मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर नाहं प्रतीच्छे वै राजन्नित्युक्त्वा स्वाम्यपाक्रमत् । नान्यद्गवामप्ययुतमिच्छामीत्यपरो ययौ ॥२१॥प्रथम प्रतिग्राहक द्विजाग्रणी । तो निश्चयें बोलिला वाणी । लक्ष धेनु अंगीकारूनि । चोर होऊनि मी न वचें ॥२९॥प्रथम प्रतिगृहीता हे माझी । मजला धेनु न देसी आजी । तरी मी येथ द्विजसमाजीं । तास्कर्यदोषा पावेन ॥१३०॥तुजला संकट पडलें जरी । तरी माझी धेनु ठेवीं घरीं । तेणें दूषण दत्तपहारीं । तुझिये शिरीं मज नाहीं ॥३१॥ऐसें बोलोनि ब्राह्मणोत्तम । टाकूनि गेला निजाश्रम । यावरी दुसरा द्विजसत्तम । वदला विषम तें ऐका ॥३२॥अरे राया दानशूरा । दातयांमाजी परम चतुरा । मम धेनूचिया प्रतिकारा । लक्ष अपरा देतोसी ॥३३॥दहा सहस्र त्याहीवरी । धेनु देऊं पाहसी जरी । तरी मी स्वधेनूवीण दुसरी । नाङ्गीकारीं कल्पान्तीं ॥३४॥सायुत नियुत सह मम धेनु । घेऊनि तूंचि हो संपन्न । आम्हांसि देता श्रीभगवान । ऐसें बोलोनि तो गेला ॥१३५॥धेनु त्यागोनि विप्र दोन्ही । गेले निजाश्रमालागूनी । मग मी पडलों चिन्तवणीं । यावन्मरणपर्यंत ॥३६॥एतस्मिन्नंतरे याम्यैर्दूतैर्नीतो यमालयम् । यमेन पृष्टस्तत्राहं देवदेव जपत्पते ॥२२॥ऐशियामध्यें अकस्मात । मरण झालें उपस्थित । घेऊनि गेले यमाचे दूत । यमपुरींत यमानिकटीं ॥३७॥जगत्पते भो जगदाधारा । देवदेवा परमेश्वरा । यमें पुसिलें मज विचारा । त्या निर्धारा अवधारीं ॥३८॥पूर्व त्वमशुभं भुंक्षे उताहो नृपते शुभम् । नांत दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भास्वतः ॥२३॥यमें संबोधूनियां मातें । पुसिलें निजसभेआंतौतें । आधीं आपुल्या अशुभातें । अथवा शुभातें भोगीं पां ॥३९॥तुझिया दानधर्मासी अंत । नाहीं म्हणोनि लोक भास्वत । भोगीं अक्षय तव सुकृत । मी निश्चित पाहतसें ॥१४०॥तेव्हां मीही आपुल्या मनीं । विवरिता झालों निर्धारूनी । अनंतदानादि धर्मश्रेणी । संपादूनि येथ आलों ॥४१॥तथा पुण्यप्रकाशास्तव । अक्षयलोक भोगीन दिव्य । ऐसें विवरूनि पाहिलें सर्व । मग केला निर्वाह तो ऐका ॥४२॥पूर्व देवाशुभं भुंज इति प्राह पतेति सः । तावदद्राक्षमात्मानं कृकलासं पतन्प्रभो ॥२४॥देव ऐसिया संबोधनें । यमधर्मासि प्रार्थिलें वचनें । पूर्वीं अशुभातें भोगणें । मजकारणें मानतसे ॥४३॥ऐसें बोलतां मजलागून । यमधर्म म्हणे अधःपतन । पावें हें वाक्य होतां श्रवण । च्यवलों तेथून तत्काळ ॥४४॥पतन पावलों अंधकूपीं । सरठवपु हे पापरूपी । आपणा देखूनि दुष्कर्मकल्पीं । अघसंकल्पीं वेष्टिलों ॥१४५॥प्रभो समर्था जगदुद्धरणा । तुजलागीं आली माझी करुणा । प्रवर्तलासि मम् उद्धरणा । हें अंतःकरणामाजी गमे ॥४६॥ब्रह्मण्यस्य वदान्यस्य तव दासस्य केशव । स्मृतिर्नाद्यापि विध्वस्ता भवत्संदर्शनार्थिनः ॥२५॥भो केशवा ऐकें विनति । अद्यापि विध्वंस न पवे स्मृति । म्हणसी कारण काय यदर्थीं । तें यथामति निरूपितों ॥४७॥ब्रह्मशब्दें बोलिजे वेद । तदुदित कर्म जें जें विशद । वेदाज्ञेसी देऊनि खांद । आचर मंद न होऊनिया ॥४८॥वेदाज्ञेचा दृढविश्वास । तदाचरणीं परमोल्लास । फळाशा न स्पर्शे मानस । ब्रह्मण्यपुरुष तो जाण ॥४९॥वदान्य म्हणिजे कायवाड्मनें । याचकेच्छा सर्वस्व देणें । वदान्यतेचीं अळंकरणें । आंगीं लेणें ज्या शोभे ॥१५०॥आणि तूं सर्वग सर्वोत्तम । तव दास्याचा परम नियम । उपासकता अनन्यप्रेम । भजनीं सकाम नान्यत्र ॥५१॥सर्वभूतीं लक्षूनि तुज । भेदभावाचें भर्जित बीज । प्रवृत्तिमात्र परमार्थकाज । शोभवीं सांज दिन रजनी ॥५२॥दास्यविषयींच सापेक्ष । फळाशेविषयीं जो निरपेक्ष । अनन्यबोधें जो अपरोक्ष । वर्तोनि दक्ष व्यवहारीं ॥५३॥सम्यक म्हणिजे बरव्यापारी । तव दर्शनीं प्रेमा पुरी । ते तूं म्हणसी कवणेपरी । ऐक मुरारि निरूपितों ॥५४॥मेघमुखें जळ निवडलें । सकंचुकीं गगनीं चढलें । पवनें जडत्वा वरपडलें । नरका जालें जळ असतां ॥१५५॥अपरोक्षबोधें जलत्वा जाणें । जडत्वें व्यवहारीं वर्तणें । त्या जैं सागरीं समरसपणें । ऐक्य पावणें फावतसे ॥५६॥तेंवि वाच्यांश शबलांश । निरसितां जीवेश्वर निःशेष । निर्विकल्प स्वसामरस्य । व्यतिरेक दर्शन त्या नाम ॥५७॥निर्विकल्प ब्रह्मात्मबोध । ओतप्रोत ब्रह्मानंद । गूळगोडीचा नोहे भेद । तेंवि अभेद सगुणत्वीं ॥५८॥सगुणावयदर्शन ऐसें । ऐसिये दशेचें ज्यातें पिसें । दर्शनार्थी तो म्हणिजेत असे । येरें वायसें भेदज्ञें ॥५९॥आंगीं कामाचा संचार । अध्यस्त कामिनीशरीर । स्वप्नीं भासूनि तदाकार । रतिव्यवहार संपादी ॥१६०॥नसतां दुसरी तेथ अंगना । सगुण भासे स्मरकल्याणा । ऐसें सकाम करितां ध्याना । सगुणदर्शना अर्थिती ॥६१॥न ते सम्यक संदर्शनार्थी । सम्यक्पदाची हे व्युत्पत्ति । येर दर्शनमात्र ते भ्रान्ति । विपरीत बोधीं वर्ततसे ॥६२॥दृष्य द्रष्टा आणि दर्शन । ये त्रिपुटीचें गोचर ज्ञान । तेंचि मुख्यत्वें भवभान । अधिष्ठान सुखदुःखा ॥६३॥संकल्पविकल्पाचें निज । हेंचि जन्ममरणाचें बीज । हेंचि अधोर्ध्वगतीचें काज । विरक्ता लाज हे दशा ॥६४॥ऐसिये त्रिपुटीचिया वयुनें । सगुणदर्शन वांछिती मनें । सम्यक् दर्शनार्थी त्यांलागीं म्हणणें । न घडे जाणें केशवा ॥१६५॥अंधापायीं स्वर्णगोटा । लागतां उपेक्षी करंटा । तेंवि वास्तवज्ञानेंवीण चेष्टा । सगुण निर्गुण अवघ्याचि ॥६६॥राया म्हणसी वस्तुसामर्थ्य । तरी तें ऐकें यथातथ्य । योगभ्रष्टावीण पथ्य । नोहे निश्चित इतरांसी ॥६७॥नामस्मरणें चक्रपाणि । प्रह्रादाच्या संकतश्रेणी । निरसी तें नाम आतां कोणी । दृढ होवोनि न स्मरती ॥६८॥प्रह्रादाचा दृढ निश्चय । तैसा ज्या आंगीं प्रत्यय । तोचि योगभ्रष्ट निश्चय । सर्व कविवर्य जाणती ॥६९॥निश्चयाचे नुघडती डोळे । संकल्पविकल्पें बुद्धि तरळे । सकामसाधनें वरिवरी बरळे । करितां होपळ ते होती ॥१७०॥दृढनिश्चयें स्थिरावला । योगभ्रष्ट म्हणिजे त्याला । संकल्पविकल्पें जो तरळला । म्हणिजे त्याला भवग्रस्त ॥७१॥ योग करितां झाला भ्रष्ट । ते न म्हणावे वृथा कष्ट । मार्गें जातां चुकला वाट । पुन्हा तो नीट पथ लाहे ॥७२॥असो विस्तारें कारण काय । कुरुभूपाळा तो नृगराय । स्मृतीचें कारण कथिता होय । तो अन्वय अवधारीं ॥७३॥ब्रह्मण्या वदान्या मज तव दासा । सम्यक्दर्शनाची पिपासा । यास्तव अद्यापि मम स्मृति नाशा । न पवे परेशा निर्धारें ॥७४॥ऐसा कथूनि निजाधिकार । पुढतीं अघटित लाभ थोर । मानूनि कृष्णेंसीं उत्तर । आश्चर्यकर बोलतसे ॥१७५॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP