मभीमार्जुन त्रिवर्ग हे ॥८३॥माद्रीतनय सहदेवकुळ । अश्विनीकुमर जे कां यमल । पृथानामें कुन्ती केवळ । इत्यादि सकळा गौरविलें ॥८४॥वसनाभरणें मोलागळीं । विचित्रयानें पदार्थ सकळी । मधुरोतरीं स्नेहबहळीं । सम्मानूनी बोळविले ॥३८५॥वैष्णवांमाजि जो अग्रणी । तो देवर्षि नारदमुनी । यज्ञारंभीं कथिले मुने । द्वैपायनादि ते अवघे ॥८६॥आणि जे जे सोयरे आप्त । देहसंबंधें बंधुत्व प्राप्त । त्यांतें गौरवूनि यथोचित । हृदयीं धरित स्नेहभरें ॥८७॥परस्परें हृदयीं द्रवती । वियोगविहरें नेत्र स्रवती । आज्ञा घेऊनि स्वदेशाप्रती । निघतां खंते उभयत्र ॥८८॥सहसा वियोग न साहवे । तथापि एकत्र न राहवे । स्वदेशाप्रति लागलें जावें । विचित्र दैवें विघडलिया ॥८९॥देशोदेशींचे प्रजाजन । पुण्यशीळ धर्मसंपन्न । ते स्वस्थानीं करितां गमन । स्वमुखें यज्ञ प्रशंसिती ॥३९०॥यादवांचीं कुळेंअठरा । स्निग्धां आप्तां सुहृदप्रवरां । गौरवूनि त्यां सपुत्रदारां । सहकिंकरां बोळविलें ॥९१॥यावरी नंद जो व्रजपती । ज्याचे उपकार लिहितां क्षिती । गमे अवाडें अवुरती । बोळवी त्याप्रति तें ऐका ॥९२॥नन्दस्तु सह गोपालैर्बृहत्या पूजयार्चितः । कृष्णरामोग्रसेनाद्यैवात्सीद्बन्धुवत्सलः ॥५९॥नंदव्रजींचे जे निवासी । गोपाळ होते नंदापाशीं । तिहीं सहित व्रजपतीसी । श्रेष्ठोपचारीं पूजियेलें ॥९३॥महापूजा जियेचें नांव । जीमाजि महार्ह उपचार सर्व । तिहीं करूनि बल्लवराव । प्रेमसद्भावें समर्चिला ॥९४॥रामकृष्ण उग्रसेन । देवंक वसुदेव आदिकरून । विनयभावें संप्रार्थून । नंदसहगण राहविला ॥३९५॥मित्रबंधुही करूनि विनति । म्हणती भो भो बल्लवपति । यज्ञप्रसंगें आम्हांप्रति । पडली गुंती आजिवरी ॥९६॥तुम्ही आम्ही एकान्तवासी । बैसलों नाहीं कोण्हे दिवसीं । सुखसंवादें पळघटिकेसी । लोटिलें नाहीं संवादे ॥९७॥सुवर्णाची निर्मूनि पुरी । मथुरा नेली समुद्रोदरीं । तैंहूनि सखया पडलों दुरी । स्नेहें अंतरीं झुरतसों ॥९८॥अवकाश करूनि यावें भेटी । परंतु शत्रूची भंवती घरटी । संकटाहूनि महासंकटीं । मज्जनोन्मज्जनीं निर्बुजलों ॥९९॥सूर्योपरागीं कुरुक्षेत्रा । भाग्यें मिनली समग्र यात्रा । येथ विध्युक्त सारिलें सत्रा । भेटलों मित्रां आप्तांसी ॥४००॥तुमचिया सहवासाची धणी । पूर्ण नोहेचि शिराणी । यालागीं कांहीं दिवस रजनी । येथ राहूनी तोषविजे ॥१॥बंधुवत्सल बल्लवनाथ । तोषला सप्रेम हृदया आत । कळवळूनि राहिला स्वस्थ । पुढील वृत्तान्त अवधारा ॥२॥वसुदेवोऽञ्जसोतीर्य मनोरथमहार्नवम् । सुहृद्वृतः पीतमना नंदमाह करे स्पृशन् ॥६०॥कौरवकुमुदकाननचन्द्रा । ऐकें परीक्षिति नरेन्द्रा । वसुदेव मनोरथसमुद्रा । लंघूनि गेला आह्लादें ॥३॥अंजसा म्हणिजे सर्व प्रकारें । जितुकीं यज्ञाङ्गें दुस्तरें । तितुकीं स्वमनोरथानुसारें । उल्लंघिलीं संतोषें ॥४॥मेरु इतुका उतरला भार । कीं बाहीं निस्तरला सागर । तैसा वसुदेव विज्वर । जाला अध्वर संपलिया ॥४०५॥करूनि दीक्षाविसर्जन । वसनाभरणें अंगीकारून । सुहृद आप्तीं परिवारून । सभास्थानीं विराजला ॥६॥प्रफुल्लित हृदयारविन्द । हस्तीं धरूनि गोपनंद । त्याप्रति बोलिला वाक्यें विशद । तो अनुवाद अवधारा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP