मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर ताः प्राहिणोद्द्वारवतीं सुमृष्टविरजोंऽबराः । नरयानैर्महाकोशान्नथाश्वान्द्रविणं महत् ॥३६॥जाणोनि कृष्णाज्ञासंकेत । कुशला किंकरीं शतानुशत । कन्यका दास्यार्थीं भगदत्त । नियोजी समस्त पृथक्पृथक् ॥७१॥जवादि केशर कस्तूरी उटणं । सुगंध तैलाभ्यक्त मूर्ध्नि । उष्णोदकीं मंगलस्नानीं । सुमृष्टगात्रा त्या केल्या ॥७२॥वसनशाळेमाजील वसनें । अग्निधौतें विरजें नवीनें । कंचुकी उत्तरीयें परिधानें । सर्वांकारणें सुमृष्टें ॥७३॥उघडोनियां नेपथ्यनिलयें । रत्नखचितें कर्बूरमयें । लेवविलीं यथान्वयें । पृथगवयवीं सुमृष्टें ॥७४॥एवं सुमृष्टा विरजोऽम्बरा । सशत सहस्र षोडश दारा । शिबिकायानीं द्वारकापुरा । कमनीयतरा पाठविल्या ॥४७५॥रत्नवैदूर्यमणींचे कोश । कनकमुद्रामय अशेष । भरूनि रथ गज क्रमेळ वृष । धाडी जगदीश त्यांसंगें ॥७६॥अश्वरत्नें कुंजररत्नें । स्यंदनप्रमुखें विचित्रें यानें । मयनिर्मित दिव्याभरणें । द्वारके कृष्णें पाठविलीं ॥७७॥ऐरावतकुलेभांश्च चतुर्दतांस्तरस्विनः । पाण्डुरांश्च चतुःषष्टिं प्रेषयामास केशवः ॥३७॥क्षीरोदमथनोद्भव कुंजर । ज्यावरी आरूढे पुरंदर । तद्वीर्यसंभव संततिप्रवर । जवें समीर समतेचें ॥७८॥पयःफेनपाण्डुरवर्ण । चतुर्दंतविराजमान । शुंडा लंबाळ त्रिवळीपूर्ण । छायाविहीन देदीप्य ॥७९॥ते चौसष्टी स्वर्गभूषण । सालंकृत सपल्ल्याण । कृष्णें द्वारके दिव्य वारण । रत्नें भरून पाठविले ॥४८०॥नाना शस्त्रास्त्रसमृद्धि । अनर्घ्य वस्तु अनर्घ्य विधि । मनुष्यलोकीं कोणीं कधीं । देखिलिया नायकिलिया ॥८१॥भगदत्त विरक्त भगवत्प्राण । सर्व समृद्धि समर्पून । संतुष्ट केला भामारमण । अनन्य शरण होत्साता ॥८२॥प्राग्ज्योतिषपुरींचा नृप । भद्रीं स्थापूनि भगदत्त भूप । कृष्णें ठाकिलें त्रिविष्टप । सुरपादपहरणार्थ ॥८३॥निरसावया निर्जराधि । त्यांची प्रकटावया कृतघ्नबुद्धि । अमर जिंकावया युद्धीं । गेला त्रिशुद्धी तें ऐका ॥८४॥गत्वा सुरेंद्रभवनं दत्वाऽदित्यै च कुण्डले । पूजितस्त्रिदशेन्द्रेण सहेंद्राण्या च सप्रियः ॥३८॥जाऊनियां शक्रसदना । आह्लाद केला संक्रंदना । नमिलें अदितिमातृचरणा । सत्यभामे समवेत ॥४८५॥दिव्य कुंडलें भौमापहृतें । आणोनि समर्पिलीं मातेतें । देखोनि आल्हादभरित चित्तें । आशीर्वचनें त्या दिधलीं ॥८६॥सपादशतायुर्वैभव । भोगी त्रैलोक्यविजयविभव । भामासौभाग्यसलिलें प्रवाहो । सुरनिम्नगा चिरकाळ ॥८७॥शक्रें नेवोनि भद्रासनीं । सत्यभामेसीं चक्रपाणि । सवें घेऊनि इंद्राणी । पादार्चनीं प्रवर्तला ॥८८॥कनककुम्भ कुंभस्तनी । धरूनि जळ ओती इंद्राणी । महर्षि सजीव मंत्रपठनीं । सामगायनीं देवर्षि ॥८९॥परिधान करवूनि कनकवसनें । रत्नखचितें दिव्याभरणें । दिव्यगंधें विलेपनें । स्वर्गसुमनें समर्पिलीं ॥४९०॥उधळूनि सुगंधचूर्णरोळा । दिव्यावतंस सुमनमाळा । धूप दीप चरणकमआळ । उजळूनि केला जयगजर ॥९१॥अमृत ओगरिलें नैवेद्या । सुरसा फळादि पदार्था मेध्यां । सुरवरसेव्यां खाद्या हॄद्यां । विधिहरवंद्या समर्पिती ॥९२॥सर्वस्वदानें अनन्यदास । होवोनि नमिला श्रीनिवास । नीराजनादि मंगळघोष । मंत्रपुष्पें समर्पिलीं ॥९३॥स्तुतिस्तवनें प्रदक्षिणा । करूनि निर्जर लागती चरणां । म्हणती रक्षिलें अमरभुवना । भौमा दुर्जना वधूनियां ॥९४॥शचीनें सत्यभामा हातीं । धरूनि स्वसदनीं एकान्तीं । नेवोनि पूजिली यथानिगुती । सप्रेमभक्ती गौरविली ॥४९५॥समर्पूनि स्वसंपत्ति । म्हणे धन्य तूं ये त्रिजगतीं । सुकृतें वरिला जगत्पति । अमर सेविती तच्चरणा ॥९६॥घेऊनि निर्जरवरसम्मान । सत्यभामेसीं भगवान । खगेन्द्रपृष्ठीं आरोहण । करूनि गमना आदरिलें ॥९६॥द्वारके निघतां श्रीगोपाळा । बोलिली सत्राजिताची बाळा । पार्यातग्रहणीं विसर पडला । तो घेतला पाहिजे ॥९८॥हरि म्हणे घेतां कल्पद्रुम । विक्षेप मानील अमरोत्तम । घडेल अमरेंसीं संग्राम । त्यांसीं विक्रम केंवि घडे ॥९९॥ऐकोनि हांसिली सत्यभामा । निर्जर कांपती ज्याचिया नामा । क्षणार्धें मारिलें तया भौमा । किमर्थ आम्हां भेडविसी ॥५००॥अवश्य कीजे पार्यातहरण । अमरेंसीं मी करीन रण । ऐकोनि सत्यभामेचें वचन । श्रीभगवान हांसिला ॥१॥नोदितो भार्ययोत्पाट्य पारिजातं गरुत्मति । आरोप्य सेंद्रान्विबुधान्निर्जित्योपानयत्पुरम् ॥३९॥प्रेरिला भार्येनें होत्साता । नंदनवनीं प्रवेशतां । रक्षक वारिती भगवंता । म्हणती अनुचिता न करावें ॥२॥इंद्राणीचें हें उपभोगवन । न करवे कोण्हा अवलोकन । बळात्कारें रिघतां पूर्ण । सद्यः शासन पावाल ॥३॥ऐकोनि हांसिली सत्यभामा । इंद्राणीची कायसी गरिमा । मी पढियंती मेघश्यामा । माझिया नामा तीसि वदा ॥४॥इंद्रमानिनी या अभिमानें । गौण मानिसी तिन्ही भुवनें । मी कृष्णाच्या वालभगुणें । नाणीं गणने तुजलागीं ॥५०५॥ऐसें बोले जंव सत्यभामा । तंव आवेश आला पुरुषोत्तमा । उत्पाटूनियां कल्पद्रुमा । विहंगोत्तमा वोळंघला ॥६॥रक्षकीं केला हाहाकार । म्हणती नेला सुरतरुवर । ऐकोनि क्षोभला पुरंदर । अमरभार उठावले ॥७॥वसु पातले समरक्षिती । पावकनामा यूथपति । तेणें हाकिला श्रीपति । सैन्यसंपत्तिसमवेत ॥८॥विष्णुनामा आदित्य दळीं । तेणें हांकिला वनमाळी । खट्वाङ्गपाणि रुद्रमंडळीं । शंकरनामा लोटला ॥९॥सिद्ध साध्य चारण यक्ष । चित्ररथादि गंधर्वमुक्ष । किन्नर मरुद्गण किम्पुरुष । लोटली अशेष देवचमू ॥५१०॥त्यानंतरें लोकपाळ । आपुलालें सज्जूनि दळ । ऐसी सुरसेना तुंबळ । मिळूनि गोपाळ वेष्टिला ॥११॥ गुह्यकपति द्रविणपति । कुबेर उत्तरेचा दिक्पति । गदा पडताळूनियां हातीं । तेणें श्रीपति पाचारिला ॥१२॥विजयध्वजींचें व्याख्यान । सत्यभामेनें धनुष्यबाण । घेऊनि धनदेंसीं दारुण । केलें रण शस्त्रास्त्रीं ॥१३॥सत्यभामेनें समराङ्गणीं । कुबेर भंगिला अर्धक्षणीं । गरुडें वरुण संत्रासूनी । रणमेदिनी सांडविली ॥१४॥हें देखोनि परमाश्चर्य । हास्य करूनि वृष्णिधुर्य । भंगिता झाला निर्जरनिचय । कक्षप्राय पावकवत् ॥५१५॥तिये समयीं पावक पवन । पिशाचसैन्येंसीं ईशान । दण्डपाणि कुणपासन । मिळोनि भगवान पडखळिला ॥१६॥शार्ङ्ग सज्जूनि शार्ङ्गपाणि । त्यांचीं शस्त्रास्त्रें तोडूनी । सर्वही भंगिले समराङ्गणीं । पाठी देऊनि पळाले ॥१७॥तिये समयीं पुरंदर । पालाणूनि सुरकुंजर । करें पडताळूनियां वज्र । समयीं श्रीधर पाचाली ॥१८॥वज्र हाणितां खगेश्वरा । तेणें लाघवें चमत्कारा । करूनि त्रासिलें सुरकुंजरा । चंचुप्रहारा करूनियां ॥१९॥कृष्णें परजूनि सुदर्शन । अमरेंद्राचे घ्या रे प्राण । तंव बहस्पतीनें करूनि स्तवन । निजयजमान वांचविला ॥५२०॥मग बद्धाञ्जळि नम्र मौळें । लक्षूनि कृष्णाचीं पदकमळें । अष्टभावीं सहस्र डोळे । सप्रेम जळें गळताती ॥२१॥म्हणे जय जय जगदीश्वरा । आम्हां कृतघ्नां पामरां । कृपेनें देऊनि अभयकरा । रक्षिसी अमरां निज दासां ॥२२॥अमरेंद्रत्वाचा अभिमान । यास्तव गोकुळीं केलें विघ्न । तैं त्वां धरूनि गोवर्धन । गर्व भंगूनि लाजविलें ॥२३॥त्रिदशमंडळीं पावलों तपा । तैं त्वां पुढती करूनि कृपा । रक्षिलें असतां सुरपादपा - । निमित्त आतां विरोधिलें ॥२४॥सर्वापराध करूनि क्षमा । कृपावत्सला पुरुषोत्तमा । दासांमाजी कृतघ्नां अधमां । रक्षिजे आम्हां मातृवत् ॥५२५॥मातृगर्भींचे क्लेश नाना । विशेष प्रसूतिसमयीं जाणा । बाल्यावयवसंरक्षणा । पुत्र कृतघ्नासम विसरे ॥२६॥तथापि करुणावत्सल माता । सहसा न करी पुत्रघाता । तेंवि आम्हां स्वजठरस्थां । विभो समर्था रक्षावें ॥२७॥ऐसें ऐकोनियां वचन । कृपेनें द्रवला जनार्दन । म्हणे त्यां त्यजिलिया मृत्युभुवन । दुम घेऊन येइजे ॥२८॥इंद्र म्हणे माझा कुमर । त्रितीय पाण्डव तव किंकर । तो रक्षिजे हें वारंवार । जोडोनि कर प्रार्थितसें ॥२९॥हें ऐकोनि म्हणे हरि । तद्विषयीं तूं चिंता न करीं । सख्य करूनि प्राणांपरी । रक्षीन समरीं मी त्यातें ॥५३०॥इंद्रादि अमरां विसर्जून । भामा सद्रुम जनार्दन । खगेंद्रारूढ रत्नाभरण । द्वारकाभुवन पातला ॥३१॥असो ऐशी पुराणान्तरीं । कथा बोलिली बहु विस्तारीं । येथ संकेतें शुकवैखरी । मुकुरापरी बीजवत् ॥३२॥ऐकोनि भार्येचें उत्तर । उत्पाटूनि सुरतरुवर । गरुडीं वाहूनि सामर इंद्र । जिंकूनि सत्वर स्वपुरा ने ॥३३॥म्हणाल नेऊनि लाविला कोठें । तेंही परिसा श्रवणपुटें । वदलें शुकाचें मुखवटें । तेंचि गोमटें वाखाणूं ॥३४॥स्थापितः सत्यभामाया गृहोद्यानोपशोभनः । अन्वगुर्भ्रमराः स्वर्गात्तद्गंधासवलंपटाः ॥४०॥प्रत्यय उपजे अंतःकरणीं । तंववरी फेडिली शिराणी । सत्यभामा वरिष्ठ राणी । चक्रपाणिप्रियललना ॥५३५॥सत्यभामेच्या गृहोद्यानीं । कल्पतरु लाविला यत्नीं । ज्याच्या सौरभ्या वेधूनी । आले स्वर्गौनि सुरभ्रमर ॥३६॥निष्कुट म्हणजे गृहोद्यान । पार्यातकुसुमीं सौरभ्यपूर्ण । तेणें अत्यंत शोभायमान । भामाभुवन दिविसाम्यें ॥३७॥इंद्रें सहित निर्जरपंक्ति । जिणोनि पार्यात आणिला क्षिती । हें ऐकोनि परीक्षिति । उदित चित्तीं प्रश्नार्थ ॥३८॥अहो इंद्रें भाकूनि करुणा । कृष्ण पार्थिला स्वार्थसाधना । तो कार्यार्थ साधूनि दिधल्या जाणा । कीं कीजे कदना तेणेंसीं ॥३९॥ऐसी सुरांची कृतघ्नता । भासली परीक्षितीच्या चित्ता । तो अभिप्राय सर्वज्ञ वक्ता । बोले तत्त्वता शुक योगी ॥५४०॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP