मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७५ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ७५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ७५ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर तत्र दुर्योधनो मानी परीतो भ्रातृभिर्नृप । किरीटमाली न्यविशदसिहस्तः क्षिपन्रुषा ॥३६॥ऐसिये धर्मसभेमाझारी । सुयोधन आला कवणेपरी । विषादविषाची आंगीं लहरी । तेणें नादरी सौभ्यत्व ॥२८॥गर्वें पर्वता ऐसा न लवे । देखों न लाहे धर्मविभवें । अनुज बंधु वेष्टित आघवे । नृपगौरवें मुसमुसित ॥२९॥मुकुट कुंडलें माळा कंठीं । खङ्ग कवळूनि दक्षिणमुष्टीं । द्वास्थां दापूनि क्षोभदृष्टी । सभे जगजेठी प्रवेशला ॥३३०॥स्थलेऽभ्यगृह्णद्वस्त्रांतं जलं मत्वा स्थलेऽपतत् । जले च स्थलवद्भ्रांत्या मयमायाविमोहितः ॥३७॥सभा घनवटली घनदाट । बंदी करिती स्तोत्रपाठ । भद्रीं धर्मराजा उपविष्ट । तेथ प्रविष्ट सुयोधन ॥३१॥मयकृत विस्तीर्ण सभागार । पाहे कौतुकें गान्धार । ठायीं ठायीं होय स्थिर । चमत्कार अवलोकी ॥३२॥करकौशल्यें अनुजां दावी । अमरेन्द्रसभेची प्रतिमा भावी । विषादसंतापोर्मी जीवीं । तेणें ठावी शुद्धि नव्हे ॥३३॥पूर्वोक्त सन्निपाताची भ्रान्ति । तेणें उमज न पदे चित्तीं । हरिमायेनें हरिली स्मृति । जाली प्रवृत्ति अनोळख ॥३४॥मयकृतमायालाघव नयनीं । लक्षित जातां सभास्थानीं । स्फटिकनिबद्धा देखे अवनी । पूर्ण जीवनीं ते मानी ॥३३५॥चंद्रशाळिका शक्रोपलीं । स्फटिकीं तद्गत भा बिम्बले । नेत्रचंचलता आपुली । तैं तेथ गमली जळभावें ॥३६॥सभेमाजी हें प्रशस्त जळ । लंघितां भिजती कंचुकाञ्चळ । म्हणोनि सांवरूनि ते निश्चळ । जातां सकळ नृप हांसती ॥३७॥तेणें सलज्ज झाला मनीं । म्हणे मूर्खत्व आलें मजलागूनी । पुढें सकळ चतुष्कोणीं । वापिका देखोनी स्थळ मानी ॥३८॥चित्रासनमय चंद्रशालिका । सुरंगजलीं बिम्बली देखा । देखूनि म्हणे समस्त लोका । विस्तीर्ण बैसका आस्तरिली ॥३९॥तेथ चालतां नावरी वसना । पदविक्रमीं पावे पतना । देखोनि हांसती नृपाङ्गना । भीमसेना सह सभ्य ॥३४०॥मयमायेनें मोहित झाला । स्थळभ्रान्तीस्तव जळीं पडिला । धर्माज्ञेनें किङ्करें वहिला । कडे काढिला ते समयीं ॥४१॥जहास भीमस्तं दृष्ट्वा स्त्रियो नृपतयोऽपरे । निवार्यमाणा अप्यंग राज्ञा कृष्णानुमोदिताः ॥३८॥गवाक्षमार्गें नृपांच्या सती । भीमेंसहित सर्व नृपती । पाहोनि खदखदां हांसती । उपहासिती स्मितवचनें ॥४२॥साम्बश्वशुर दुर्योधन । आमुचा व्याही परम सुज्ञ । म्हणोनि हांसतसे श्रीकृष्ण । दे अनुमोदन नृपवर्गा ॥४३॥पार्षद किङ्कर सेवक सकळी । नृपमहिषींची सर्व मंडळी । हांसतां देखोनि तये वेळीं । लज्जा जाहली सुयोधना ॥४४॥हस्तसंकेतें धर्मराजें । भीमप्रमुख वारूनि राजे । निकट दूत प्रेरूनि वोजे । काढवी सहजें सुयोधना ॥३४५॥दूतें काढितां दुर्योधन । भवतें पाहे सलज्जनयन । द्रौपदी हांसतां अवलोकून । मनीं कृशानसम धडके ॥४६॥धर्मराजें दिव्य वसनें । देऊनि गौरविला सम्मानें । परंतु उपहासिला भीमसेनें । समर्म वचन बोलूनी ॥४७॥पुढें मयकृतसभे प्रति । पाहों पवाडे सुयोधन नृपति । स्फटिककपाटीं द्वारीं पिहितीं । रिघों जातां शिर आदळे ॥४८॥तेणें पडिला मागिली सवां । लज्जायमान झाला तेव्हां । पुढें पुढें जंव करी रिघावा । मयकृतमावा नेणोनी ॥४९॥पुढें गोमेदमय चौकटी । पाचूचिया मुक्तकपाटीं । पिहित नसतां भासती दृष्टी । पिहितपरिपाटीं नयनातें ॥३५०॥लोटूं जातां कपाटजोडे । सुभरें पडे पुढिल्या तोंडें । देखोनि हांसती मागें पुढें । तेणें रोकडें मन दुखवे ॥५१॥तये समयीं भीमसेन । म्हणे धृतराष्ट्राचा तूं नंदन । साच केलें जनकाभिधान । शतसंताना माजिवडें ॥५२॥असो हें कथिलें सभापर्वीं । येथें शुकोक्ति वाखाणावी । दुर्योधनातें विषाद तावी । गोष्टी आघवी ते ऐका ॥५३॥स व्रीडिंतोऽवाग्वदनो रुषा ज्वलन्निष्क्रम्य तूष्णीं प्रययौ गजाह्वयम् । हाहेति शब्दः सुमहानभूत्सतामजातशत्रुर्विमना इवाभवत् । बभूव तूष्णीं भगवान्भुवो भरं समुज्जिहीर्षुर्भ्रमति स्म यद्दृशा ॥३९॥तों दुर्योधन लज्जायमान । क्रोधें हृदयीं प्रज्वळोन । सभे माजी अधोवदन । गेला निघोन दृढ मौनें ॥५४॥गजाह्वय जें हस्तिनापुर । पावला अनुजांसीं गान्धार । धर्मसभेंत हाहाकार । महाघोर प्रवर्तला ॥३५५॥हांसयाचा निकुर झाला । म्हणती दुर्योधन क्षोभला । महाअनर्थ आरंभला । नोहे भला विनोद हा ॥५६॥महाभिमानी दुरोधन । सर्व गर्वाचा उदधि पूर्ण । मंत्री शकुनि दुःशासन । आणी कर्ण कुटिलात्मा ॥५७॥दुष्टचतुष्टय एके ठायीं । होऊनि कैवाड रची कायी । न कळे म्हणूनि आपुले ठायीं । अजातशत्रु भय मानी ॥५८॥त्रिभुवन जिंकावयालागीं । पुरता प्रताप पाण्डवां आंगीं । परी कौरवांचे कुटिळप्रसंगीं । राहे उगी मति शक्ति ॥५९॥विस्मयें प्रस्तावलियावरी । विमनस्क युधिष्ठिर अंतरीं । म्हणे गान्धारें घातलें घोरीं । विषादें भरीं भरूनियां ॥३६०॥तेथ असतां स्वयें कृष्ण । स्तब्ध राहिला धरूनि मौन । भूतभविष्यद्वर्तमान । जाणे सर्वज्ञ भगवंत ॥६१॥ षड्गुणैश्वर्यमंडित । तो सर्वज्ञ भगवंत । म्हणे साधलें अवतारकृत्य । भूभार समस्त उतरिला ॥६२॥भूभार उतरावयाचें बीज । लक्षूनियां अधोक्षज । गान्धारविषादाचें काज । सहजीं सहज योजियलें ॥६३॥भूभारहरणेच्छामात्रें । दुर्योधनातें कमळामित्रें । लक्षितां त्याचीं भ्रमलीं नेत्रें । विषादें गात्रें बाचटलीं ॥६४॥ज्या कृष्णाचे दृष्टीकरून । भ्रान्त केला दुर्योधन । मयमायेचें निमित्त पूर्ण । पावला अपमान जळभ्रान्ती ॥३६५॥द्रौपदीप्रमुखवनिताहासें । विशेष भीमाच्या उपहासें । संतापला क्रोधावेशें । लज्जा मानसें मानूनी ॥६६॥कृष्णें ऐसें स्वदृक्पातें । भूभारहरणाचें बीज पुरतें । दुर्योधनहृदयीं निरुतें । विषादरूपें आरोपिलें ॥६७॥पुढें विषादें दुर्योधन । द्यूतीं धर्मातें जिङ्कून । द्रौपदीचें वस्त्राहरण । वनप्रयाण करवील ॥६८॥द्वादशाब्द पाण्डवांप्रति । द्रौपदीसहित वनीं वसति । नष्टचर्याची प्रवृत्ति । गुप्तस्थिति त्रयोदशीं ॥६९॥महाभारतीं हा इतिहास । वदला सविस्तर श्रीव्यास । हरियशःप्रसंगें परीक्षितीस । कथिला उद्देश भागवतीं ॥३७०॥इतुकें सांगूनि राया प्रति । उपसंहरणाचिये रीति । राजसूयमखसमाप्ति । करी सुमति तें ऐका ॥७१॥एतत्तेऽभिहितं राजन्यत्पृष्टोऽहमिह त्वया । सुयोधनस्य दौरात्म्यं राजसूयमहाकृतौ ॥४०॥इह म्हणिजे इये क्षणीं । राजसूयमखव्याख्यानीं । त्वां मज पुशिलें आशंकोनी । ज्या कारणास्तव राया ॥७२॥तें हें तुझें म्यां अभिहित । राया निरोपिलें समस्त । राजसूयमखा आंत । दुर्योधनकृत दौरात्म्य ॥७३॥त्यावरी मयकृतसभास्थानीं । स्थळजळभ्रांन्तीचिये पतनीं । हास्य करितां सर्व जनीं । गेला लाजोनी सक्रोधें ॥७४॥इतुकें तव प्रश्नाचें बीज । सविस्तर कथिलें कीं ना तुज । पुढें द्वारके अधोक्षज । जाईल सहज तें ऐका ॥३७५॥पंचसप्ततितमाध्याय । संपला यावरी रुक्मिणीप्रिय । द्वारके जाऊनि करील काय । तो अध्याय पुढें असे ॥७६॥वक्षमाण षट्सप्तति । माज शाल्ब द्वारके प्रति । जाऊनि प्रद्युम्ना गदाघातीं । मूर्च्छाप्राप्ती करील ॥७७॥तिये कथेसि सावधान । श्रोतीं होऊनि कीजे श्रवण । इहामुत्रें कैवल्यसदन । अखिल कल्याण हरिवरदें ॥७८॥प्रतिष्ठानचिद्ब्रह्मसदनीं । श्रीएकनाथ भद्रासनीं । चिदानंदें स्वानंददानी । गोविन्दसद्गुणी दयार्णव ॥७९॥श्रीमद्भागवतदशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध पंचसप्ततितम ॥३८०॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां राजसूयसमाप्तिदुर्योधनविषादकथनं नाम पंचसप्ततितमोऽध्यायः ॥७५॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ टीका ओव्या ॥३८०॥ एवं संख्या ॥४२०॥ ( पंचाहत्तरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३४५८५ ) पंचाहत्तरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP