अध्याय ६२ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगणेशाय नमः । श्रीमदुक्मिणीरमणाय नमः ।
अहंता ममता त्वंता पदें । ज्याच्या प्रकाशें होती विशदें । तो सन्मात्र सेवितां सन्मुनिवृंदें । बोधें अबोधें सांडवती ॥१॥
वंदूनि सज्जनसेव्या तया । गोगोप्तया गोविंदराया । दयार्नव द्विषष्टितमाध्याया । विवरावया प्रवर्ते ॥२॥
श्रोतीं होवोनि सावधान । भाषा हरिवरदाव्याख्यान । श्रद्धापूर्वक करितां श्रवण । घरीं वैश्रवण दास्य करी ॥३॥
स्वानंदपूर्ण निष्कामभक्त । इहामुत्रार्थीं जरी विरक्त । तथापि हरिगुण श्रवणासक्त । होतां सर्वार्थ ओळगती ॥४॥
कैवल्यसुखाची जे कां जननी । अभेदभक्ति हरिगुरुचरणीं । अपरोक्षबोधें ते लाहूनी । चिदात्मभुवनीं विराजती ॥५॥
ते भागवतींचा द्विषष्टितम । अध्याय आरंभिला उत्तम । कैसा तयाचा अनुक्रम । तोही सुगम कथिजेतो ॥६॥
शोणितपुरीं बाणासुर । जो शिवाचा वरद कुमर । तेणें शंकरा याचिला वर । समरीं वीर प्रतियोद्धा ॥७॥
शंकरें कथिलें तयाप्रति । केतु भंगोनि पडेल क्षिती । तत्प्रसंगें मदोपहति । समरीं निश्चिती लाहसील ॥८॥
बाणतनया उषानाम्नी । सखी प्रेरूनि द्वारकाभुवनीं । अनिरुद्ध नेऊनि होईल पत्नी । बाण त्या कदनीं रोधील ॥९॥
ये अध्यायीं इतुकी कथा । शुक निरूपी मत्स्यजामाता । भाषाव्याख्यानें ते श्रोतां । एकाग्रता परिसावी ॥१०॥
रोचनेचें पाणिग्रहण । त्यामाजी कथिलें रुक्मिमरण । उषाहरणीं बाणकदन । कैसें म्हणोन भूप पुसे ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP