मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक ४१ ते ४४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४४ Translation - भाषांतर विप्रं कृतागसमपि नैव द्रुह्यत मामकाह । घ्नंतं बहु शपंतं वा नमस्कुरुत नित्यशः ॥४१॥सापराधही विप्र देखोनी । द्रोह न करावा मामकीं जनीं । सम्मानिजे अभिवंदूनी । हे मम वाणी ध्रुव माना ॥३१५॥मारिता अथवा शाप देता । पैशून्य दुरुक्ति बहुवस वदता । न्यून पूर्ण उपपादिता । तरी तो तत्वता द्विज वंद्य ॥१६॥नुच्चारूनि त्याचें दोष । सम्मानूनि देइजे तोष । नित्य नमस्कारिजे त्यास । मामकांस हे ममाज्ञा ॥१७॥मामकीं चालिजे माझिये चाली । ज्यातें जितुकी आज्ञा केली । ते पाहिजे चालविली । सूचना कथिली जातसे ॥१८॥यथाऽहं प्रणमे विप्राननुकालं समाहितः । तथा नमत यूयं च योऽन्यथा मे स दंडभाक् ॥४२॥मी कृष्ण ब्राह्मणाप्रति । नमस्कारितों ऐसिये रीती । समाहित करूनि इंद्रियवृत्ति । विनयभक्ति समर्याद ॥१९॥उषःकाळापासूनि विप्र । पुढती शयनीं लागे नेत्रे । तंववरी यथाकाळीं द्विजवर । नमिजे सर्वत्र ममाज्ञा ॥३२०॥जिये काळीं जिये ठायीं । विप्र भेटले असतां पाहीं । नमस्कारूनि प्रेमप्रवाहीं । भजिजे सर्वांहीं मामकीं ॥२१॥ऐसी ममाज्ञा वंदूनि शिरीं । जो विप्रांचा सम्मान करी । त्याहूनि प्रियतम मज निर्धारीं । नाहींच वैखरी हे सत्य ॥२२॥शङ्कर अभिन्न मम हृदयस्थ । त्याहूनि मज तो प्रियतम आप्त । केवळ आत्माचि तो यथार्थ । म्हणतां किमुत परिहार ॥२३॥देवकीवसुदेवपदांची शपथ । करूनि वदतों इत्थंभूत । ब्राह्मणभजनें जो सिद्धार्थ । मी सनाथ त्याचेनि ॥२४॥ऐसी माझी आज्ञा न मनी । केवळ विषयी देहाभिमानी । ब्रह्मद्वेष्टा ब्रह्मस्वहरणी । ब्राह्मणभजनीं विमुख जो ॥३२५॥ऐसी माझी आज्ञा न मनी । केवळ विषयी देहाभिमानी । ब्रह्मद्वेष्टा ब्रह्मस्वहरणी । ब्राह्मणभजनीं विमुख जो ॥२६॥तो दण्डार्ह सर्वांपरी । सर्वदा दंडिजे यमकिंकरीं । यक्षपिशाचापस्मारीं । भूतीं खेचरीं दण्डावा ॥२७॥सृष्टिसृजन ब्रह्मा कर्ता । शेवटीं रुद्र तत्संहर्ता । मी सृष्टीचा प्रतिपाळिता । तो मज तत्त्वता अपाल्य ॥२८॥पाल्यमान सृष्टींतून । ब्रह्मद्वेष्टा तो दुर्जन । म्यां उपेक्षिला हें जाणून । विघ्नप गृहगण दण्डित त्या ॥२९॥दरिद्र दुर्दशा अवदशा । कलह कर्कशा क्षुधातृषा । चिरकाळ तयाचिया सहवासा । तृष्णा दुराशा सह जाती ॥३३०॥निंदा तयाचे वदनीं वसे । अपयश तया व्यापूनि असे । त्याच्या दर्शनें सुकृत नासे । समस्त दोषें वरिला तो ॥३१॥असो त्या ब्रह्मद्वेष्ट्याची कथा । विशेष ममाज्ञेचा हंता । तद्व्याख्यानीं वाग्देवता । कंपायमान होतसे ॥३२॥यालागीं मामकीं सर्व जनीं । मस्तकीं ममाज्ञा अभिवंदूनी । सादर असतां विप्रार्चनीं । विघ्नें देखूनि त्यां पळती ॥३३॥ते होत कां भलते याति । त्यांच्या स्मरणें विजयावाप्ति । दर्शनमात्रें जड उद्धरती । ते द्विजभक्ति मजतुल्य ॥३४॥हृदयीं दक्षिणदेशीं जाण । मी मिरवितसें ब्राह्मणचरण । द्विजार्चकाचें पदभूषण । वामभागीं धरूं इच्छीं ॥३३५॥असा ऐसी सहस्रवरी । विप्रार्चकांची वदता थोरी । तृप्ति न मनी मम वैखरी । म्हणे श्रीहरि स्वानंदें ॥३६॥यावरी नृगकथोपसंहार । ब्रह्मस्वहरणाचें अनुस्मरण । देऊनि बोले जनार्दन । कीजे श्रवण तें संतीं ॥३७॥ब्राह्मणार्थो ह्यपहृतो हर्तारं पातपत्यधः । अजानंतमपि ह्येनं नृगं ब्राह्मणगौरिव ॥४३॥नेणोनिही ब्राह्मणार्थ । जरी अपहरिला होऊनि भ्रान्त । तरी हर्तयातें अधःपात । देईल निश्चित नृपगोपरी ॥३८॥नृगें ब्राह्मणा दिधली धेनु । ते पळाली त्यापासून । कळपीं मिळाली हें नेणून । ते दिधली दान अन्यविप्रा ॥३९॥इतुक्या अज्ञात दोषासाठीं । अंधकूपीं दुःखकोटी । सरठदेहाची अवगूनि यष्टि । म्हणे जगजेठी कळलें कीं ॥३४०॥द्वारकावासियांलागूनी । प्रत्यक्ष प्रत्यय दावूनि नयनीं । ब्रह्मस्वहरणाची काहणी । उपसंहारिली ते ऐका ॥४१॥एवं विश्राव्य भगवान्मुकुन्दो द्वारकौकसः । पावनः सर्वलोकानां विवेश निजमंदिरम् ॥४४॥एवं म्हणिजे ऐसियापरि । ब्रह्मस्वहरणदोषाची थोरी । नेऊनि घाली नरकीं घोरीं । हें श्रीहरि बोलूनी ॥४२॥द्वारकावासियां सर्व जनां । आणि समस्तां यदुनंदनां । भूमंडळींच्या भूपाळगणां । केलें श्रवणा ऐकवणें ॥४३॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । सकळ सुखाचें अधिष्ठान । तो मुकुंद पुण्यपावन । आत्मभुवन प्रवेशला ॥४४॥चारुदेष्ण साम्ब प्रद्युम्न । इत्यादि अवघे निज नंदन । वेष्टित समस्त यादवगण । स्वकीय भुवनाप्रति गेला ॥३४५॥नृगचरित्रचमत्कार । ठायीं ठायीं नारीनर । कथिती ऐकती आश्चर्यतर । म्हणती अपार हरिगरिमा ॥४६॥ऐसी श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुकोक्ति । परमाश्चर्यें परीक्षिती । ऐकोनि चित्तीं संतुष्ट ॥४७॥म्हणे म्यां अपराध केला थोर । ब्राह्मणकंठीं सर्पशरीर । घातलें तद्दोषा परिहार । शापही सत्वर पावलों ॥४८॥तेणें होतों अनुतापवंत । जाणोनि तुष्टला श्रीभगवंत । तुमच्या मुखें इत्थंभूत । श्रीभागवत परिसतसें ॥४९॥आतां देइजे आशीर्वचन । मम वंशजांहीपासोन । न घडो ब्राह्मणाचें हेळण । विप्रार्चन घडो तयां ॥३५०॥ऐकोनि तथास्तु म्हणे शुक । तेणें संतुष्ट कुरुनायक । पुढिलिये कथेचा विवेक । ऐका सम्यक् संदर्भ ॥५१॥पांसष्टाविया अध्यायामाजी । रेवतीरमण जावोनि व्रजीं । नंदप्रमुखां भेटूनि सहजीं । गोपीसमाजीं क्रीडेल ॥५२॥तिये कथेचें करितां श्रवण । मात्रागमनादिदोषक्षालन । श्रवणमात्रें कैवल्यसदन । सुकृतसंपन्न लाहती ॥५३॥प्रतिष्ठानीं गोदातटीं । एकनाथ साम्राज्यपीठीं । चिदानंदाचिये ताटीं । स्वानंदखोटी अमृताच्या ॥५४॥गोविन्दहस्तें ते रसकवळ । सेवूनि दयार्णव लदिवाळ । श्रोतयांलागीं रसाळ बहळ । भरवी प्राञ्जळ श्रवणमुखीं ॥३५५॥तें हें हरिवरदाख्यान । स्वानंदसुधारसभोजन । श्रवण करितां श्रोतेजन । परीक्षितीसमान तृप्त होती ॥३५६॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां नृगाख्यानं नाम चतुःषष्टितमोऽध्यायः ॥६४॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४४॥ ओवी संख्या ॥३५६॥ एवं संख्या ॥४००॥ ( चौसष्टावा अध्याय मिळून ओवी संख्या ३०५१९ ) अध्याय चौसष्टावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP