मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर राजानो राजलक्ष्म्यंधा नात्मपातं प्रचक्षते । निरयं येऽभिमन्यंते ब्रह्मस्वं साधु बालिशाः ॥३६॥मनुष्यलोकीं मनुष्यदेव । राजमान राजवैभव । यालागीं राजे हें ज्यांचें नांव । प्रजा सर्व जन ज्यांच्या ॥७६॥ऐसे लक्ष्मीमदान्ध राजे । नरकपाताचे न धरूनि लाज । ब्रह्मस्व वांछिती अभिलाषकाजें । विषयओझें भोगाव्या ॥७७॥आपणा म्हणविती सज्ञान । बलात्कारें ब्रह्मस्वहरण । करूनि यथेष्ट विषयाचरण । श्रीसंपन्न मानिती ॥७८॥ब्रह्मस्वहरणें भोगिती विषय । विषयरूपी ते केवळ निरय । सम्यक्मूर्ख जे मानिती प्रिय । म्हणविती राय भूलोकीं ॥७९॥आपणा पुढें नरकीं पतन । हें न देखती उघडूनि नमय । ऐसे सम्यक्मूर्ख दुर्जन । ते ब्रह्मस्वहरण बळें करिती ॥२८०॥पूर्वोक्त ब्रह्मस्वहारकांप्रति । कियत्काळ नरकावाप्ति । पुसों इच्छी जों परीक्षिति । हें जाणोनि सुमति शुक सांगे ॥८१॥गृह्णंति यावतः पांसून्क्रंदतामश्रुबिंदवः । विप्राणां हृतवृत्तीनां वदान्यानां कुटुंबिनाम् ॥३७॥राजनो राजकुल्याश्च तावतोऽब्दान्निरंकुशाः । कुंभीपाकेषु पच्यंते ब्रह्मदायापहारिणः ॥३८॥राया कुरुकुळसरोजतरणि । पुसूं इच्छिसी अंतःकरणीं । तेंचि निरूपी चक्रपाणि । स्वजनालागूनि स्वहितार्थ ॥८२॥जितुक्या ब्राह्मणाच्या वृत्ति । भूमिप्रमुखा हिरूनि घेती । त्या भूमीची परमाणुगणति । नरक भोगिती दिव्याब्दें ॥८३॥हृतवृत्ति जे विप्रवर्य । रुदती सकुटुंब तत्समुदाय । जितुके पांसु तदश्रुतोय । भिजवी निरय तोंवरि त्यां ॥८४॥त्या विप्राचे कुटुंबगण । रुदती करितां वृत्तिहरण । तया अश्रुबिंदूंचें पतन । पांसुपरमाणु जे भिजवी ॥२८५॥तितुक्या ब्रह्मयाचिया समा । वृत्तिहारका दुष्टा अधमा । नरकावाप्ति अंधतमा । सबाह्य काळिमा वरपडती ॥८६॥विप्रवर्य आणि वदान्य । कुटुंबवत्सल श्रुतिसंपन्न । त्यांचें करिती वृत्तिहरण । मग ते दुखवून आक्रंदती ॥८७॥त्यांचे जितुके श्वासोच्छ्वास । ब्रह्मस्वहारकां काळपाश । होवोनि नेती अंधतमास । सकुळ अशेष पूर्वापार ॥८८॥राजे आणि राजमंडळ । राजवर्गीं नियोगी सकळ । वृत्तिहरणदोषें सकुळ । भोगिती केवळ कुंभीपाक ॥८९॥अन्याय करितां न शंकती । निरङ्कुश होवोनि ब्रह्मस्व हरिती । कुंभीपाकीं ते अवघे पचती । ब्रह्मदायापहारी जे ॥२९०॥म्हणती शासनकर्ता कोण । आम्हा प्रतापी श्रीसंपन्न । निर्भय होऊनि न गणिती पतन । ब्रह्मस्वहरणकारक जे ॥९१॥पुढती त्यांची विषयव्यवस्था । स्वमुखें श्रीकृष्ण होय वदता । तें तूं ऐकें कौरवनाथा । सज्जनचित्ता द्रावक जे ॥९२॥स्वदत्तां परदत्तां वा ब्रह्मवृत्तिं हरेच्चयः । षष्टिर्वर्षसहस्राणि विष्ठायां जायते कृमिः ॥३९॥स्वयें दिधली ते स्वदत्ता । आणिकें दिधली ते परदत्ता । ऐसिये विप्रवृत्तीचा हर्ता । नरकभोक्ता पैं होय ॥९३॥दिव्यशब्दें सहस्र साठी । कृमि होऊनि विष्ठाघटीं । पचतां भोगी दुःखकोटी । दुष्ट कपटी दुर्जन तो ॥९४॥एवं झालिया पापक्षय । पुढती मानवयोनि होय । तेथही पापप्रवृत्ति लाहे । नरकनिचय पुन्हा भोगी ॥२९५॥ब्रह्मस्वहरणाची दुर्जरता । कथिली संक्षेपें व्यवस्था । पश्चात्तापें मन्मथजनिता । म्हणे मज सर्वथा हें न घडो ॥९६॥न मे ब्रह्मधनं भूयाद्यद्गृद्ध्वाऽल्पायुषो नराः । पराजिताश्च्युता राज्याद्भवंत्युद्वेजिनोऽहयः ॥४०॥ब्रह्मस्वहरणाची अभिकांक्षा । मजला न हो भो जगदीशा । पश्चात्ताप द्वारकाधीशा । होतां ऐसा स्वयें बोले ॥९७॥ब्रह्मधनाभिकांक्षेसाठीं । अल्पायुषी जननीपोटीं । जन्मोनि मरती उठाउठीं । जन्मकोटिपर्यंत ॥९८॥आम्ही प्रतापी राजेश्वर । म्हणऊनि होती ब्रह्मस्वहर । तेणें भोगिती नरक घोर । तोही प्रकार हरि बोले ॥९९॥पराभव पावती नीचा समरीं । राज्यापासूनि च्यवती त्वरीं । विमुज्ख होय त्यां ऐश्वर्यश्री । यशव्वीरश्रीसमवेत ॥३००॥पडती नीचांचे बंधनीं । यातना भोगिती निशिदिनीं । घेऊं नेदिती अन्न पाणी । करिती जाचणी रक्षक जे ॥१॥राज्यवैभव भोगिलें पूर्वीं । तें आठवूनि झुरती जीवीं । नीच दंडिती गतवैभवीं । एवढी पदवी ब्रह्मस्वें ॥२॥बंधीं पीडतां आयुष्यक्षय । विपत्तिरूप मरण होय । प्रेतसंस्कार कैंचा काय । ओढूनि पाय टाकिती ॥३॥अंत्यजादि नीच गण । रज्जुखंडें पद बांधून । कुत्सित स्थानीं विसर्जून । कथिती येऊन प्रभूपाशीं ॥४॥ब्रह्मस्वहरणें ऐसीं मरणें । ब्रह्मस्वहर्तयांकारणें । जन्मान्तरीं सर्प होणें । जनांकारणें भयजनक ॥३०५॥जन्मोद्वेजी सर्प घोर । विश्वशत्रु महाथोर । ब्रह्मस्वहर्ते नर पामर । भोगिती दुस्तर भवदुःखें ॥६॥सर्पशरीरीं तळमळ । सर्वदा जाची उदरशूळ । कंठीं विषाची जळजळ । क्षुधा विकळ तनु करी ॥७॥बिळामाजी निरोधन । बाहीर वागूं नेदिती जन । कोणी देखतां थोर लहान । अवघे हनन करा म्हणती ॥८॥तयां भेणें पळतां अव्हाटा । आंगा ओरबडे अवचट कांटा । मग त्या कंटकक्षताचे वाटा । देती कष्टा पिपीलिका ॥९॥बाहीर निघतां गृध्रादि विहग । झडपूनि गगना नेती सवेग । बीडालनकुळादि शत्रुवर्ग । करिती लाग धरावया ॥३१०॥ऐसियापरि मृत्यु होय । पुधती सर्पयोनिच लाहे । जेथ अनेक दुःखअपाय । ते ते ठाय अधिष्ठी ॥११॥ब्रह्मस्वहरणीं कष्ट ऐसे । स्वमुखें वदतां कृष्ण त्रासे । रोमाञ्चित सर्वाङ्ग दिसे । सकंप होतसे अनुतापें ॥१२॥पुढती म्हणे ये कळिकाळीं । राजे ब्रह्मस्वहरणशाळी । होवोनि पडती क्लेशबहळीं । घोर नरकीं तें असो ॥१३॥आतां मामकां मदेकशरणां । रक्षावयाची मजला करुणा । म्हणोनि कथितों सदाचरणा । सावध श्रवणा बैसावें ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP