इत्युक्तः कुमतिहृष्टः स्वगृर्ह प्राविशन्नृप । प्रतीक्षन्गिरिशादेशं स्ववीर्यनशनं कुधीः ॥११॥

इतुकी शङ्कर बाणाप्रति । बोलिला सक्रोध वरदोक्ति । ऐकोनि हरिखेला दुर्म्मति । सदनाप्रति प्रवेशाला ॥६१॥
प्रवेशोनियां आत्मभुवनीं । विवरी शिवाची वरदवाणी । प्रलयरुद्रतुल्य रणीं । योद्धा लाहेन कैं आतां ॥६२॥
सहस्रबाहूंचें तुळीं बळ । परजी लहुडी भुशुंडी शूळ । पाश पट्टिश चक्रें त्रिशूळ । भिंदिपाळपरिघादि ॥६३॥
तोमर मुद्गर कुंत मुसळ । वज्र कृपाण खेटक हळ । गदापरश्वधविद्याकुशळ । शक्ति विशाळ पडताळी ॥६४॥
धनुर्वेदाचीं आवर्तनें । अस्त्रप्रयोग बीजपठनें बीजपठनें । परशस्त्रांचीं निवारणें । उपसंहरणें दिव्यास्त्रां ॥६५॥
हें देखोनि प्रधान आप्त । पुसती कोण हा विचार गुप्त । कैसेनि आनंद झाला प्राप्त । कीजे क्लृप्त तो आम्हां ॥६६॥
ऐसें ऐकूनि म्हणे बाण । म्यां प्रार्थिला गौरीरमण । मजसी करी समराङ्गण । तो योद्धा दारुण याचिला ॥६७॥
संतुष्ट होवोनिया शङ्कर । कामिलाऐसा दिधला वर । केतु भंगेल तैं तुज वीर । समरीं दुर्धर जोडेल ॥६८॥
ऐकोनि प्रधान मंत्री म्हणती । उदेली दुर्दैवें दुर्मति । अमृत हाणोनि लत्ताघातीं । धरिली प्रीति विषपानीं ॥६९॥
अपयश गर्भा आलें असे । म्हणोनि डोहळे झाले ऐसे । पाव कवळावया संतोषें । पतंग जैसे सोत्साह ॥७०॥
आपुल्या वीर्याचें नाशन । कर्ता जुंझार रुद्रासमान । केव्हां मजशीं करील रण । तें शिववरदान प्रतीक्षी ॥७१॥
असो इतुकी बाणकथा । ध्वजभंगाचा हेतु कोणता । तोही पुससि जरी कुरुनाथा । तरी तत्त्वता निरूपितों ॥७२॥

तस्योषा नाम दुहिता स्वप्ने प्राद्युम्निना रतिम् । कन्याऽलभत कांतेन प्रागदृष्टश्रुतेन च ॥१२॥

उषानामका दुहिता त्याची । अनुपनीतां असतां साची । स्वप्नामाजी अनिरुद्धाची । रति लाभली दैवबळें ॥७३॥
कन्याशब्दें अपर्णिता । सुरतक्रीडेची अनभिज्ञता । जो नर देखिला ऐकिला नसतां । तेणें तत्त्वता रति केली ॥७४॥
कान्त म्हणिजे अतिसुन्दर । नवयौवनें निमासुर । तेणें स्वप्नीं सुरताचार । केला असुरतनयेशीं ॥७५॥
कोण्या साधनें कैसें दैव । कैसा स्वप्नप्रादुर्भाव । केंवि लाभली नर अपूर्व । तेंही सर्व अवधारा ॥७६॥
तें येथ श्रीमद्भागवतीं । वदला श्रीशुक संकळितीं । यालागीं विष्णुपुराणसंमति । कथान्वय निगुती कथिजेतों ॥७७॥
कथासंबंध उमजावयासी । वैष्णवोक्त इतिहासासे । संदर्भितां अनारिसी । टीका विदुषीं न मनावी ॥७८॥
बाणासुराची तनया उषा । जिचिया लावण्यरसपीयूषा । सुरनरामलोचनां तृषा । चकोरां निशारमणवत् ॥७९॥
लावण्यरसाची पुतळी । नवयौवनें कोमळ वाली । दिव्याभरणेंसी विल्हाळी । रूपनव्हाळी देखतयां ॥८०॥
गौरीसेवनीं परम निरत । तंव कौतुक वर्तलें अकस्मात । पार्वती आणि कैलासनाथ । क्रीडा करिती स्वानंदें ॥८१॥
तें देखोनि बाणतनया । विरहें व्याकुळ झाली राया । कामज्वरें तापली काया । म्हणे मम वया वैयर्थ्य ॥८२॥
निजमानसीं स्पृहा करी । म्हणे सर्वज्ञ असतां गौरी । माझे अंतरींची अवसरी । परमेश्वरी कां नेणे ॥८३॥
ऐसें उषा चिंती मनीं । पार्श्वभागीं बालव्यजनी । तंव तयेतें कात्यायनी । पाहे फिरूनि स्मितवक्त्रें ॥८४॥
सकळचित्तज्ञा शाङ्करी । म्हणे सुन्दरे बाणकुमरी । हृदयीं कांहीं चिंता न करीं । रमसी निर्धारीं कान्तेंसी ॥८५॥
अतिशय स्मरसंतप्ता न होणें । स्वकान्तेंसी क्रीडा करणें । ऐकोनि येरी चित्तीं म्हणे । काळीं कोणे घडेल हें ॥८६॥
कोणता भर्ता नेमिला मज । केंवी कळे हें रहस्यगुज । ऐसें मानसीं भावितां सहज । कळलें बीज गौरीतें ॥८७॥
पार्वती म्हणे वो लावण्यराशि । शुक्लपक्षीं वैशाखमासीं । प्रदोषयुक्त द्वादशीसी । भर्ता भोगिसी निजशेजे ॥८८॥
रात्रीं स्वशेजे सुप्त असतां । स्वप्नमाजी भोगील भर्ता । तोचि कान्त तुज तत्त्वता । निर्धारूनि वर दिधला ॥८९॥
मग ते उषा प्रबुद्ध नवरी । अंगुलें दिवसगणना करी । वैशाखद्वादशीची शर्वरी । कैं मी नेत्रीं पाहीन ॥९०॥
हरिवंशींचा कथाप्रकार । गौरीवराचा उषेसी विसर । असतां स्वप्नीं मन्मथकुमर । बलात्कारें रमला पै ॥९१॥
तरी जयाची ज्यासी अवसरी । तयाचा विसर कोणेपरी । पडेल ऐसें जाणिजे चतुरीं । असो अंतरीं विवरूनी ॥९२॥
वस्त्राभरणें नित्य नूतन । मुकुरीं पाहे स्वलावण्य । म्हणे मजला पुरुष कोण । स्वप्नीं येऊन भोगील ॥९३॥
तंव पातला माधवमास । अवस्था वाढे दिवसेंदिवस । कामसमृद्धिकृत हव्यास । उपकरणांस संपादी ॥९४॥
वैशाख शुक्ल त्रिदिनव्रत । दशमी करूनि एकभुक्त । हरिहरकथा पुराणोक्त । श्रवणीं समस्त दिन गेला ॥९५॥
एकादशी निराहार । रात्रीं केला शिवजागर । प्रदोपीं पूजूनियां शङ्कर । पारणें द्विजवरसह पंक्ती ॥९६॥
त्यानंतरें कन्यागारीं । रत्नखचित दामोदरीं । उषा जाऊनि स्वमंदिरीं । तनु श्रृंगारी कौशल्यें ॥९७॥
चंद्रकिरणांऐसा श्वेत । शेला नेसली नूतन धौत । तगटीकंचुकी तटतटीत । ग्रंथियुक्त लेइली ॥९८॥
कनकरत्नाभरणीं वेणी । खोपा ग्रथिला सुगंध सुमनीं । अर्धचंद्र बिजोरा रत्नीं । जडित शीसफुल मुक्तलग ॥९९॥
श्रवणभूषणें कुंदलजोडे । गल्लदेशीं दोहींकडे । कुंडलप्रभा वदनीं पडे । शशाङ्कपाडें मुख भासे ॥१००॥
स्निग्ध मोहित रजनीचूर्ण । करीं मर्दूनि चर्चिलें वदन । नयनीं सोगयाचें अंजन । कुंकुम कोरून रेखिलें ॥१॥
भ्रूहनुवटीउभयभागीं । गोंदिली प्रभा गगनरंगीं । चंदनटिकली चंद्रासंगीं । चित्रांसलग्न तेंवि गमे ॥२॥
नाकीं नथनी नवरत्नजडित । ताम्बूल त्रयोदशपदार्थयुक्त । वाम कपोली दृग्दोपार्थ । अंजनाङ्क मिरवतसे ॥३॥
कुंटलकुटिलालकमंजरी । सूक्ष्म मिरवे दक्षिण श्रोत्रीं । नवयौवनें तनु साजिरी । गौर भासुर कनकाङ्गीं ॥४॥
बाहुभूषणें वलयें चुडे । रत्नखचित कंकणजोडे । मुद्रिकांवरी जोडिले खडे । कर भासुर तद्योगें ॥१०५॥
मलयजगंधें घेऊनि उटी । मुक्ताफळांचे हार कंठीं । अमूल्य मेखळा कटितटीं । क्षुद्रघंटी रुणझुणती ॥६॥
अंदू नूपुर वांकी वाळे । अनुवट जोडवीं शुभवर्तुळें । विरोद्या पोल्हारे दशाङ्गुळें । कनिष्ठ बोटीं शफरिका ॥७॥
दिव्य सुमनांचे हार कंठीं । लावण्यललाम नवगोरटी । दर्पण धरूनि वाममुष्टि । पाहे दृष्टी तद्गत भा ॥८॥
मंचक झाडूनि हंसतूळिका । घालोनि पासोड्या झांकिला निका । जाति मोगरे शतपत्रिका । आरळ रचिलें कौतुकें ॥९॥
चांदिवा सुरंग स्वप्रकाश । झळकती मुक्ताफळांचे घोंस । सुगंधसुमनांचे विशेष । दीपप्रकाश रत्नांचे ॥११०॥
कुम्भाण्ड बाणमंत्री निका । त्याची कन्या चित्रलेखा । तिसी वृत्तान्त हा ठाउका । उषेच्या सख्या अनुकूळ जे ॥११॥
रजनी क्रमिलिया याममात्र । पहावया उषाचरित्र । चित्रलेखा परम चतुर । आली सत्वर ते ठायीं ॥१२॥
गौरीहरां करूनि नमन । स्मरूनि गौरीचें वरदान । उषा करिती झाली शयन । जागृत ठेवूनि चित्रलेखे ॥१३॥
उपबर्हण घालूनि उसां । प्रावरण करूनि सूक्ष्मवासा । पहुडली साशंक हृदयकोशा । माजी परेशा चिंतूनी ॥१४॥
उषा पहुडतां शेजेवरी । निद्रा लागली घटिका चारी । स्वप्न देखिलें तियेमाझारी । परमेश्वरीवरदानें ॥११५॥
श्याम सुंदर पंकजाक्ष । लावण्य तरुण सगुण दक्ष । दिव्याभरणीं नर प्रत्यक्ष । देखिला वक्षःसंलग्न ॥१६॥
वामकरतळें धरूनि वेणी । वरद चुंबी अधरपानीं । कंचुकीग्रंथि विसर्जूनी । कुचमर्दनीं प्रवर्ते ॥१७॥
स्मरमदगजाचें कुंभस्थळीं । कामाङ्कुशाचीं क्षतें केलीं । गाढालिङ्गनें हृदयीं कवळीं । नीवोमोक्षण करूनियां ॥१८॥
प्रथमसंगमीं साशंकित । सकंप अवयव आकुंचित । नरकस्पर्शा निराकरित । चिह्नें लक्षित चित्रलेखा ॥१९॥
आलिङ्गनाच्या आवेशें । तरळ बाहुयुगल दिसे । मन्मथसदनाच्या विकाशें । उत्तानवर्ष्मीं चंचळता ॥१२०॥
ओष्ठ चावूनि कुसकुसी मुखें । स्पंदित अष्टाङ्ग मन्मथसुखें । जननी स्मरूनि अव्यक्तवाक्यें । अंग मोडूनि वदतसे ॥२१॥
करणीं उदेला रजोद्गम । लोहिवलाछित दुकूलोत्तम । स्वेदें पुलकित वदनपद्म । भासे विराम स्मरचिह्नां ॥२२॥
इतुका देखे चमत्कार । तंव झळकला प्रजागर । म्हणे केउता गेला चोर । स्मरमंदिर उघडूनी ॥२३॥

सा तत्र तमपश्यन्ती क्वासि कांतेति वादिनी । सखीनां मध्य उत्तस्थी विव्हला व्रीडिता भृशम् ॥१३॥

मानसचिद्रत्नाची पेटी । स्मरसंगरीं उठाउठी । हरूनि गेला कवणे वाटीं । म्हणोनि दृष्टी हुडकितसे ॥२४॥
म्हणे पाजूनि अधरामृत । रतिरसानुभव करूनि आतां । केउता गेलासि प्राणनाथा । दुश्चितचित्ता परिमार्गी ॥१२५॥
अरतें परतें दुरी जवळी । मंदिरीं चहूंकडे धांडोळी । लवूनि पाहे मंचकतळीं । तंव हांसे वेल्हाळीं चित्ररेखा ॥२६॥
अवो चतुरे बाणतनये । मंचका तळीं पाहसी काय । कैसा वर्तला अभिप्राय । कथिती होय तो आम्हां ॥२७॥
चित्रलेखा ऐसें बोले । तंव सखीमंडळ चेइरें झालें । उषेनें सलज्ज मौन धरिलें । अंतर व्यापिलें चिंतेनें ॥२८॥
उठूनि बैसली सखियांमाजी । तंव त्या पुसती अपूर्व आजे । काय वर्तलें तयाची वाजी । करी समाजीं सखियांचे ॥२९॥
तंव विरहें बहु व्याकुळा । सलज्ज बोलूं न शके बोला । अंतर जाणोनि सख्यांचा मेळा । दुरी वारिला चित्रलेखेनें ॥१३०॥

बाणस्य मंत्री कुंभांडश्चित्रलेखा स तत्सुता । सख्यपृच्छत्सखीमूषां कौतूहलसमन्विता ॥१४॥

बाणासुराचा मुख्य प्रधान । कुम्भांडनामा मंत्री प्रवीण । ताचे जठरींचें कन्यारत्न । चित्रलेखा उषासखी ॥३१॥
ससिखयांमाजी चातुर्यखाणी । विशेष उषेची तिललाहणी । रहस्य वदतां दोघी जणी । परस्परें न शंकती ॥३२॥
ते एकाकी प्रधानसुता । उषा नेऊनियां एकान्ता । परमकौतुकाविष्टचिता । पुसे वृत्तान्ता तें ऐका ॥३३॥

कं त्वं मृगयसे सुभ्रूः कीदृशस्ते मनोरथः । हस्तग्राहं न तेऽद्यापि राजपुत्र्युपलक्षये ॥१५॥

चित्रलेखा म्हणे वो उषे । सुभ्रू सुन्दरे डोळसे । तुझा मनोरथ काय असे । तो मज विश्वासें सांग पां ॥३४॥
अद्यापि तुझें पाणिग्रहण । विध्युक्त झालें नाहीं लग्न । वरिलें नसतां पुरुषरत्न । करिसी गवेषण कोणाचें ॥१३५॥
राजपुत्री तुझीं चिह्नें । अपूर्व भासती नवयौवनें । तियें म्यां उपलक्षिलीं नयनें । गमसी यूनें संस्पृष्टा ॥३६॥
कोणा पुरुषातें तूं सदनीं । परिमार्गिसी नृपनंदिनी । जीवींचें रहस्य मजलागोनी । शंका सांडूनि सांग पां ॥३७॥
प्राणसखी तूं जिवलग माझी । प्राणही वेचीन तुझिये काजीं । जें जें कौतुक देखिलें आजी । तें मज सहजीं सांगावें ॥३८॥
जिवलगे हें मज न सांगतां । केंवि निस्तरिसी चिंतावर्ता । तुझी देखूनि विह्वळता । मजही अवस्था जाकळी ॥३९॥
ऐसें ऐकूनि सखीचें वचन । उषा सांवरी जातां प्राण । म्हणे तूं मज मायबहीण । गुह्य संपूर्ण अवधारीं ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP