अध्याय ६४ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कस्यचिद्द्विजमुख्यस्य भ्रष्टा गौर्मम गोधने । संपृक्ताऽविदुषा सा च मया दत्ता द्विजातये ॥१६॥
कोणी एक विप्राग्रणी । वेदविहितकर्माचरणी । निवृत्त प्रतिग्रहापासुनी । प्रारब्धक्षेपणी मोक्षेच्छु ॥३॥
ऐसिया विप्रमुख्याप्रति । प्रार्थूनियां विनयभक्ती । पूर्वोक्त धेनु अर्पिली निगुती । आश्रमा नेतां तो तीतें ॥४॥
मार्गी नेतां तरुण धेनु । कळपाविहीन पारिके रान । देखूनि पळाली त्यापासून । मम गोधनीं पुन्हां आली ॥१०५॥
मज हें कळलें नसतां कांहीं । म्यां ते धेनु दावप्रवाहीं । आणिका ब्राह्मणा दिधलीं पाहीं । स्वाश्रमा तोही ते नेतां ॥६॥
पूर्वीं जयासी दिधली दान । मार्गीं भेटला तो ब्राह्मण । तेणें आणिला तो पडखळून । चोर म्हणून मजपाशीं ॥७॥
तां नीयमानां तत्स्वामी दृष्ट्वोवाच ममेति तम् । ममेति प्रतिग्राह्याह नृगो मे दत्तवानिति ॥१७॥
पूर्व ब्राह्मण म्हणे हे माझी । नृगें मज दिधली द्विजसमाजीं । द्वितीय म्हणे प्रत्यक्ष आजी । दान घेतलें म्या ईचें ॥८॥
हस्तींचें वाळलें नाहीं जळ । कंठीं नृपार्पितसुमनमाळ । ललाटीं आर्द्र गंध केवळ । चौर्यशील केंवि माझें ॥९॥
ऐसें ब्राह्मण परस्परें । भांडतां वदती परुषोत्तरें । आपण निर्दोष ऐसे खरें । प्रतिपादविती तें ऐका ॥११०॥
विप्रौ विवदमानौ मामूचतुः स्वार्थसाधकौ । भवान्दाताऽपहर्तेति तच्छ्रुत्वा मेऽभवद्भ्रमः ॥१८॥
साधावया आपुला स्वार्थ । दोघे कथिती निज वृत्तान्त । तूं दाता कीं हर्ता येथ । हें ऐकोनि भ्रान्त मी झालों ॥११॥
माझे धेनूचें अपहरण । केलें म्हणे पूर्व ब्राह्मण । दुजा म्हणे मीं घेतलें दान । मध्यें कोण तस्कर हा ॥१२॥
पूर्व ब्राह्मण म्हणे तूं तस्कर । माझे धेनूचा अपहार । करूनि दातृत्व मिरविसी थोर । पापाचार हा राया ॥१३॥
दुजा म्हणे तूं दानशूर । स्वधनें संपन्न जेंवि कुबेर । तुज हा ब्राह्मण म्हणे तस्कर । मूर्ख पामर मतिमंद ॥१४॥
पहिला म्हणे धेनूसाठीं । नृपाची भाटींव करिसी वोठीं । ब्रह्मस्वहरणीं बुद्धि खोटी । दुष्ट कपटी हा राजा ॥११५॥
ऐसे ब्राह्मण भांडती निकरें । ऐकोनि तयांचीं क्रूरोत्तरें । भ्रमें माझें चित्त घाबरें । बुद्धि न थरे स्वस्थानीं ॥१६॥
सुकृताचरणीं विघ्नघाला । स्वधर्मकरिता अधर्म घडला । कांहीं बोलों न शकें बोला । शरण विप्रांला मग आलों ॥१७॥
ग्लानिपूर्वक दण्डवतीं । विप्रां केली विनीत विनति । तेही अल्पसी यथामति । कथितों श्रीपति अवधारीं ॥१८॥
अनुनीतावुभौ विप्रौ धर्मकृच्छ्रगतेन वै । गवां लक्षं प्रकृष्टानां दास्याम्येषा प्रदीयताम् ॥१९॥
विनयें दोघांही द्विजांप्रति । प्रार्थना केली बहुतां रीती । परि ते न मनूनि माझी विनती । आग्रहाप्रति वश्य झाले ॥१९॥
मग ऐकैका पृथक्पृथक । करुणा भाकिली जरी सम्यक । तरी नायकतीच ते विवेक । क्रोधोन्मुख प्रज्वळले ॥१२०॥
मग प्रथम विप्राप्रति । लक्ष धेनु निष्क्रयार्थी । अर्पूनि पूर्व याचिली निगुती । परि तो विनती न मनीच ॥२१॥
मग द्वितीय बाह्मणा प्रार्थना केली । लक्ष धेनु घेऊनि पहिली । ज्याची त्यासी देवविली । तो हे बोली न मनीच ॥२२॥
एसें जाणोनि अतिसंकट । दुःखें दाटला माझा कंठ । पुढती चरणीं ठेवूनि मुकुट । प्रार्थिले वरिष्ठ द्विजवर्य ॥२३॥
भवंतावनुगृह्णीतां किंकरस्याऽविजानतः । समुद्धरतं मां कृच्छ्रात्पतंतं निरयेऽशुचौ ॥२०॥
तुम्ही दोघेही कृपावंत । अनुग्रहें कीजे मज सनाथ । किंकराचा अपराध बहुत । क्षमावंतीं क्षमावा ॥२४॥
नेणतां घडलें हें अनुचित । क्षमा करणें तुम्हांसि उचित । नरकीं पडतों मी अनाथ । येथूनि मातें उद्धरिजे ॥१२५॥
अशुचि नरक अंधतम । तेथ पडतों मी अज्ञान अधम । कृपावंत होवोनि परम । मातें निस्सीम उद्धरावें ॥२६॥
अनवधानतेमाजी ऐसें । संकट प्राप्त झालें असे । तुम्हीं सुकृतेरं सदयमानसें । मज दातासें तारावें ॥२७॥
ऐसे ब्राह्मण नानापरी । प्रार्थिले असतां मधुरोत्तरीं । जे बोलिले प्रत्युत्तरीं । तें अवधारीं जगदीशा ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP