मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५९ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ५९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ५९ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर तद्भौमसैन्य भगवान्गदाग्रजो विचित्रवाजैर्निशितैः शिलीमुखैः ।निकृत्तबाहूरुशिरोध्रविग्रहं चकार तर्ह्येव हताश्वकुंजरम् ॥१६॥अचिंत्यैश्वर्याचा पुंज । तो श्रीभगवान गदाग्रज । शार्ङ्गनिर्मुक्त अमोघ वाज । प्रळयाग्नितेज वर्षला ॥२८५॥वाज म्हणिजे शरांप्रति । तिहीं कर्मार शाणनिशितीं । शिलीमुखीं तैलमार्जितीं । पाडिली क्षिती भौमचमू ॥८६॥जैं भौमाचें प्रचंड सैन्य । गजारोहणीं दैत्य निर्घृण । शार्ङ्गनिर्मुक्त वाज घन । निवटी वर्षोन गदाग्रज ॥८७॥कृष्णहस्तींच्या तीक्षबाणीं । दैत्यमस्तकें उसळती गगनीं । बाहु छेदितां भासती फणी । समराङ्गणीं नभोगर्भीं ॥८८॥जानु जंघा मांडिया संधि । बाणधारां तुटोनि युद्धीं । पडती त्यांची गगना विधि । न शके त्रिशुद्धि करावया ॥८९॥ग्रीवा अंस वक्षस्थळें । कंधरा शिरोध्र कंठनाळें । छिन्न अवयव कृत वेगळें । रणीं कोथळे रिचवती ॥२९०॥ऐसे अवयव खंडविखंड । पर्वतप्राय धडमुंड । आधीं करूनि गरुडारूढ । दावी कैवाड सुरासुरां ॥९१॥त्यानंतरें तत्प्रेरितें । शस्त्रें छेदिलीं कृष्णनाथें । परमाश्चर्य हें निर्जरांतें । आणि दैत्यांतें दाखवी ॥९२॥कुर्वन्वयभूज्वळीकरणा । शशाङ्करूपा यशःकीर्तिकिरणा । यालागीं कुरोद्वहसंबोधना । हरिगुणश्रवणा तूं योग्य ॥९३॥श्रीकृष्णाचें करचापल्य । मनःपवनादि नव्हती तुल्य । कालकलनाशक्ति अतुल्य । तें कौशल्य अवधारीं ॥९४॥यानि यौधैः प्रयुक्तानि शस्त्रास्त्राणि कुरूद्वह । हरिस्तान्यच्छिनत्तीक्ष्णैः शरैरेकैकशस्त्रिभिः ।उह्यमानः सुपर्णेन पक्षाभ्यां निघ्नता गजान् ॥१७॥परमाश्चर्य केलें कैसें । अपारदैत्यीं समरावेशें । शस्त्रास्त्रांच्या प्रलयवर्षें । वर्षतां रोषें क्षोभोनी ॥२९५॥श्रीकृष्णाच्या करलाघवें । प्रबळ दैत्यसैन्यचि आघवें । छेदूनि विखंड केलीं शवें । जंव भेदावें तच्छस्त्रीं ॥९६॥शस्त्रस्त्रप्रेरक योद्धे रणीं । आधीं खंडूनि पाडिले बाणीं । मग तीं शस्त्रास्त्रें छेदूनी । पाडिलीं धरणीं कौतुक हें ॥९७॥अपारदैत्यांची शस्त्रवृष्टि । एकलें शार्ङ्ग कृष्णमुष्टी । एकैक शस्त्र तीं तीं कांठीं । छेदूनि भूतटीं पाडियलीं ॥९८॥परम तीक्ष्ण मार्गणधारा । जवें वर्षतां शार्ङ्गधरा । तीं तीं बाणीं एकैक शस्त्रा । छेदूनि धुळोरा उधळिला ॥९९॥सुपर्ण म्हणिजेतो खगेंद्र । कृष्ण वाहतां चपळतर । समरीं भ्रमरी देतां चतुर । वारणभार विध्वंसी ॥३००॥सादी पडिले कृष्णबाणीं । खगेंद्रपक्षें गजभंगाणी । झाली तें तूं ऐकें श्रवणीं । चातुर्यखाणी कुरुवर्या ॥१॥गरुत्मता हन्यमानास्तुंडपक्षनखैर्गजाः । पुरमेवाऽऽविशन्नार्ता नरको युध्ययुध्यत ॥१८॥मदोन्मत्त कुंजरभार । तीक्ष्ण गरुडाचें नखाग्र । रुततां समरीं झाले किर । सहसा धीर न संवरे ॥२॥तुंडें विदारितां गंड । कुंजरीं भावूनियां भैरुंड । लपती एकमेकां आड । टाकिती धडें भूपृष्ठीं ॥३॥गरुडपक्षांचा महामार । तेणें भंगला कुंजरभार । धाकें कांपती ते थरथर । दुःखें स्वपुर प्रवेशले ॥४॥कुंजरभार भंगल्यावरी । भौमसुर क्षोभला भारीं । समरी कृष्णातें पाचारी । भिडे निकरीं तें ऐका ॥३०५॥दृष्ट्वा विद्रावितं सैन्यं गरुडेनाऽऽर्दितं स्वकम् । तं भौमः प्राहरच्छक्त्या वज्रः प्रतिहतो यतः ॥१९॥खगेन्द्र क्षोभोनि पक्षघातीं । स्वसैन्य भंगिलें समरक्षिती । हें देखोनि भौम दुर्मति । परम निघातीं क्षोभला ॥६॥काळाग्निज्वाला धगधगित । तैसा खगेन्द्रा शक्तिघात । करिता झाला भौम दैत्य । वज्रप्रतिहत जेंवि शरें ॥७॥जिये शक्तीकरूनि बळी । समरीं अमरेन्द्र वज्र वळी । भंगी तृणप्राय दंभोलि । खगेन्द्रमौळी तत्प्रहारें ॥८॥हाणितां तिये शक्तीचा प्रहर । खगेन्द्र मानी अर्कतूळाग्र । चंचळ न होतां अणुमात्र । झडपिला कुञ्जर भौमाचा ॥९॥नाकंपत तया विद्धो मालाहत इव द्विपः । शूलं भौमोऽच्युतं हंतुमाददे वितथोद्यमः ॥२०॥दिग्गज हाणितां माळाघातें । भयाची शंका न मनी चित्तें । शक्तिप्रहार खगेन्द्रातें । भौमहस्तें तत्तुल्य ॥३१०॥शक्तिप्रहार वृथा गेला । रसरसित भौम ठेला । वीरश्री आवेश भंगला । मनीं शंकला ते काळीं ॥११॥गरुडें झडपितां भौमगजा । संघट भौमा अधोक्षजा । अच्युतातें हाणी पैजा । सतेज शूळें भूपुत्र ॥१२॥शूळ उचली जंव करतळीं । तंव सुदर्शनचक्रें श्रीवनमाळी । भौमासुराचा छेदी मौळि । समरशाळी तें ऐका ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP