श्रीगणेशायः नमः ।
मुनिजनमानसनिवासहंसा । नमो गोविन्दा प्रबोधसुरसा । स्वपदभजनें अनन्यदासां । आत्मसमरसा पावविसी ॥१॥
तुझिया चरणप्रसादेंकरून । चतुःसप्ततितमपर्यंत जाण । केलें दशमाचें व्याख्यान । पुढें निजगुण वदवावे ॥२॥
पंचसप्ततितमाध्यायीं । कथा वर्तली जे जे कांहीं । ते श्रोत्यांचे श्रवणालयीं । भाषाकथनीं सांठविजे ॥३॥
इत्यादि सद्गुरूचिया स्तवनें । प्रज्ञाप्रकाश लाहोनि मनें । भाषाव्याख्यान हरि वरदानें । दयार्णववदनें वाखाणी ॥४॥
पंचसप्ततितमीं कथा । सिंहावलोकनें अवभृथा । सांगूनि मयकृत सभा पाहतां । दुर्योधनाचा अपमान ॥५॥
पूर्वाध्याय संपते काळीं । एका दुर्योधनाविण सकळी । आनंदली नृपमंडळी । पाण्डवलक्ष्मी विलोकुनी ॥६॥
हे ऐकूनि शुकाची बोली । नृपा प्रश्नाची इच्छा झाली । ते ये अध्यायीं शंका पहिली । नृपें पुशिली ते ऐका ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP